भारत, सप्टेंबर, २०२६: भारतातील आघाडीच्या प्रिमियम फ्रॅग्रन्स ब्रँड्सपैकी एक, ‘स्किन – हाऊस ऑफ टायटन’ वृद्धीच्या पुढील टप्प्यासाठी सज्ज झाला आहे. सुगंधी उत्पादनांची बाजारपेठ देशात वेगाने बदलत आहे, यामध्ये आपले स्थान अधिक बळकट करण्याची कंपनीची महत्त्वाकांक्षा आहे. गेल्या काही वर्षांत ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी आणि बाजारपेठेतील नवीन प्रवाहांचा अभ्यास करून, ‘स्किन’ ब्रँडने आर्थिक वर्ष २०३० पर्यंत वार्षिक ₹१,००० कोटींचा महसूल मिळवण्याचे आणि ८० लाख ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
भारतातील सुगंधी उत्पादनांची बाजारपेठ जोमाने वाढत आहे, तर दुसरीकडे ग्राहकांच्या आवडीनिवडी सातत्याने बदलत आहेत, याला अनुसरून कंपनीने हे पाऊल उचलले आहे. देशात या बाजारपेठेचे मूल्य सध्या सुमारे ₹४,५०० कोटींवर पोहोचल्याचा अंदाज असून, आर्थिक वर्ष २०३० पर्यंत ते अंदाजे ₹७,००० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच पुढील चार वर्षांत या बाजारपेठेत १३ ते १५% वाढ अपेक्षित आहे. या श्रेणीतील खरेदी आता केवळ विशिष्ट सण-समारंभापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर व्यक्तिमत्त्वाची रोजच्या रोज देखभाल, आत्मअभिव्यक्ती आणि जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनत चालली आहे. ग्राहक आता अधिक सजग झाले असून, ते सुगंधाची निवड केवळ त्याच्या सुवासामुळे करत नसून, त्या सुगंधामुळे त्यांना काय अनुभव मिळाला किंवा कोणती भावना जाणवली यालाही ते महत्त्व देत आहेत.
‘स्किन फ्रॅग्रन्सेस’ने आपल्या वृद्धीच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना, बॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते आयुषमान खुराणा आणि शोभिता धुलिपाला यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. आपल्या उत्पादनांची माहिती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ब्रँडला सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सुसंगत बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा नवा सहयोग म्हणजे ‘स्किन’ ब्रँडला नव्या पिढीच्या ग्राहकांशी जोडण्यासाठी उचललेले एक धोरणात्मक पाऊल आहे. ‘स्किन’चे सुगंध हे केवळ विशिष्ट सण-समारंभापुरते मर्यादित नसून, ते ग्राहकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा आणि आत्मअभिव्यक्तीचा एक अविभाज्य भाग बनतात हा कंपनीचा संदेश आहे.
टायटन कंपनी लिमिटेडच्या ‘फ्रॅग्रन्सेस अँड ॲक्सेसरीज’ विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष गुप्ता म्हणाले, “उत्पादनांमध्ये सातत्याने नावीन्य आणून ‘स्किन’ ब्रँडने सुगंधांच्या श्रेणीत आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे. सध्याच्या काळात या बाजारपेठेत महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. नवनवीन सुगंध सादर करण्यावर आणि ग्राहकांसाठी त्यांची सुसंगतता वाढवण्यावर भर देऊन, ‘स्किन’चे ग्राहकांशी असलेले नाते अधिक दृढ करण्याची ही सुवर्णसंधी आहे, असे आम्ही मानतो. आयुषमान आणि शोभिता हे ब्रँड अँबेसेडर म्हणून ‘स्किन’सोबत जोडले गेल्याने, त्यांची स्वतःची लोकप्रियता, सांस्कृतिक सुसंगतता आणि आधुनिक पद्धतीने ग्राहकांशी कनेक्ट होण्याची क्षमता ब्रँडला अधिक बळकट करेल. त्यांच्या या सहभागामुळे आम्हाला हा ब्रँड एका महत्त्वाकांक्षी आणि आधुनिक जीवनशैलीचे प्रतीक म्हणून प्रस्थापित करण्यास मदत होईल.”
आपल्या वृद्धीच्या पुढील टप्प्यामध्ये ‘स्किन’चा सर्वाधिक भर प्रिमियम उत्पादने सादर करण्यावर आणि लोकांच्या दैनंदिन जीवनात सुगंधांची भूमिका विस्तारण्यावर असणार आहे. जागतिक स्तरावर नावाजलेल्या सुगंध तज्ञांच्या सहकार्याने तयार केलेले नवनवीन सुगंध आणि भारतीय बाजारपेठेसाठी विकसित केलेली विशिष्ट सुवासिक उत्पादने, हे या ब्रँडचे नेहमीच मुख्य वैशिष्ट्य राहिले आहे. आयुषमान खुराणा आणि शोभिता धुलिपाला यांच्या ब्रँड अँबेसेडर म्हणून झालेल्या सहभागामुळे या वाटचालीला अधिक बळ मिळणार आहे. याद्वारे ‘स्किन’ला आपला विस्तारत असलेला उत्पादन पोर्टफोलिओ नव्या पिढीच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. सुगंधांचा वापर केवळ विशिष्ट सण-समारंभापुरता मर्यादित न ठेवता, तो प्रत्येक व्यक्तीच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वाची ओळख म्हणून प्रस्थापित करण्यास देखील यामुळे मदत होईल.
एकीकडे आपला व्यवसाय विस्तारत असतानाच, दुसरीकडे भारतातील प्रिमियम सुवासिक उत्पादनांच्या बाजारपेठेतील एक आघाडीचा ब्रँड म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी ‘स्किन’ प्रयत्नशील आहे. याद्वारे जागतिक स्तरावरील सुगंध तंत्रज्ञान आणि कौशल्यांची सांगड भारतीय ग्राहकांच्या मानसिकतेशी तसेच त्यांच्या बदलत्या आवडीनिवडींच्या सखोल आकलनाशी घालण्याची कंपनीची योजना आहे.


