Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorized*पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान* ...

*पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान* *२९ सप्टेंबरला अधिसूचना; ६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार*

 

 

पुणे, दि. २२ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघासह राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून, मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ४ अशी राहणार आहे.

 

निवडणूक कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असून, ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे. २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

 

पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघांतर्गत संबंधित पाचही जिल्ह्यांमध्ये तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी लागू झालेली आदर्श आचारसंहिता २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर संपुष्टात येणार आहे.

 

महाराष्ट्रातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार पार पाडण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments