Tuesday, October 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमाजाच्या स्थैर्यासाठी हवे सक्षम कुटुंब : मृणालिनी चितळे ‘दृष्टी’च्या ‘विवाह कुटुंबसंस्थेचा...

समाजाच्या स्थैर्यासाठी हवे सक्षम कुटुंब : मृणालिनी चितळे ‘दृष्टी’च्या ‘विवाह कुटुंबसंस्थेचा पाया’ विशेषांकाचे प्रकाशन   

 

 

पुणे, ता. ६ : “विवाहामुळे कुटुंबसंस्था स्थिर राहते आणि स्थिर समाजासाठी कुटुंबसंस्था सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. पती-पत्नीमधील परस्पर संवाद हाच विवाह टिकवण्याचा खरा मंत्र आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका मृणालिनी चितळे यांनी केले.

 

दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘विवाह कुटुंबसंस्थेचा पाया’ या विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी आयोजित परिचर्चेत ‘अनुरूप विवाह संस्थे’च्या संस्थापक डॉ. गौरी कानिटकर, लेखक डॉ. आशुतोष जावडेकर, दिग्दर्शक व अभिनेता विराजस कुलकर्णी तसेच अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी सहभाग घेतला. वसुंधरा काशीकर यांनी उपस्थितांची मुलाखत घेतली. परिचर्चेदरम्यान वक्त्यांनी नमूद केले की, भारतातील तरुण पिढीचा विवाह संस्थेवर अजूनही दृढ विश्वास आहे. नवीन नाते स्वीकारताना आजचे तरुण अधिक सावधपणे निर्णय घेतात. ‘डबल इन्कम नो किड’ (DINK) किंवा ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ यांसारख्या पाश्चात्त्य संकल्पनांपेक्षा एकमेकांना समजून घेऊन केलेला संसार माणसाला भावनिक व मानसिकदृष्ट्या समृद्ध करतो.

 

– विशेषांकात वैविध्यपूर्ण विषयांवर मंथन :

विशेषांकात विवाह संस्थेचा इतिहास, विविध धर्मांतील विवाह पद्धती व कायदे, जागतिक स्थिती, वनवासी व भटक्या-विमुक्त समाजातील परंपरा, जोडीदार निवडीचे निकष आणि विवाहपूर्व समुपदेशन यांवर मान्यवर लेखकांचे लेख समाविष्ट आहेत. तसेच पद्मश्री मिलिंद कांबळे – सीमा कांबळे, रंजना व प्रमोद करंदीकर (शबरी सेवा समिती), कॅप्टन मीरा दवे आणि पत्रकार सिद्धार्थ दवे यांच्या विशेष मुलाखतींचाही यात समावेश आहे.

 

प्रारंभी रंजना खरे यांनी ‘दृष्टी’ संस्थेच्या कार्यप्रणालीचा आढावा घेतला. स्वाती लेले यांनी अंकाचा विस्तृत परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी डोखळे यांनी केले, तर शुभांगी तांबट यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments