Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedआर्थ्रायटिस दिनानिमित्त मिशन आर्थ्रायटिस इंडिया आणि सेंटर फॉर र्‍ह्युमॅटिक डिसीजेसचा जनजागृती कार्यक्रम...

आर्थ्रायटिस दिनानिमित्त मिशन आर्थ्रायटिस इंडिया आणि सेंटर फॉर र्‍ह्युमॅटिक डिसीजेसचा जनजागृती कार्यक्रम संपन्न

पुणे, ८ ऑक्टोबर २०२६: जागतिक आर्थ्रायटिस दिनानिमित्त मिशन आर्थ्रायटिस इंडिया (माई) आणि सेंटर फॉर र्‍ह्युमॅटिक डिसीजेस ( सीआरडी) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पुण्यातील कॅम्प येथील द पूना क्लब येथे विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाची संकल्पना द मूव्हिंग फाउंडेशन – फूट अँड अँकल इन आर्थ्रायटिस ही होती.

 

फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (पुणे शाखेच्या) उपाध्यक्ष ॲड.अवलोकिता माने या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. याप्रसंगी माईच्या अध्यक्ष राणी पारसनीस, सचिव अबोली बुरांडे , सीआरडीचे संचालक आणि प्रमुख संधिवात तज्ज्ञ डॉ. अरविंद चोप्रा, संधिवात तज्ज्ञ डॉ. वैजयंती लागू जोशी आणि ऑर्थोटिक्स तज्ज्ञ संजीव कश्यप, माईच्या श्वेता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माईच्या वार्षिक स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

 

ॲड.अवलोकिता माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच आर्थ्रायटिसशी लढा देत जिद्दीने जीवन जगणाऱ्या काही रुग्णांचा सत्कार करून त्यांच्या धैर्याचा गौरव केला. ॲड.अवलोकिता माने यांच्या हस्ते श्रीकांत केसकर आणि डॉ. अरविंद चोप्रा यांच्या हस्ते गुरप्रीत सग्गु यांचा आर्थ्रायटिसशी धैर्याने लढा दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

 

माईच्या सचिव अबोली बुरांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

 

माईच्या अध्यक्ष राणी पारसनीस यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्या म्हणाल्या की, आर्थ्रायटिससह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना सहानुभूतीपेक्षा प्रत्यक्ष मदत आणि आधार देणे, तसेच त्यांना आत्मविश्वासाने आणि सामान्य, समाधानकारक जीवन जगण्यासाठी सक्षम करणे, ही संस्थेची मूलभूत भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संस्थेचे ब्रीदवाक्य “सहानुभूती नाही, केवळ साथ” या भूमिकेवर त्यांनी विशेष भर दिला.

 

कार्यक्रमात विविध वैद्यकीय आणि माहितीपर सत्रांचे आयोजन करण्यात आले. सीआरडीचे संचालक आणि प्रमुख संधिवात तज्ज्ञ डॉ. अरविंद चोप्रा, संधिवात तज्ज्ञ डॉ. वैजयंती लागू जोशी आणि ऑर्थोटिक्स तज्ज्ञ संजीव कश्यप यांनी मार्गदर्शन केले. या सत्रांमध्ये संधिवात व इतर र्‍ह्युमॅटिक आजारांवरील उपचारपद्धती, त्यांचे व्यवस्थापन, पाय व घोट्यांच्या सांध्यांशी संबंधित समस्या तसेच हालचाली सुलभ करण्यासाठी आणि सांध्यांची योग्य ठेवण राखण्यासाठी ऑर्थोटिक्सचा वापर, त्याचे फायदे आणि प्रत्यक्ष उपयोग याबाबत माहिती देण्यात आली.

 

चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून कार्यरत असलेले मिशन आर्थ्रायटिस इंडिया स्नायू व हाडांशी संबंधित आजारांविषयी जनजागृती करण्याबरोबरच रुग्णांना सर्वांगीण आधार देण्याचे काम करते. आर्थ्रायटिसबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून रुग्णांना अधिक आत्मविश्वासाने आणि सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी संस्था सातत्याने कार्यर

त आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments