Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedवर्ल्डस्किल्स शांघाय 2026 मध्ये पिडिलाईटद्वारे प्रशिक्षित उमेदवार भारताचे प्रतिनिधित्व करणार

वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 मध्ये पिडिलाईटद्वारे प्रशिक्षित उमेदवार भारताचे प्रतिनिधित्व करणार

 

 

 

 

इंडियास्किल्स 2026 मध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर, पिडिलाइटकडून प्रशिक्षण घेतलेले दोन उमेदवार जागतिक स्तरावर पोहोचले

 

 

 

मुंबई, 18 सप्टेंबर 2026 – शांघाय येथे होणाऱ्या वर्ल्डस्किल्स इंटरनॅशनल स्पर्धा 2026 मध्ये सहभागी होणाऱ्या प्रकाश सुथार आणि पंकज जांग्रा या दोन स्पर्धकांना पाठिंबा देताना पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडलाअभिमान वाटतो आहे. पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड ही ॲडेसिव्ह्ज (चिकटवणारे पदार्थ), सीलंट्स आणि बांधकाम क्षेत्रातील रसायनांच्या उत्पादनातील भारतातील आघाडीची कंपनी आहे. पिडिलाइट वुडवर्किंग अँड प्लंबिंग सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्किल्स (PWP) मध्ये प्रशिक्षण घेतलेले हे दोन्ही स्पर्धक, इंडियास्किल्स 2026 राष्ट्रीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीनंतर आता वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज आहेत.

 

 

 

या यशाबद्दल भाष्य करताना पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडचेव्यवस्थापकीय संचालक श्री. सुधांशू वत्स म्हणाले, “भारताच्या विकसित भारत या संकल्पनेसाठी केवळ व्यापक प्रमाणामधील विस्तार आणि पायाभूत सुविधांचीच नव्हे, तर वेगाने बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम अशा कुशल मनुष्यबळाचीही आवश्यकता आहे. कौशल्याशी संबंधित परिसंस्था (ecosystem) बळकट करण्यात आणि प्रतिभावान व्यक्तींना उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे, असे पिडिलाइट मानते. इंडियास्किल्स 2026 मधील आमच्या PWP-प्रशिक्षित उमेदवारांचे यश आणि त्यांची वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 या जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी झालेली निवड, हे उद्योगांच्या गरजांशी सुसंगत अशा प्रशिक्षणाचे सामर्थ्य अधोरेखित करते. भारताचे कौशल्यपूर्ण कसब जगासमोर सादर करणाऱ्या या युवा व्यावसायिकांना पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटतो.”

 

 

 

आता हे स्पर्धक आपले कौशल्य वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 – 48 वी वर्ल्डस्किल्स स्पर्धा – या जागतिक स्पर्धेत सादर करतील; 22 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत चीनमधील शांघाय येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 70 हून अधिक देश आणि प्रदेशांमधील 1,400 हून अधिक कुशल तरुण व्यावसायिक या स्पर्धेत सहभागी होतील, तर 64 विविध कौशल्य प्रकारांमध्ये (कॅटेगरी) आपापली कौशल्ये पणाला लावतील.

 

 

 

कौशल्य – द स्किल युनिव्हर्सिटी, अहमदाबाद यांच्या भागीदारीत स्थापन झालेले पिडिलाइट वुडवर्किंग अँड प्लंबिंग सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्किल्स (PWP), हे लाकूडकाम आणि प्लंबिंग क्षेत्रातील प्रगत तसेच प्रत्यक्ष कृतीवर आधारित प्रशिक्षणाद्वारे पारंपरिक कारागिरी आणि उद्योगांच्या बदलत्या गरजा यामधील दरी सांधण्यावर भर देते.

 

 

 

कौशल्य विकासातील पिडीलाइटची सातत्यपूर्ण गुंतवणूक ही भविष्यासाठी सज्ज आणि उद्योगाशी सुसंगत मनुष्यबळ तयार करण्याच्या तिच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतीक आहे. PWP सारख्या उपक्रमांद्वारे, कंपनी लाकूडकाम आणि प्लंबिंग या दोन्ही क्षेत्रांमधील क्षमता मजबूत करू इच्छिते, व्यावसायिक उत्कृष्टतेला पाठिंबा देते आणि कुशल प्रतिभावंतांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी अधिक संधी निर्माण करते.

 

 

 

प्रत्यक्ष प्रशिक्षणाला जागतिक मानके आणि स्पर्धांच्या अनुभवाशी जोडून,भारतातील कुशल कारागिरीच्या प्रगतीमध्ये योगदान देणे आणि कुशल प्रतिभेसाठी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक केंद्र बनण्याच्या देशाच्या महत्त्वाकांक्षेला पाठिंबा देणे, हे पिडीलाइटचे उद्दिष्ट आहे.

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments