Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोठ्या थकबाकीदार मालमत्तांवर ३० सप्टेंबरनंतर जप्तीची कारवाई करा – आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी 

मोठ्या थकबाकीदार मालमत्तांवर ३० सप्टेंबरनंतर जप्तीची कारवाई करा – आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी 

 

 

 

 

मालमत्ता कर वसुलीबाबत झाली आढावा बैठक

 

 

 

पिंपरी, २२ सप्टेंबर २०२६: पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत समावेश असणाऱ्या ज्या मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी आहे, अशा मालमत्तांवर ३० सप्टेंबर २०२६ नंतर जप्तीची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. अशी कारवाई प्राधान्याने औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र तसेच इतर मालमत्तांवर करण्यात यावी, असेदेखील ते म्हणाले.

 

 

 

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या करवसुलीबाबतची आढावा बैठक आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार यांच्यासह सर्व प्रशासन अधिकारी तसेच सहायक मंडलाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

मालमत्ता कर वसुली, मालमत्ता हस्तांतरण, चालू वर्षातील नवीन मालमत्तांची कर आकारणी, थकबाकीदार मालमत्ताधारक तसेच फुगीर मागणी याबाबत विभागनिहाय माहिती बैठकीत घेण्यात आली. करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून वसुलीची कार्यवाही अधिक गतिमान करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिल्या.

 

 

 

३० सप्टेंबरनंतर थकबाकीदार मालमत्तांवर जप्तीची प्रक्रिया प्रभावीपणे राबवताना प्राधान्याने मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकीत असलेल्या औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र तसेच इतर मालमत्तांवर नियमानुसार जप्तीची कारवाई करावी. थकबाकीदार मालमत्ताधारकांकडून कर वसुलीसाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही प्रभावीपणे राबवावी, तसेच विभागनिहाय नियोजन करून करवसुलीची कार्यवाही अधिक गतिमान करावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

 

 

 

दरम्यान, शहरातील अनधिकृत बांधकामांवर बारकाईने लक्ष ठेवून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. नवीन बांधकामांची माहिती संकलित करून पात्र मालमत्तांची कर आकारणी करण्याची कार्यवाही तातडीने करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली वाढविण्यासाठी विभागनिहाय नियोजन, थकबाकीदारांचा सातत्याने पाठपुरावा आणि प्रभावी वसुली मोहीम राबविण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

 

…..

 

 

 

मालमत्ता कराच्या ४ टक्के सवलतीसाठी शेवटचे ८ दिवस!

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मालमत्ता करावर ऑनलाइन कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करात ४ टक्के सवलत जाहीर केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे ८ दिवस शिल्लक असून ३० सप्टेंबर २०२६ ही सवलत मिळण्याची अंतिम तारीख आहे. आतापर्यंत ५९२ कोटी ७४ लाख मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी मुदत संपण्यापूर्वी आपला मालमत्ता कर ऑनलाइन भरून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वती

ने करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments