Monday, October 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedमेकमायट्रिपचे नवीन लाँच करण्यात आलेले Price Drop Protection बुकिंगनंतर विमान तिकिटाचे दर...

मेकमायट्रिपचे नवीन लाँच करण्यात आलेले Price Drop Protection बुकिंगनंतर विमान तिकिटाचे दर कमी झाल्यास प्रवाशांना परतावा देते

 

Price Drop Protection तिकिटाचे दर कमी झाल्यास त्यातील फरकाची रक्कम प्रवाशांना परत करते, ज्यामुळे प्रवाशांना आधीच आणि आत्मविश्वासाने प्रवासाचे नियोजन करून बुकिंग करण्यास प्रोत्साहन मिळते.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय, तसेच वन-वे (एकमार्गी) आणि राउंड-ट्रिप बुकिंग्सवर उपलब्ध.

राष्ट्रीय, October 05, 2026: भारतातील प्रवासी ट्रिपचे नियोजन करताना बुकिंग नेमके कधी करावे याचा काळजीपूर्वक विचार करतात, ज्यामध्ये तिकिटांच्या दरांवर लक्ष ठेवणे, त्वरित बुकिंग करावे की आणखी वाट पाहावी हे ठरवणे आणि बुकिंग कन्फर्म झाल्यानंतर दर कमी होईल का, याबाबत अनेकदा साशंक राहणे यांचा समावेश होतो. तिकिटांच्या दरांशी संबंधित ही चिंता कमी करण्यासाठी, मेकमायट्रिपने लाँच केलेल्या Price Drop Protection या नवीन वैशिष्ट्याअंतर्गत, बुकिंग कन्फर्म झाल्यानंतर विमानाचे भाडे कमी झाल्यास त्यातील फरकाची रक्कम परत दिली जाते. या वैशिष्ट्यामुळे प्रवासी आत्मविश्वासाने लवकर बुकिंग करू शकतात, कारण उड्डाणापूर्वी कमी दर उपलब्ध झाल्यास त्यांना त्याचा लाभ मिळेल.

भारतातील प्रवाशांची ही सावध विचारसरणी त्यांच्या बुकिंग करण्याच्या पद्धतीवरून स्पष्टपणे दिसून येते. प्रवासी अंतिम बुकिंग करण्यापूर्वी एकाच फ्लाइटचे दर अनेक वेळा तपासतात. आणि शेवटी ते बुकिंग करतात, तेव्हा बहुतेकदा प्रवासाची तारीख अगदी जवळ आलेली असते.

प्रवासी ट्रिपचे नियोजन करत असताना वारंवार भाडे तपासतात, कारण त्यांच्या प्रवासाच्या योजना अद्याप निश्चित होत असतात; वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होऊ शकतात आणि त्यांना शक्य तितके चांगले भाडे मिळवायचे असते. यामुळे बराच काळ भाडे शोधत राहणे आणि उशिरा बुकिंग करणे याला चालना मिळते. Price Drop Protection वैशिष्ट्य ही अनिश्चितता कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना लवकर नियोजन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.

हे वैशिष्ट्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी वन-वे व राउंड-ट्रिप बुकिंगवर उपलब्ध आहे. बुकिंग करताना प्रवासी Price Drop Protection वर क्लिक करून हा पर्याय निवडू शकतात, ज्याचे शुल्क देशांतर्गत फ्लाइट्ससाठी प्रति व्यक्ती 229 रुपये आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी प्रति व्यक्ती 349 रुपयांपासून सुरू होते. चाचणी टप्प्यात सादर झाल्यापासून या वैशिष्ट्याला प्रवाशांमध्ये उत्तरोत्तर पसंती मिळत गेली आहे. हा पर्याय निवडलेल्या प्रवाशांपैकी उत्साहवर्धक संख्येने प्रवाशांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही फ्लाइट्सवर भाड्यात घट दिसून आली, ज्यातून बुकिंग करताना अधिक खात्रीची अपेक्षा असणाऱ्या प्रवाशांमध्ये या वैशिष्ट्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

मेकमायट्रिपचे फ्लाइट्स, कॉर्पोरेट, जीसीसी आणि मार्केटिंग विभागाचे सीओओ राज ऋषी सिंग म्हणाले, “प्रवाशांनी लवकर बुकिंग करणे आणि त्यानंतर भाडे कमी होण्याची चिंता करणे, यापैकी एकाची निवड करण्याची गरज नाही. Price Drop Protection मुळे प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार बुकिंग करण्याचे स्वातंत्र्य मिळते, तसेच भाडे कमी झाल्यास त्यांना त्याचे संरक्षण मिळेल, याची खात्री मिळते. प्रवासाचे नियोजन करताना अधिक लवचिकता आणि मनःशांती देण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.”

भाड्यातील फरकावर मिळणारा कमाल परतावा देशांतर्गत फ्लाइट्ससाठी प्रति व्यक्ती 2,500 रुपये आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी प्रति व्यक्ती 3,000 रुपये आहे. हे वैशिष्ट्य बुकिंग केल्याच्या वेळेपासून उड्डाणाच्या वेळेपूर्वी सहा तासांपर्यंत भाड्यात होणारी घट कव्हर करते. या कालावधीत भाडे कमी झाल्यास मेकमायट्रिप थेट संबंधित प्रवाशाला सूचित करते. परताव्याची रक्कम प्रवाशाने पैसे भरण्यासाठी वापरलेल्या मूळ पेमेंट स्रोतामध्ये जमा केली जाते.

Price Drop Protection मेकमायट्रिपच्या विद्यमान फ्लाइट अॅश्युरन्स सूटमध्ये सामील झाले आहे, ज्यामध्ये Zero Cancellation आणि Free Date Change यांचा समावेश आहे. या नवीन लाँचसह, हा सूट आता केवळ तिकीट रद्द करणे आणि प्रवासाच्या तारखांमधील बदलांपुरती मर्यादित न राहता बुकिंगनंतर दरांमध्ये होणाऱ्या बदलांना देखील क

व्हर करते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments