Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedतामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन 

तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन 

 

 

सरफोजीराजे (द्वितीय) मराठी साहित्य संमेलनात संपूर्ण भारतातून जमणार साहित्यिकांचा मेळा

डॉ. शरद गोरेंच्या अध्यक्षतेखाली पार पडणार ऐतहासिक मराठी साहित्य संमेलन

 

पुणे, २० सप्टेंबर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित सरफोजीराजे (द्वितीय) मराठी साहित्य संमेलन बुधवार (दि.

२३) रोजी तंजावर येथे संपन्न होत आहे. तामिळनाडूतील तंजावर शहरात होणारे दक्षिण भारतातील हे पहिलेच मराठी साहित्य संमेलन असून देशभरातून मराठी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. तंजावरच्या भूमीत होणाऱ्या संमेलनाच्या निमित्ताने मराठी – तमिळ भाषेला जोडत साहित्य, कला आणि संस्कृतीचा जागर होणार आहे. छ. शिवाजी महाराजांचे भाऊ व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर येथे दक्षिणेतील मराठा साम्राज्याची स्थापना केली होती. त्यानंतर सरफोजीराजे भोसले (द्वितीय) यांनी तंजावर हे दक्षिणेतील मराठी संस्कृतीचे मुख्य केंद्र बनवले. सरफोजीराजेंनी साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याने या संमेलनाला सरफोजींचे नाव देण्यात आले आहे.

 

दि. २३ रोजी या संमेलनाची सुरुवात दुपारी ३.३० वाजता ग्रंथ दिंडीने होणार आहे. श्रीमंत छत्रपती सरफोजीराजे भोसले स्मारक, कलादालन, राजमहाल परिसर येथून ही दिंडी निघेल. मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांच्या हस्ते दिंडीचे पूजन होईल. यावेळी अश्विनी भगत, पल्लवीताई गोरे, सुधीर चव्हाण, रंजना भोईटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

त्यानंतर दुपारी ४ वाजता तंजावर येथील बृहदेश्वर मंदिराजवळील “पेथनन कलैयरंगम सभागृह” येथे या संमेलनाचे उद्घाटन तंजावर संस्थानचे प्रमुख श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते होईल. या ऐतहासिक संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरद गोरे हे भूषविणार आहेत. यावेळी निमंत्रक युवराज संभाजीराजे भोसले (प्रदेशाध्यक्ष, तामिळनाडू), महाराष्ट्राचे माजी उच्चशिक्षण मंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून अ.भा. म. साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील, उद्योजक आप्पासाहेब गुरव, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विकास भोसले आदींची उपस्थिती असणार आहे.

 

उद्घाटन सत्रानंतर सायं. ६ वा. परिसंवाद होईल. सुप्रसिद्ध साहित्यिका प्रा. दीप्ती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात व्यंकट सोमाजी (आंध्रप्रदेश), विक्रम शिंदे (महाराष्ट्र), अजय श्रीखंडे (दिल्ली), महादेव पवार (प. महाराष्ट्र) सहभागी होतील. सायं. ६.३० वा. सुप्रसिद्ध कवी रमेश रेडेकर (पुणे) यांच्या अध्यक्षेखाली कविसंमेलन होईल. यामध्ये अजय खडसे, अशोक थोरात, मीना महामुनी, सूर्यकांत नामुगडे, किशोर टिळेकर, सुवर्णा वाघमारे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी जेष्ठ साहित्यिक सूर्यकांत नामुगडे यांच्या “सावल्या” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

शिवसंत संजय मोरे(बेळगाव), मुकेश सरदार चिखलदरा, प्रमोद काकडे(अमरावती), माणिक गोडसे(नाशिक), व्यं. कृ. पाटील(बेळगाव), पार्वती चव्हाण(खोपोली), भास्कर भोसले(पुणे), आरती सोनवणे(नाशिक), रामदास बिर्जे(चंदगड), अमोल कुंभार(पुणे), आप्पा फुले(अकलूज), जयश्री नांदे(पुणे), रवी चापके(पुसद), विजया पाटील(कराड), राजेंद्र फंड(शिर्डी), संगीता लंघे(पुणे) आदी संमेलनामध्ये सहभागी कवी असणार आहेत.

 

रात्री ८ वा. समारोप व पुरस्कार वितरण होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष ॲड. प्रशांत चौधरी, तेलंगणा प्रदेशाध्यक्षा अनुराधा मारचट्टीवर, पंजाब प्रदेशाध्यक्षा पूनम सुलाने, हरियाणा प्रदेशाध्यक्ष विष्णू पाटील, गोवा प्रदेशाध्यक्षा छाया पुसेकर आदी या समारोपाला प्रमुख पाहुणे उपस्थित राहतील.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये आरती झोटिंग(सरफोजीराजे विशेष साहित्यरत्न पुरस्कार), डॉ. नंदकुमार राऊत(सरफोजीराजे युवा साहित्यरत्न पुरस्कार), गणेश आघाव(सरफोजीराजे कलारत्न पुरस्कार), फुलचंद नागटिळक( सरफोजीराजे समाजरत्न पुरस्कार), प्रार्थना फाउंडेशन(सरफोजीराजे उद्योगत्न पुरस्कार), मानसिंग विष्णू जाधव( सरफोजीराजे शिक्षणरत्न जीवनगौरव पुरस्कार), पंडितराव लोहोकरे(सरफोजीराजे समाजरत्न जीवनगौरव पुरस्कार), बाळकृष्ण अमृतकर( सरफोजीराजे उद्योगत्न पुरस्कार), अमोल पाटील(सरफोजीराजे समाजरत्न पुरस्कार), डॉ. आकाश वानखेडे( सरफोजीराजे उद्योगत्न पुरस्कार), डॉ. तात्यासाहेब गायकवाड( सरफोजीराजे समाजरत्न पुरस्कार), रत्नप्रभा पाटील यांना पुरस्काराने गौरवण्यात येईल.

 

 

कोट:

“तंजावर मधील या मराठी संमेलनासाठी दि, २१ रोजी फुलचंद नागटिळक यांच्या आयोजनाखाली शेकडो साहित्यिक आणि वारकऱ्यांना घेऊन “पंढरीची वारी, साहित्य संमेलनाच्या दारी” या उपक्रमांतर्गत पंढरपूर ते सोलापूर पायी ग्रंथदिंडी निघणार आहे. पुढे ही ग्रंथदिंडी सोलापूर येथून रेल्वेद्वारे संत साहित्याचा जागर करत तंजावर साहित्य संमेलनाच्या ठिकाणी पोहोचणार आहे. मुंबई, पुणे, सोलापूर मधून शेकडो मराठी साहित्यिक एकत्रित रेल्वेद्वारे संमेलनाला येणार असून धावत्या रेल्वेमध्ये विशेष प्रवासी साहित्ययात्री संमेलन रंगणार आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या लिखित कवितांचे वाचनही होणार आहे. यातून मराठी लोककला, लोकसंस्कृती आणि अभिजात मराठीचा प्रचार प्रसार हाच मुख्य हेतू आहे”

— विक्रम मालन आप्पासो शिंदे

प्रदेश सरचिटणीस, अ. भा. म. साहित्य परिषद,

आयोजक – सरफोजीराजे (द्वितीय) मराठी साहित्य संमेलन, तंजावर.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments