Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedवडोदऱ्यात रंगणार '१ ले सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलन'! ...

वडोदऱ्यात रंगणार ‘१ ले सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलन’!  २५ ऑक्टोबर रोजी संमेलन; गुजरातमध्ये होणार मराठीचा जागर

 

 

२५ ऑक्टोबर रोजी संमेलन; गुजरातमध्ये होणार मराठीचा जागर

 

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे ऐतहासिक २०० वे मराठी साहित्य संमेलन

 

रंजनादेवी भोईटे स्वागताध्यक्ष, तर मानसी म्हसकर निमंत्रक

 

पुणे, ०१ ऑक्टोंबर २०२६ : कला, संस्कृती आणि मराठी साहित्याला राजाश्रय देऊन समृद्ध करणारे थोर विचारवंत महाराजा सयाजीराजे गायकवाड यांच्या ऐतिहासिक कर्मभूमीत, म्हणजेच गुजरात मधील वडोदरा येथे ‘१ ले सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलन’ मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने हे संमेलन २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आले असल्याची अधिकृत माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली.

 

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे आजवरचे हे ऐतिहासिक

२०० साहित्य संमेलन आहे,

महाराजा सयाजीराजे गायकवाड यांनी आपल्या कारकिर्दीत शिक्षण, ग्रंथालये आणि मराठी साहित्याच्या प्रसारासाठी अभूतपूर्व योगदान दिले. त्यांनी मराठी भाषेचा आणि साहित्यिकांचा नेहमीच गौरव केला. त्यांच्या याच ऐतिहासिक योगदानाला उजाळा देण्यासाठी आणि गुजरात मधील मराठी भाषक तसेच रसिकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या विशेष संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

प्रमुख जबाबदाऱ्यांची घोषणा:

या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्य परिषदेच्या गुजरात प्रदेश उपाध्यक्ष रंजनादेवी भोईटे यांची तर संमेलनाच्या निमंत्रकपदी परिषदेच्या कार्यक्षम प्रदेश सरचिटणीस मानसी म्हसकर यांची निवड करण्यात आली आहे.

 

संमेलनाचे स्वरूप आणि कार्यक्रम:

ऐतिहासिक वडोदरा नगरीत होणाऱ्या या १ ल्या सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात पारंपरिक ग्रंथपूजानाने व ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर भव्य उद्घाटन समारंभ, विविध वैचारिक विषयांवरील परिसंवाद आणि रसाळ कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

 

या संमेलनामुळे महाराष्ट्र आणि गुजरात मधील सांस्कृतिक व साहित्यिक नाते अधिक दृढ होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या सोहळ्यास महाराष्ट्र आणि गुजरातमधून मोठ्या संख्येने साहित्यिक, लेखक, कवी आणि रसिक प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments