Monday, October 5, 2026
Google search engine
HomeUncategorized*सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम* *केंद्रीय गुप्तचर...

*सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम* *केंद्रीय गुप्तचर विभागात उच्च पदावर नियुक्ती मिळविलेल्या माजी विद्यार्थ्याचा समाजकल्याण विभागाच्या वतीने गौरव*

 

 

पुणे, दि.५ : दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत समाजकल्याण विभागाच्या वतीने ‘आशीर्वादाचा दिवा’ हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, युनिट क्र. १, विश्रांतवाडी येथे सन २०२३ ते २०२६ या कालावधीत एलएल.बी.चे शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी वैभव डोईजड यांची केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरो (IB) या गुप्तचर विभागात उच्च पदावर नियुक्ती बद्दल व त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल समाजकल्याण विभागाच्या वतीने शासकीय वसतिगृहाच्या कार्यालयात गृहप्रमुख श्रीमती विजयश्री बाबर यांच्या हस्ते वैभव डोईजड यांचा सत्कार करण्यात आला.

 

या प्रसंगी वैभव डोईजड यांनी विद्यार्थ्यांसमोर आपली यशोगाथा आणि शैक्षणिक प्रवासातील अनुभव मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय निश्चित करणे, सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर यश संपादन करण्याचा प्रेरणादायी संदेश त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

 

या यशोगाथेमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आणि जीवनात उच्च ध्येय गाठण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल असा विश्वास श्रीमती बाबर यांनी व्यक्त केला.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments