– प्रॅट अँड व्हिटनी कॅनडा भारतातून सोर्सिंग वाढवत असताना, भारत फोर्जचे विश्वासार्ह जागतिक एरोस्पेस भागीदार म्हणून स्थान अधोरेखित करणारा करार –
भारत, 5 ऑक्टोबर 2026: प्रगत फोर्जिंग आणि अचूक अभियांत्रिकी क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी भारत फोर्ज लिमिटेड (BFL) ने जगप्रसिद्ध एरोस्पेस इंजिन उत्पादक प्रॅट अँड व्हिटनी कॅनडासोबत मिशन-क्रिटिकल एरोस्पेस इंजिन घटकांच्या पुरवठ्यासाठी दीर्घकालीन करार केला आहे.
या घटकांचे उत्पादन भारत फोर्जच्या भारतातील अत्याधुनिक एरोस्पेस सुविधा केंद्रात केले जाणार आहे. उच्च कार्यक्षमतेची आणि उच्च मूल्याची एरो-इंजिन उत्पादने तयार करण्यासाठी ही सुविधा केंद्रे विशेषतः विकसित करण्यात आली आहेत. या सुविधा केंद्रात प्रगत उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, एरोस्पेस उद्योगासाठी आवश्यक असलेल्या गुणवत्ता, अचूकता, विश्वासार्हता आणि ट्रेसेबिलिटीच्या सर्वोच्च जागतिक मानकांनुसार तिचे संचालन केले जाते.
भारत फोर्ज लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी म्हणाले, “प्रॅट अँड व्हिटनी कॅनडासोबतची ही दीर्घकालीन भागीदारी जागतिक एरोस्पेस पुरवठा साखळीतील भारत फोर्जच्या नेतृत्वाचे द्योतक आहे. प्रगत उत्पादन, उत्कृष्ट कामकाज आणि गुणवत्तेच्या कोणत्याही तडजोडीशिवाय असलेल्या मानकांद्वारे जागतिक दर्जाच्या एरोस्पेस उपायसुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या बांधिलकीचे हे प्रतिक आहे. प्रॅट अँड व्हिटनी कॅनडाच्या कार्यक्रमांना पाठबळ देण्यासाठी आणि एरोस्पेस उत्पादनातील भारताच्या तांत्रिक कौशल्याला पुढे नेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
प्रॅट अँड व्हिटनी कॅनडाच्या पुरवठा साखळीच्या उपाध्यक्ष नथाली रिव्हेट म्हणाल्या, “भारत फोर्जसोबतचे हे सहकार्य आमच्या ग्राहकांना आणि भविष्यातील वाढीच्या महत्त्वाकांक्षांना पाठबळ देणारी लवचिक आणि उच्च कार्यक्षमतेची जागतिक पुरवठा साखळी उभारण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. भारत फोर्जच्या उच्च कार्यक्षमतेच्या एरोस्पेस उत्पादन क्षमता, तांत्रिक उत्कृष्टता आणि आमच्या विशेष गरजांशी सुसंगत असलेल्या गुणवत्तेप्रती भक्कम बांधिलकी यांवर आमचा विश्वास आहे. यामुळे भारतातून आमच्या पुरवठा साखळीतील सोर्सिंग अधिक मजबूत होण्यास मदत होईल.”
या भागीदारीतून आघाडीच्या एरोस्पेस OEM कंपन्यांचा भारत फोर्जच्या अभियांत्रिकी कौशल्यावर आणि उत्पादनातील उत्कृष्टतेवर असलेला विश्वास दिसून येतो. तसेच जागतिक एरोस्पेस उद्योगाच्या कठोर कार्यक्षमता आवश्यकतांची पूर्तता करणारी मिशन-क्रिटिकल उच्च-मूल्याची सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्याची कंपनीची बांधिलकीही यातून दिसून येते.


