Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयुष्यात एकदाच येणाऱ्या' गुंतवणुकीच्या मागे धावू नका, सूचीबद्ध कंपन्या स्टार्टअप्सची पुढची लाट...

आयुष्यात एकदाच येणाऱ्या’ गुंतवणुकीच्या मागे धावू नका, सूचीबद्ध कंपन्या स्टार्टअप्सची पुढची लाट निर्माण करू शकतात: निलेश शाह

 

 

बेंगळुरू: गुंतवणूकदारांनी पुढील मोठ्या प्रगतीशील कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी हुकण्याची भीती बाजूला ठेवली पाहिजे, कारण आकर्षक संधी सातत्याने निर्माण होत राहतील, असे कोटक ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर निलेश शाह यांनी कोटक प्रायव्हेटच्या टेक अँड काउंटर टेक (टीएसीटी) मध्ये सांगितले. “संपत्ती निर्मितीचे भविष्य सार्वजनिक बाजारपेठांकडून खाजगी बाजारपेठांकडे वळत आहे का?” या विषयावर केवळ निमंत्रितांसाठी आयोजित विचारवंत प्लॅटफॉर्मवर मत व्यक्त करताना शाह यांनी गुंतवणूकदारांना बाजारपेठेतील तात्कालिक चर्चा किंवा घाईगडबडीमुळे आर्थिक शिस्त सोडू नये, असा इशारा दिला. “विक्रेत्या बाजूने ही आयुष्यात एकदाच येणारी संधी असल्याचे सांगितले जात असले, तरी तुम्ही कधीही अशा गुंतवणुकीच्या मागे धावू नये,” असे ते म्हणाले. तसेच एखादी संधी हुकणे म्हणजे कधीही भरून न येणारे नुकसान मानू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

त्यांचा हा युक्तिवाद खाजगी बाजारपेठेतील व्यवहार, आयपीओ आणि उदयोन्मुख गुंतवणूक पर्यायांभोवती निर्माण होणाऱ्या फोमोला आव्हान देतो. प्रत्येक नवीन संधीकडे संपत्ती निर्मितीच्या चक्रात सहभागी होण्याची शेवटची संधी म्हणून पाहण्याऐवजी गुंतवणूकदारांनी संयम बाळगून योग्य निवड केली पाहिजे, असा सल्ला शाह यांनी दिला. उदाहरणाचा वापर करत ते म्हणाले की, एक ट्रेन सुटली, तरी मागून दुसरी ट्रेन येते. यामागचा मुख्य संदेश स्पष्ट होता: एखाद्या अयोग्य गुंतवणुकीमुळे होणारे नुकसान एखादी चांगली संधी हातातून निसटण्याच्या नुकसानापेक्षा खूप जास्त असू शकते.

 

‘स्टार्टअप्स आणि मोठ्या कंपन्यांमधील तफावत कमी होईल’

 

स्टार्टअप्स आणि प्रस्थापित कंपन्यांमधील पारंपरिक तफावत कमी होत असल्याने गुंतवणुकीतील शिस्त विशेष महत्त्वाची ठरू शकते. काही सूचीबद्ध कंपन्या आपल्या संस्थेच्या अंतर्गत स्टार्टअप-शैलीची युनिट्स तयार करत आहेत, याचे वर्णन निलेश शाह यांनी केले, ज्यामध्ये मोठ्या कंपन्यांच्या कारभाराचे अनुकरण न करता स्वतंत्र संस्कृती, कार्यपद्धती आणि नवनिर्मितीची उद्दिष्टे समर्पित टीम्सना दिली जात आहेत.

 

जगभरातील केवळ तीन कंपन्यांद्वारे तयार केला जाणारा विशेष घटक विकसित करू इच्छिणाऱ्या भारतातील एका उत्पादक कंपनीचे उदाहरण देत निलेश शाह म्हणाले की, त्या कंपनीने स्वतंत्र संशोधन आणि विकास युनिट स्थापन केले, ज्यांची “स्वतःची स्वतंत्र संस्कृती, स्वतःच्या कामाच्या वेळा होत्या आणि मुख्यालयाशी थेट संबंध नव्हता.” त्या टीमला स्पष्ट उद्दिष्ट देण्यात आले होते: “हा घ्या निधी, हे आहे तंत्रज्ञान. पुढे जा आणि आपले ध्येय साध्य करा.”

 

पुढच्या पिढीतील वाढीव क्षमता असणाऱ्या व्यवसायांचा शोध घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी याचे मोठे परिणाम होऊ शकतात. नाविन्यता आता केवळ खाजगी निधी मिळवणाऱ्या स्टार्टअप्सपुरती मर्यादित राहणार नाही. पुरेसे भांडवल, वितरण व्यवस्था आणि कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या प्रस्थापित कंपन्या सूचीबद्ध कंपनीची ताकद कायम ठेवून अंतर्गत पातळीवर उद्योजक उपक्रम उभारू शकतात. “मला विश्वास आहे की, स्टार्टअप्स नाविन्यता आणतील आणि मोठ्या कंपन्या निष्प्रभ ठरतील ही तफावत आता हळूहळू कमी होईल,” असे शाह म्हणाले.

 

‘भारतात पीई फंड्स अस्तित्वात येण्यापूर्वीपासून खाजगी इक्विटी अस्तित्वात होती’

 

शाह यांनी खाजगी इक्विटी तुलनेने अलीकडचे किंवा परदेशातून आयात केलेले गुंतवणूक मॉडेल आहे, या पारंपरिक समजूतीला देखील आव्हान दिले. ते म्हणाले की, भारतात कुटुंब, वैयक्तिक नातेसंबंध आणि व्यावसायिक समुदायांभोवती केंद्रित झालेली अनौपचारिक खाजगी इक्विटी संस्कृती खूप जुनी आहे. “एका नातेवाईकाने दुसऱ्या नातेवाईकाला व्यवसाय सुरू करण्यासाठी सीड मनी देणे, ही देखील एक प्रकारची खाजगी इक्विटी आहे,” असे ते म्हणाले.

 

ऐतिहासिकदृष्ट्या असे भांडवल वैयक्तिक ओळखीच्या माध्यमातून गुंतवले जात असले, तरी शाह यांनी आता गुंतवणूक अधिक सुसंरचित आणि व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित होण्याची मोठी संधी निदर्शनास आणली. “एकेकाळी कुटुंबापुरते मर्यादित होते, ते आता व्यावसायिक पातळीवर समुदायाचा भाग बनत आहे,” असे ते म्हणाले. “मला खात्री आहे की, हे मॉडेल यशस्वी झाले, तर इतर समुदायही त्याचे नक्कीच अनुकरण करतील.”

 

एकत्रित, या ट्रेण्‍ड्समधून भारतात संपत्ती निर्मितीचा प्रवास बदलत असल्याचे निदर्शनास येते. संपत्ती निर्मितीच्या संधी केवळ पारंपरिक स्टार्टअप्स किंवा सार्वजनिक बाजारपेठेतील मोठ्या कंपन्यांकडून येतील असे नाही, तर सूचीबद्ध कंपन्यांमधील उपक्रमशील युनिट्स आणि व्यावसायिकरित्या व्यवस्थापित होणाऱ्या समुदाय भांडवलातूनही मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतात. गुंतवणूकदारांसाठी शाह यांनी गुंतवणूकीमधील शिस्तीसंदर्भात सल्ला दिला की, संधी सातत्याने निर्माण होत राहतील, पण प्रत्येक संधीच्या मागे धा

वण्याची गरज नाही.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments