१ ऑक्टोबर २०२६– ट्रेडिंगचे प्रमाण आणि वापरकर्त्यांची संख्या यानुसार जगातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज असलेल्या Binance दक्षिण आशियातील वापरकर्त्यांसाठी ‘अकॅडेमेनिया स्किल-अप’ या मोफत, सहा महिन्यांच्या शिक्षण मोहिमेची घोषणा केली आहे. दर महिन्याला सहभागी वापरकर्ते बायनान्स अकॅडमीचा (Binance Academy) निवडक अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवू शकतात आणि बक्षिसांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सोडतीत सहभागी होऊ शकतात. सुलभ आणि स्वतःच्या गतीने पूर्ण करता येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून ब्लॉकचेन आणि डिजिटल ॲसेट्सचे मूलभूत ज्ञान विकसित करण्यासाठी नवशिक्या वापरकर्त्यांना मदत करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
या उपक्रमातून उद्योगासमोरील एका व्यापक वास्तवाकडे लक्ष वेधले जाते: क्रिप्टोचा स्वीकार हा क्रिप्टोविषयक साक्षरतेपेक्षा वेगाने वाढत आहे. Chainalysis च्या 2026 ग्लोबल क्रिप्टो अॅडॉप्शन इंडेक्सनुसार, तळागाळात क्रिप्टो स्वीकाराच्या बाबतीत भारत जगात सहाव्या क्रमांकावर, तर व्यवहारांच्या प्रमाणाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनेकदा सोशल मीडियावरील चर्चांमुळे किंवा मित्र-परिचितांच्या शिफारसींमुळे लाखो प्रथमच वापरकर्ते बाजारपेठेत प्रवेश करत असले तरी त्यांच्यापैकी अनेकांना वॉलेटची सुरक्षितता, फसवणूक ओळखणे किंवा ब्लॉकचेनची कार्यपद्धती याबाबत मूलभूत ज्ञान नसते. क्रिप्टोचा स्वीकार वाढत असताना प्रोत्साहनपर शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाला पूर्वअट बनवून बायनान्स या परिस्थितीला प्रतिसाद देत आहे.
“आजची दरी प्रवेशाची नाही—तर समजून घेण्याची आहे,” असे बायनान्स मधील APAC प्रमुख एसबी सेकर (SB Seker, Head of APAC, Binance) यांनी सांगितले. “नवीन सुरुवात करणाऱ्या व्यक्तीसाठी दोन तासांचा अभ्यासक्रम एखादी फसवणूक ओळखणे आणि आपली बचत गमावणे यातील फरक ठरू शकतो. अकॅडेमेनिया स्किल-अप हा पहिला टप्पा उचलण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे. मूलभूत ज्ञान विकसित करून लोकांना केवळ उत्सुकतेपोटी नव्हे, तर आत्मविश्वासाने क्रिप्टोकडे पाहता यावे, हा त्यामागचा उद्देश आहे.”
याचे काम कसे चालते
● शिका: सबमिशनच्या कालावधीत त्या महिन्यासाठी निवडलेला बायनान्स अकॅडमीचा (Binance Academy) अभ्यासक्रम (मोफत आणि स्वतःच्या गतीने पूर्ण करता येणारा) पूर्ण करा.
● शेअर करा: अंतिम मुदतीपूर्वी आपले प्रमाणपत्र X आणि Binance Square वर पोस्ट करा.
● जिंका: दर महिन्याला यादृच्छिक पद्धतीने 10 सहभागींची निवड करण्यात येईल. त्यांना 10 USDT स्पॉट व्हाउचर मिळेल—हे स्टेबलकॉइन क्रेडिट थेट त्यांच्या बायनान्स खात्यात (Binance Account) जमा केले जाईल.
हा कार्यक्रम सहा मासिक सत्रांमध्ये आयोजित केला जाईल आणि प्रत्येक सत्रात वेगळा अभ्यासक्रम असेल. पहिल्या सत्रात (23 सप्टेंबरपासून लाइव्ह) मध्ये Beginner Track समाविष्ट आहे. यामध्ये ब्लॉकचेनची मूलभूत माहिती, DeFi, Web3 आणि ट्रेडिंगच्या संकल्पनांचा समावेश आहे. सहभागीांनी 5 ऑक्टोबरपर्यंत प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे आणि विजेत्यांची घोषणा 15 ऑक्टोबर रोजी केली जाईल. दुसऱ्या सत्रात ‘एआय अनलॉक्ड: एजंट्स अँड स्किल्स’ हा अभ्यासक्रम असेल. मासिक अभ्यासक्रमांच्या घोषणांसाठी वापरकर्ते X वरील @BinanceForIN and @BinanceDesi तसेच Binance South Asia Square चॅनेल फॉलो करू शकतात.
अकॅडेमेनिया स्किल-अप मुळे भारतातील Binance शिक्षणविषयक उपक्रमांचा विस्तार होत आहे. यामध्ये बायनान्स अकॅडमी (Binance Academy) (स्वतःच्या गतीने पूर्ण करता येणारे अभ्यासक्रम), बायनान्स ब्लॉकचेन यात्रा (Binance Blockchain Yatra) (समुदायापर्यंत पोहोचण्याचा उपक्रम) आणि बायनान्स केस चॅलेंज (Binance Case Challenge) (विद्यापीठांशी भागीदारी) यांचा समावेश आहे. या कार्यक्रमांपेक्षा वेगळे म्हणजे अकॅडेमेनिया चा उद्देश अगदी नवशिक्या वापरकर्त्यांपर्यंत पोहोचणे आणि सहभाग वाढवण्यासाठी प्रोत्साहनांचा वापर करणे हा आहे. ही पद्धत Web3 मधील ‘लर्न टू अर्न’ या प्रवाहाशी साधर्म्य साधते, मात्र येथे तिचा वापर मूलभूत साक्षरता विकसित करण्यासाठी केला जात आहे.
अटी व शर्ती
या उपक्रमात प्रवेश घेताना किंवा सहभागी होताना, प्रत्येक प्रवेशकर्ता किंवा सहभागी (“Entrant”) या अटी व शर्ती (“Terms and Conditions”) तसेच Binance निर्णयांना संमती देतो. हे निर्णय सर्व बाबतीत अंतिम आणि बंधनकारक असतील.
आपला सहभाग निश्चित करण्यासाठी सर्व कार्ये पूर्ण करा.
या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी दक्षिण आशियातील केवळ व्हेरीफाईड युजर्स पात्र असतील
या घोषणेत नमूद केलेल्या सर्व आवश्यकता पूर्ण केलेली व्यक्ती पात्र सहभागी असेल.
चॅलेंज समाप्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत विजेत्यांची घोषणा केली जाईल
चॅलेंज समाप्त झाल्यानंतर 60 कार्यदिवसांच्या आत बक्षिसांचे वितरण केले जाईल
Binance आपल्या एकमेव स्वविवेकाधिकारानुसार कोणताही उपक्रम किंवा उपक्रमाचा नियम रद्द करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा अधिकार आहे
Binance वाजवी मतानुसार कोणताही सहभागी फसवणुकीच्या मार्गाने किंवा लागू असलेल्या कोणत्याही अटी व शर्तींचे पालन न करता कार्यरत असल्याचे आढळल्यास, अशा सहभागीला अपात्र ठरवण्याचा अधिकार बायनान्स राखून ठेवते
कोणत्याही वापरकर्त्याने किंवा विजेत्याने लागू असलेल्या कोणत्याही अटी व शर्तींचा भंग केला असल्याचे बायनान्सला आपल्या पूर्ण आणि एकमेव स्वविवेकाधिकारानुसार आढळल्यास, कोणतेही बक्षीस रद्द करण्याचा अधिकार Binance राखून ठेवते.
Binance ला कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणत्याही वेळी आपल्या पूर्ण आणि एकमेव स्वविवेकाधिकारानुसार या अटी व शर्ती निश्चित करण्याचा आणि/किंवा त्यात सुधारणा किंवा बदल करण्याचा अधिकार आहे. यामध्ये हा उपक्रम रद्द करणे, त्याचा कालावधी वाढवणे, तो समाप्त करणे किंवा स्थगित करणे, पात्रतेच्या अटी व निकषांमध्ये बदल करणे, विजेत्यांची निवड व संख्या बदलणे तसेच कोणतीही कृती करण्याची वेळ बदलणे यांचा समावेश आहे. सर्व सहभागी या सुधारणांना बांधील असतील
या प्रमोशनचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिका
र Binance राखून ठेवत आहे.


