Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २३ ऑक्टोबरला* ...

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २३ ऑक्टोबरला* *मतदान सकाळी ८ ते दुपारी ४; २७ ऑक्टोबरला मतमोजणी*

 

 

पुणे, दि. २२ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी समाप्त होत असल्याने भारत निवडणूक आयोगाने या दोन्ही मतदारसंघांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान सदस्य अरुण गणपती लाड आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान सदस्य जयंत दिनकर आसगावकर यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी पूर्ण होत आहे.

 

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर २०२६ आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर २०२६ आहे. दोन्ही मतदारसंघांसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आहे. मतमोजणी मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्ण करण्यात येणार आहे.

 

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित मतदारसंघांच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष तसेच संबंधित प्रशासकीय विभागांनी भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या आदर्श आचारसंहितेतील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments