Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedडीबीएस बँक इंडियाने पुण्यातील आपले स्थान अधिक भक्कम केले

डीबीएस बँक इंडियाने पुण्यातील आपले स्थान अधिक भक्कम केले

 

महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक केंद्रांपैकी एका ठिकाणी – पिंपरी-चिंचवडमधील शाखा डीबीएस बँक इंडियाची उपस्थिती अधिक बळकट करते

पुणे, 28 सप्टेंबर 2026 – डीबीएस बँक इंडियाने पिंपरी-चिंचवडमध्ये आपल्या नवीन शाखेचे उद्घाटन करून महाराष्ट्रातील आपली उपस्थिती अधिक बळकट केली आहे. यामुळे पुणे परिसरातील ग्राहक, उद्योजक आणि व्यावसायिक यांना सेवा देण्यासाठी बँकेची क्षमता विस्तारली आहे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गा लगतच्या कमला क्रॉस रोडवरील ज्वेल ऑफ पिंपरी येथे स्थित असलेली 2,000 चौरस फुटांवरील ही शाखा रिटेल, वेल्थ (संपत्ती व्यवस्थापन), एसएमई (SME), तसेच व्यावसायिक आणि कॉर्पोरेट बँकिंग सेवा पुरवते. या शाखेच्या माध्यमातून ग्राहक डीबीएस बँक इंडियाच्या सर्वसमावेशक बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकतात; तसेच वैयक्तिक, वेल्थ आणि व्यावसायिक बँकिंग क्षेत्रातील बँकेच्या प्रगत डिजिटल सुविधांचीही त्यांना मदत मिळते.

भारतातील सुमारे ३५० ठिकाणी डीबीएस बँक इंडियाच्या शाखा आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ही नवीन शाखा (जी अलीकडेच स्थलांतरित करण्यात आली आहे) पश्चिम भारतातील बँकेचे अस्तित्व अधिक दृढ करते. तसेच, शिवाजीनगर, कल्याणी नगर आणि टिळक रोड येथील विद्यमान शाखांना पूरक ठरत, पुणे क्षेत्रातील बँकिंग सुविधा अधिक व्यापक करते.

डीबीएस बँक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि नॅशनल डिस्ट्रिब्युशनचे प्रमुख सुदर्शन चारी म्हणाले, “पिंपरी-चिंचवड हे बऱ्याच काळापासून महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे औद्योगिक केंद्र राहिले आहे; येथे उत्पादक, लघु आणि मध्यम उद्योग (SMEs) आणि उदयोन्मुख व्यवसायांचा भक्कम पाया आहे. व्यवसायांचा विस्तार होत असताना आणि ग्राहकांच्या गरजा बदलत असताना, वैयक्तिक तसेच व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सहाय्य करू शकणाऱ्या बँकिंग भागीदारांची मागणी वाढत आहे. ही शाखा ग्राहकांप्रतीची आमची वचनबद्धता दर्शवते. वैयक्तिक बँकिंग सेवा आणि आमच्या डिजिटल क्षमता यांचा मेळ घालून, या क्षेत्रातील व्यक्ती, उद्योजक आणि व्यावसायिक यांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”

व्यवसायांसाठी, डीबीएस बँक इंडिया लघु आणि मध्यम उद्योग (SMEs) आणि कॉर्पोरेट्ससाठी वित्तपुरवठा तसेच व्यावहारिक बँकिंग सोल्यूशन्स प्रदान करते, ज्यामध्ये खेळते भांडवल वित्तपुरवठा, व्यापार वित्तपुरवठा, रोख व्यवस्थापन, परकीय चलन, वेतन आणि व्यापारी कलेक्शन सेवांचा समावेश आहे. लघु आणि मध्यम उद्योग मालमत्तेवर कर्ज (LAP), ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी पत हमी निधी ट्रस्ट (CGTMSE) योजनेअंतर्गत कर्जे देखील मिळवू शकतात. बँकिंग व्यवसायांसाठी असलेल्या डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म, डीबीएस आयडियल (DBS IDEAL) द्वारे या सेवांना समर्थन दिले जाते. तर बँकेचा व्यापारी संकलन प्लॅटफॉर्म, डीबीएस मॅक्स (DBS MAX) व्यापाऱ्यांना डिजिटल संकलन सुव्यवस्थित करण्यास आणि पेमेंटची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करण्यासाठी जसपे-संचालित पेमेंट व्यवस्थापन सोल्यूशनचा वापर करतो.

व्यावसायिक बँकिंगव्यतिरिक्त, डीबीएस बँक इंडिया वैयक्तिक बँकिंग, संपत्ती व्यवस्थापन आणि गुंतवणुकीशी संबंधित विविध सेवा तसेच उपाययोजना पुरवते. डीबीएस अस्पायर ही सेवा अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांचे टोटल रिलेशनशिप व्हॅल्यू (TRV) 10 लाख रुपये आहे किंवा ज्यांच्या बचत खात्यात किमान 2 लाख रुपयांची मासिक शिल्लक असते. डीबीएस ट्रेजर्स ही सेवा 30 लाख रुपये किंवा त्याहून अधिक टीआरव्ही असलेल्या ग्राहकांसाठी आहे, तर डीबीएस ट्रेझर्स प्रायव्हेट क्लायंट ही सेवा 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त TRV असलेल्या अत्यंत श्रीमंत (ultra-high-net-worth) व्यक्तींसाठी उपलब्ध आहे.

अनिवासी भारतीयांसाठी (NRIs) परदेशातून पैसे पाठवणे (remittance), संपत्ती व्यवस्थापन आणि गुंतवणुकीच्या सुविधा डीबीएस बँकिंग देते; पात्र ग्राहक परदेशातूनच डिजिटल पद्धतीने आपली खाती उघडू शकतात.

digibank ॲपद्वारे ग्राहक दैनंदिन बँकिंग आणि गुंतवणुकीच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये डिजिटल पद्धतीने खाते उघडणे आणि डीबीएस DigiPortfolio यांसारख्या सेवांचा समावेश आहे; DBS DigiPortfolio हे एक गुंतवणूक व्यासपीठ असून, ते तंत्रज्ञान आणि मानवी कौशल्य यांचा मेळ घालून निवडक गुंतवणूक पर्याय उपलब्ध करू

न देते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments