- नवीन ‘बुलेट-पेमेंट’ पर्यायासह गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रासाठी मासिक ईएमआय २५ टक्क्यांनी कमी झाले.
Galaxy Forever मध्ये खात्रीशीर बायबॅक (अॅश्युअर्ड बायबॅक) आणि सॅमसंग केअर+ डिवाईस संरक्षणाचा समावेश आहे.
गुरुग्राम, भारत – सप्टेंबर १७, २०२६: सॅमसंग इंडियाने आपल्या Galaxy Forever प्रोग्राम अंतर्गत अत्याधुनिक फ्लॅगशिप फोल्डेबल स्मार्टफोन्स – गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा आणि गॅलेक्सी झेड फोल्ड८ साठी नवीन, स्थिर पेमेंट योजना सुरू केली आहे. ही नाविन्यपूर्ण योजना गॅलेक्सी फोल्डेबल डिवाईसची मालकी मिळवणे पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आणि परवडणारे बनवते.
या दोन वर्षांच्या प्रोग्राम अंतर्गत, ग्राहक २४ महिन्यांच्या ईएमआयमध्ये विभागून Galaxy Forever प्रोग्राम शुल्कासह डिवाईसच्या मूळ किमतीच्या केवळ ६० टक्के रक्कम भरून गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा आणि गॅलेक्सी झेड फोल्ड८ खरेदी करू शकतात. यामुळे २४ महिन्यांसाठी ईएमआय २५ टक्क्यांनी कमी होतो, ज्यामुळे हप्ते भरणे अधिक सोपे होते. या प्रोग्रामद्वारे, गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्राचा ईएमआय ९,४१७ रुपयांवरून घसरून ६,९९७ रुपये* होतो, तर गॅलेक्सी झेड फोल्ड८ चा ईएमआय ८,५८४ रुपयांवरून घसरून ६,४१६ रुपये* होतो.
डिवाईसच्या किमतीची उर्वरित ४० टक्के रक्कम २४ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बुलेट पेमेंट म्हणून देय असेल. २४ महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर ग्राहकांना पुढील स्थिर पर्याय मिळतील:
अपग्रेड: जुने डिवाईस परत करून नवीन गॅलेक्सी डिवाईस मिळवणे.
रिटेन: ४० टक्के बुलेट पेमेंट रक्कम भरून डिवाईस स्वतःकडेच ठेवणे.
रिटर्न : डिवाईस सहजपणे परत करून प्रोग्राममधून बाहेर पडणे.
ग्राहकांकडे २४ महिन्यांपूर्वी डिवाईस परत करण्याचा किंवा अपग्रेड करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे; ज्यासाठी कोणतीही विचारणा न करता (नो क्वेश्चन्स आस्कड)** लागू होणारी बायबॅक मूल्ये खालीलप्रमाणे आहेत:
१०-११ महिने: ५५ टक्क्यांपर्यंत खात्रीशीर बायबॅक (अॅश्युअर्ड बायबॅक)
१२-१३ महिने: ५० टक्क्यांपर्यंत खात्रीशीर बायबॅक
१४-१८ महिने: ४५ टक्क्यांपर्यंत खात्रीशीर बायबॅक
१९-२५ महिने: ४० टक्क्यांपर्यंत खात्रीशीर बायबॅक
Galaxy Forever प्रोग्राममध्ये सॅमसंग केअर+ चा देखील समावेश आहे, जे कोणत्याही क्लेम प्रोसेसिंग शुल्काशिवाय नकळतपणे खाली पडल्यामुळे आणि पाण्यामुळे होणा-या नुकसानासाठी संरक्षण प्रदान करते. याचा अर्थ ग्राहकांना सॅमसंग केअर+ स्वतंत्रपणे खरेदी करण्याची गरज नाही, ते पॅकेजचा भाग आहे.
कमी मासिक ईएमआय, खात्रीशीर बायबॅक पर्याय आणि डिवाईस संरक्षणाचा एकत्रित लाभ देऊन Galaxy Forever ग्राहकांना अतुलनीय स्थिरताआणि मानसिक शांतता प्रदान करते. तुम्ही तुमचे सध्याचे गॅलेक्सी फोल्डेबल स्वतःकडेच ठेवणे पसंत करा किंवा नवीन मॉडेलमध्ये अपग्रेड करणे निवडा, हा प्रोग्राम तुम्ही नेहमी भविष्यासाठी सज्ज राहाल याची खात्री देतो.
गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा: उत्पादकतेसाठी सर्वात प्रगत फोल्डेबल
गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा सॅमसंगच्या सर्वोच्च दर्जाची कार्यक्षमता फोल्डेबल श्रेणीमध्ये घेऊन येतो, ज्यामध्ये मोठा ८-इंच मुख्य डिस्प्ले, प्रगत कॅमेरा सिस्टम आणि आव्हानात्मक वर्कफ्लोसाठी बनवलेले हार्डवेअर एकत्र केले आहे. हा डिवाईस फक्त ४.१ मिमी पातळ आहे आणि वजन २१५ ग्रॅम आहे, ज्यामुळे ही सॅमसंगची आजवरची सर्वात स्लिम फोल्ड डिझाइन बनली आहे. एचडीआरसह २०० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि सुधारित नाइटोग्राफीसह नवीन ५० मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स कोणत्याही प्रकाशात अधिक सुस्पष्टता देतात, तर नवीन एपीव्ही कोडेक आणि सिने एलयूटी टूल्ससह ८के व्हिडिओ रेकॉर्डिंग क्रिएटर्सना अधिक नियंत्रण देतात. स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ फॉर गॅलेक्सी प्लॅटफॉर्म आणि ४५ वॅट फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएच बॅटरीद्वारे संचालित हा डिवाईस दिवसभराचे काम आणि कंटेंट निर्मितीला पाठबळ देतो.
गॅलेक्सी झेड फोल्ड८: सर्वोत्तम व्ह्यूइंग अनुभवावर लक्ष केंद्रित करणारा नवीन फोल्डेबल अनुभव
गॅलेक्सी झेड फोल्ड८ क्विक कव्हर-स्क्रीन परस्परसंवादापासून ते अनफोल्ड केल्यावर सर्वोत्तम व्ह्यूइंग, वाचन आणि गेमिंगमध्ये सहजतेने बदल करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. ४८०० एमएएच बॅटरीसह फक्त २०१ ग्रॅम वजन असलेला हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात हलका गॅलेक्सी झेड फोल्ड आहे. नवीन फ्लेक्स टायटॅनियम डिस्प्ले स्ट्रक्चर क्रिज दृश्यमानता कमी करते आणि टिकाऊपणा सुधारते, तर मुख्य डिस्प्ले ३००० नीट्सपर्यंतच्या पीक ब्राईटनेसपर्यंत पोहोचतो. सिस्टममधील ड्युअल ५० मेगापिक्सल कॅमेरा, ड्युअल रेकॉर्डिंग आणि माय फॅनकॅम वैशिष्ट्ये विविध सीन्समधील कंटेंट कॅप्चर आणि एडिट करणे सोपे करतात.
Galaxy Forever प्रोग्रामविषयी अधिक माहितीसाठी आणि गॅलेक्सी झेड फोल्ड८, तसेच गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी, तुमच्या जवळच्या सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअरला भेट द्या.
*अटी व शर्ती लागू. बुलेट पेमेंट, ईएमआय, पात्रता आणि डिवाईस संरक्षणविषयक तपशील वित्तपुरवठ्याच्या (फायनान्सिंग) अटींच्या अधीन आहेत.
**अटी व शर्ती लागू**


