पिंपरी
लहान मुलांची तसेच थोरामोठ्यांची ही जिज्ञासा वाढवणारे ज्ञान, कुतूहल आणि मनोरंजनाचा अनोखा संगम असलेल्या टायटॅनिक प्रदर्शनाचे बुधवारी मुकाई चौक रावेत येथे शानदार उद्घाटन होत आहे.
टायटॅनिक हा जगभरातील प्रत्येकाचाच अतिशय कुतूहलाचा विषय आहे या विषयावर निघालेला चित्रपट देखील अतिशय लोकप्रिय ठरला. या चित्रपटातून टायटॅनिक जहाजाच्या अपघाताची आणि तत्कालीन परिस्थितीचे अवलोकन प्रेक्षकांना करता आले असले तरी या टायटॅनिक चा इतिहास मात्र तितकासा कोणाला ज्ञात नाही.
डी जे एम्युजमेंट या कंपनीने या टायटॅनिक जहाजाचा अपूर्व देखावा पिंपरी चिंचवड मधील लोकांसाठी उभा केला असून या देखाव्यात प्रत्यक्ष जहाजात वावरल्याचा अनुभव घेता येणार आहे.
टायटॅनिक हे जहाज कोणत्या कंपनीने बनवले कोणत्या वर्षी ते बनवण्यास घेतले केव्हा हे जहाज बनवून पूर्ण झाले त्याची पहिली सफर केव्हा झाली? हे जहाज कशाप्रकारे होते या कंपनीचे मालक कोण होते तसेच जहाजाचे कॅप्टन कोण होते याबाबतची सविस्तर माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना होणार आहे.
या अभूतपूर्व ज्ञानरंजनाबरबरच या प्रदर्शनात हॅण्डलूम, हँडीक्राफ्ट, विविध प्रकारची खेळणी, पुस्तके, फूड स्टॉल अशा विविध प्रकारच्या 35 स्टॉल्स या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
याचबरोबर लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या राइड्स उपलब्ध करून दिले आहेत जेणेकरून ज्ञान कुतूहल यासोबतच मनोरंजनाचा खजिना या अनोख्या टायटॅनिक प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुकाई चौक येथे अतिशय मध्यवर्ती ठिकाणी भव्य अशा स्वरूपात उभारलेले हे प्रदर्शन पिंपरी चिंचवड करा साठी अविस्मरणीय अशी भेट ठरणार आहे येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंगची ही भव्य उपलब्धता येथे करून दिले आहे.
बुधवार दिनांक 7ऑक्टोबर रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन स्थानिक नगर सदस्य निलेश तरस, धर्मपाल तंतरपाळे, ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, उद्योजक राम दयाळ गुप्ता, डी जे ॲम्युजमेंटचे सी के दिनेश कुमार, सी के जयप्रकाश, सुदेश कुमार आदी प्रमुख यावेळी उपस्थित राहणार आहेत.


