Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedएनआरएआयकडून आज महाराष्ट्रात तिसऱ्या विभागाची सुरुवात; पश्चिम महाराष्ट्रातील रेस्टॉरंट उद्योगाला मिळाला अधिक...

एनआरएआयकडून आज महाराष्ट्रात तिसऱ्या विभागाची सुरुवात; पश्चिम महाराष्ट्रातील रेस्टॉरंट उद्योगाला मिळाला अधिक बुलंद आवाज 

 

सहा जिल्ह्यांतील रेस्टॉरंट व हॉस्पिटॅलिटी भागधारकांना एकत्र आणले, ज्यासह उद्योग क्षेत्रात सहयोग वाढवण्यात येईल, प्रादेशिक आव्हानांचे निराकरण करण्यात येईल आणि विकासाला गती देण्यात येईल

कोल्हापूर, ऑक्टोबर 08,2026: नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने (एनआरएआय) कोल्हापुरात आपल्या पश्चिम महाराष्ट्र चॅप्टरची सुरुवात करून महाराष्ट्रातील आपली उपस्थिती अधिक दृढ केली आहे. संघटनेचे हे राज्यातील तिसरे चॅप्टर आहे, ज्याद्वारे संघटनेच्या प्रादेशिक नेटवर्कचा अधिक विस्तार झाला आहे. प्रमुख अतिथी महामहीम श्रीमंत सौ. मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत या चॅप्टरचा शुभारंभ करण्यात आला. हा विभाग उद्योग क्षेत्रातील सहयोग अधिक दृढ करण्यासाठी आणि या भागातील अन्न सेवा परिसंस्थेला आकार देणाऱ्या संधी व आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील रेस्टॉरंट मालक, ऑपरेटर्स आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील भागधारकांना सामायिक प्लॅटफॉर्मवर एकत्र आणतो.

पश्चिम महाराष्ट्र भारतातील रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी महत्त्वाचे विकास केंद्र म्हणून उदयास येत आहे, ज्याला येथील समृद्ध खाद्यसंस्कृती, उद्योजक परिसंस्था, पर्यटन क्षमता आणि विस्तारणारा ग्राहक वर्ग यांचा पाठिंबा मिळत आहे. देशांतर्गत पर्यटनाकडे वाढणारा कल द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील रेस्टॉरंट्स आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायांसाठी अधिक संधी दर्शवत आहे, तसेच ग्राहकांच्या बदलत्या मागणीनुसार स्थानिक व्यवसायांना वाढण्यासाठी व विकसित होण्यासाठी नवे मार्ग निर्माण करत आहे. हे नवीन चॅप्टर या भागातील रेस्टॉरंट समुदायाला संपूर्ण उद्योग परिसंस्थेशी जोडेल, तसेच बाजारपेठेतील विशिष्ट आव्हानांवर मात करण्यासाठी आणि माहिती व सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी प्रबळ प्लॅटफॉर्म तयार करेल.

एनआरएआयचे व्हाईस प्रेसिडंट आणि मिंट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर प्रणव रुंगटा म्हणाले, “भारतातील रेस्टॉरंट उद्योग अधिक व्यापक आणि वैविध्यपूर्ण बाजारपेठांमध्ये विस्तारत आहे, जिथे प्रादेशिक परिसंस्था या क्षेत्राला स्वतःची ताकद, ग्राहकांचे विचार आणि उद्योजक ऊर्जा प्रदान करत आहेत. देशांतर्गत पर्यटनातील वाढ या बदलामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे, द्वितीय व तृतीय श्रेणीच्या केंद्रांमध्ये मागणी निर्माण करत आहे, तसेच स्थानिक रेस्टॉरंट परिसंस्थेला विकसित व विस्तारित होण्यास सक्षम बनवत आहे. एनआरएआयमध्ये आमचे या बाजारपेठांमध्ये उद्योगाशी संबंधित चर्चा अधिक सखोल करण्यावर आणि प्रादेशिक व्यवसाय व संपूर्ण रेस्टॉरंट परिसंस्था यांच्यामध्ये अधिक दृढ संबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित आहे. पश्चिम महाराष्ट्र या नेटवर्कमध्ये वैशिष्ट्यपूर्ण खाद्य व आदरातिथ्य संस्कृती आणतो आणि या चॅप्टरचा शुभारंभ या प्रदेशासोबत आमचा संवाद अधिक दृढ करतो. विदर्भासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांसह संपूर्ण महाराष्ट्रात आमची उपस्थिती अधिक विस्तारत असताना आम्ही आणखी प्रादेशिक रेस्टॉरंट समुदायांना या व्यापक उद्योग नेटवर्कमध्ये आणण्यासाठी उत्सुक आहोत.”

एनआरएआय पश्चिम महाराष्ट्राचे चॅप्टर हेड पार्थ उज्ज्वल नागेशकर म्हणाले, “पश्चिम महाराष्ट्रात प्रबळ आणि विकसित होणारी अन्न व आदरातिथ्य परिसंस्था आहे, ज्यामध्ये बदलत्या ग्राहकांच्या अपेक्षांशी जुळवून घेताना स्वतःची वेगळी खाद्य ओळख जपणारे व्यवसाय आहेत. या चॅप्टरचा शुभारंभ म्हणजे या वैविध्यपूर्ण समुदायाला एकत्र आणण्याची, या भागातील व्यवसायांना एकमेकांशी जोडण्याची आणि सहयोग व विकासासाठी अधिक मार्ग निर्माण करण्याची उत्तम संधी आहे. या भागातील रेस्टॉरंट व्यवसायांचे प्राधान्यक्रम समजून घेणे, त्यांना एकमेकांकडून शिकण्यास सक्षम करणे आणि भारतातील रेस्टॉरंट उद्योगाला आकार देणाऱ्या व्यापक चर्चांमध्ये योगदान देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रबळ प्लॅटफॉर्म तयार करणे यावर आमचा भर असेल.”

या चॅप्टरच्या शुभारंभानिमित्त उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी कार्यशाळा आणि चर्चांचे सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये आजच्या काळात रेस्टॉरंट व्यवसायांसमोरील प्रमुख प्राधान्यक्रम, जसे कर्मचारी भरती व कौशल्य, महानगरांच्या पलीकडे व्यवसायाचा विस्तार करणे, तसेच रेस्टॉरंट्स आणि अॅग्रीगेटर्समधील बदलणारे संबंध यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

या कार्यक्रमाची सांगता “स्ट्रॉन्गर टूगेदर: बिल्डिंग द फ्युचर ऑफ रेस्टॉरंट्स” पॅनेल चर्चेने झाली. यामध्ये प्रणव रुंगटा, प्रफुल्ल चांदवरकर, निशित पांडे, अनुराग कटरियार सहभागी झाले होते आणि सायली जहागीरदार यांनी याचे सूत्रसंचालन केले. या चर्चेत तंत्रज्ञान आणि एआय, ग्राहकांचे बदलणारे वर्तन, महानगरांच्या पलीकडील संधी आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेस्टॉरंट उद्योगाचे भवितव्य या मुद्दयांचा आढावा घेण्यात आला, तसेच या क्षेत्राला आकार देणाऱ्या संधी व आव्हानांवर विविध दृष्टिकोन मांडण्यात आले.

या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित महामहीम श्रीमंत सौ. मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती यांनी पश्चिम महाराष्ट्रातील एनआरएआयच्या उपस्थितीमुळे या भागातील द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील वैविध्यपूर्ण स्थानिक खाद्यसंस्कृती जागतिक स्तरावर नेण्यास मिळणाऱ्या क्षमतेवर भर दिला. स्थानिक खाद्यसंस्कृतीचे सर्वोत्तम पैलू जगासमोर आणणे आणि स्थानिक रेस्टॉरंट परिसंस्था अधिक दृढ करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि लगतच्या भागातील अन्न व्यावसायिक आणि नव्या स्टार्टअप संस्कृतीच्या वाढीला एनआरएआयचे प्रशिक्षण व क्षमता-संवर्धन उपक्रम आणखी पाठबळ देऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या. त्यांनी स्थानिक खाद्यसंस्कृतीला जागतिक पातळीवर नेण्याच्या एनआरएआयच्या प्रयत्नांना आपला पाठिंबा व्यक्त केला आणि यासाठी सरकार व प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळवून देण्याची तयारीही दर्शवली.

पश्चिम महाराष्ट्र चॅप्टरचे नेतृत्व समर्पित कोअर कमिटीद्वारे केले जाईल, ज्यामध्ये चॅप्टर हेड: कॅसलचे ओनर पार्थ उज्ज्वल नागेशकर; को-चॅप्टर हेड: रिपब्लिक फाईन डाईनचे पार्टनर विजयराज विद्याधर खोबरे; सेक्रेटरी: मलबरी ग्रुप ऑफ हॉटेल्सचे डायरेक्टर अजय शशिकांत शिंदे; जॉइंट सेक्रेटरी: व्यंकटेश्वर ग्रुप ऑफ हॉटेल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर रोहन संजय कोमटी; ट्रेझरर: एमआरजे फूड्सचे प्रोप्रायटर मल्हार रविकुमार जाधव; आणि जॉइंट ट्रेझरर: अक्षवीरा डिझाईन्सचे प्रोप्रायटर अक्षय अशोक बागडे यांचा समावेश आहे.

पश्चिम महाराष्ट्र चॅप्टरचा शुभारंभ महाराष्ट्रातील आपली उपस्थिती अधिक विस्तारण्याच्या एनआरएआयच्या प्रयत्नांमधील आणखी एक टप्पा आहे. याअंतर्गत ही संघटना राज्यातील अधिकाधिक प्रादेशिक रेस्टॉरंट समुदायांना आपल्या नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यासाठी आणि संपूर्ण राज्यात उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व अधिक दृढ करण्यासाठी प्रय

त्नरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments