पुणे, दि. १६ : मा. उपराष्ट्रपती यांच्या दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या लोणावळा, पुणे येथील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी दौरा संपेपर्यंत लोणावळा व परिसरात ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर, हॉट एअर फुगे तसेच तत्सम सर्व हवेत उडणाऱ्या साधनांच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करताना आढळून आल्यास संबंधित व्यक्ती भारतीय न्याय संहितेतील कलम २२३ नुसार दंडनीय कारवाईस पात्र राहील. याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


