Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedआधार हाउसिंग फायनान्सने तीन नवीन शाखांसह पुण्यातील उपस्थितीचा केला विस्तार शहरातील...

आधार हाउसिंग फायनान्सने तीन नवीन शाखांसह पुण्यातील उपस्थितीचा केला विस्तार शहरातील एकूण शाखांची संख्या १८ वर पोहोचली

पुणे, सप्टेंबर १८, २०२६: आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडने (एएचएफएल) पुणे शहरात तीन नवीन शाखांच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. या नवीन शाखा बावधन, शिक्रापूर आणि सासवड येथे सुरू करण्यात आल्या आहेत. या विस्तारामुळे पुण्यातील कंपनीच्या एकूण शाखांची संख्या १८ वर पोहोचली आहे, तसेच देशभरातील नेटवर्क ६३० हून अधिक शाखांपर्यंत विस्तारले आहे. या नवीन शाखांमुळे या भागातील ग्राहकांसाठी आधारची पोहोच अधिक सुलभ होईल, तसेच अल्प उत्पन्न गट (एलआयजी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्ल्यूएस) कुटुंबांना परवडणारे गृहकर्ज प्रदान करण्याप्रती कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ होईल.

 

तिन्ही ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पडले. या कार्यक्रमांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. अनिल नायर, चीफ बिझनेस लीडर श्री. सत्यम वर्मा आणि कंपनीचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

पुण्यातील निवासी बाजारपेठ सातत्याने प्रगती करत आहे, रोजगाराच्या नवीन संधी, पायाभूत सुविधांचा विकास आणि निवासी क्षेत्रांचा विस्तार याला हातभार लावत आहे. जून २०२६ अखेर संपलेल्या १२ महिन्यांत शहरातील घरांची विक्री वार्षिक ७ टक्‍के वाढ होऊन ९२,३४१ युनिट्सवर पोहोचली, तर नवीन निवासी प्रकल्पांच्या लाँचमध्ये १४ टक्‍के वाढ होऊन १,०१,०८५ युनिट्सवर गेली. घरांच्या विक्री आणि लाँचमधील ही वाढ प्रस्थापित, तसेच नव्याने विकसित होणाऱ्या भागांमधील घरांची सातत्यपूर्ण मागणी दर्शवते, तसेच स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी परवडणाऱ्या गृहकर्जाचे महत्त्व स्पष्ट करते.

 

आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री. रिषी आनंद म्हणाले, “पुण्याचा विकास विविध उत्पन्न गट आणि नव्याने विकसित होणाऱ्या भागांमध्ये घर खरेदीदारांची नवीन लाट निर्माण करत आहे. आमच्या नवीन शाखा स्थानिक बाजारपेठेची जाण, सुलभ गृहकर्ज आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांची सांगड घालून जबाबदारीने या संधीचा लाभ घेण्याच्या दिशेने पाऊल आहे.”

 

आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. अनिल नायर म्हणाले, “या भागातील आमच्या अनुभवाद्वारे आम्हाला स्थानिक समुदायांच्या गृहकर्जाच्या गरजांबाबत सखोलपणे समजले आहे. बाजारपेठेबाबत ही माहिती आम्हाला विविध उत्पन्न गटांतील ग्राहकांसाठी त्यांच्या गरजेनुसार सानुकूलित सोल्यूशन्स प्रदान करण्यास सक्षम करते. या नवीन शाखा ग्राहकांशी आमचे संबंध अधिक दृढ करतील आणि स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांशी अधिक जवळून संवाद साधण्याची संधी देतील, तसेच घर खरेदी करणे अधिक सुलभ बनवण्याच्या आमच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतील.”

 

२२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दृढ उपस्थितीसह, आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेड गृहकर्ज सेवांपासून वंचित असलेल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील आपल्या कामकाजाच्या माध्यमातून कंपनी विशेषतः अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना पाठबळ देण्यासाठी कटि

बद्ध आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments