पुणे : हटके म्युझिक ग्रुपतर्फे स्वामी भक्तांसाठी ‘हटके स्वामी वंदना’ या भक्तिमय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गीत-संगीतकार संतोष अत्रे यांनी रचलेल्या व संगीतबद्ध केलेल्या १० नवीन रचनांचे सादरीकरण या मैफलीत करण्यात येणार आहे.
रविवारी २७ सप्टेंबर सायंकाळी ६ वाजता वेळेत सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या राजवाडे हॉल मध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नाट्यकर्मी मोहन जोशी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
संतोष अत्रे यांच्यासह गायक राहुल जोशी, धवल चांदवडकर, गायिका रश्मी मोघे, अनुश्री घोरपडे तसेच हटके म्युझिक ग्रुपचे सदस्य रचनांचे सादरीकरण करणार आहेत.


