Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव शोधण्याचे आवाहन*

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव शोधण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. ७ : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची ऑनलाइन पद्धतीने पडताळणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदारांना घरबसल्या आपले नाव शोधता यावे, यासाठी mahaelection.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

मतदारांनी Google वर mahaelection.gov.in हे संकेतस्थळ उघडून Electoral Registration या पर्यायामध्ये जावे. त्यानंतर Graduate किंवा Teachers यापैकी संबंधित मतदारसंघाची निवड करून नाव शोधता येईल.

 

नाव शोधण्यासाठी Acknowledgement Number, Current Roll, Final Roll तसेच District–Taluka–Name अशा विविध पर्यायांचा वापर करता येतो.

Acknowledgement Number उपलब्ध नसल्यास जिल्हा, तालुका आणि मतदाराचे नाव टाकूनही शोध घेता येतो. यासाठी आवश्यक कॅप्चा भरल्यानंतर Search केल्यास संबंधित मतदाराची नोंद, मतदान केंद्र तसेच इतर तपशील दिसून येतात.

 

पुणे पदवीधर मतदारसंघाची अंतिम मतदार यादी १२ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतरची पूरक मतदार यादी १२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार असल्याने, त्यानंतर मतदारांनी पुन्हा एकदा आपले नाव आणि मतदान केंद्राची माहिती तपासून घेणे आवश्यक आहे. पूरक यादीमुळे पत्ता अथवा भाग क्रमांकामध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने अंतिमतः प्रसिद्ध झालेल्या यादीतील तपशीलाची खात्री करावी.

मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments