गोल्डन गिफ्ट पॅक स्पर्धेत देशाच्या चार विभागांतील १२ विजेत्यांचा गौरव; तनिष्क किंवा कल्याण ज्वेलर्स यांच्या नाण्यांच्या स्वरूपात बक्षिसे
नवी दिल्ली, ३० सप्टेंबर २०२६ : हिमालया बेबीकेअर या डॉक्टरांकडून सर्वाधिक शिफारस केल्या जाणाऱ्या बेबीकेअर ब्रँडने आपल्या ‘गोल्डन गिफ्ट पॅक स्पर्धे’च्या विजेत्यांची घोषणा केली आहे. या उपक्रमाद्वारे पालकांना आपल्या लहानग्यांसोबतचे खास क्षण साजरे करण्याचे आणि ते इतरांसोबत शेअर करण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. या स्पर्धेत उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातून १२ विजेत्यांची निवड करण्यात आली. त्यापैकी ४ विजेत्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे सोने देण्यात आले. तसेच ८ विजेत्यांना प्रत्येकी १०,००० रुपयांचे सिल्व्हर व्हाउचर्स देण्यात आले. ही व्हाउचर्स ‘तनिष्क’ किंवा ‘कल्याण’च्या सोन्या-चांदीच्या नाण्यांसाठी वापरता येणार आहेत.
‘हिमालया बेबी गोल्डन गिफ्ट पॅक’ हा शुभ प्रसंगांसाठी खास तयार करण्यात आलेला ‘गोल्ड एडिशन गिफ्ट पॅक’ आहे. या पॅकच्या माध्यमातून ग्राहकांना ‘हिमालया गोल्डन मोमेंट्स प्रोग्राम’मध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांना पॅकमधील पत्रकावरील स्क्रॅच पट्टी खरवडून त्याखालील खास कोड मिळवायचा होता. त्यानंतर क्यूआर कोड स्कॅन करून आपल्या बाळासोबतचा एखादा खास क्षण अपलोड करायचा होता.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक स्पर्धकाला एक हमखास बक्षीस देण्यात आले. त्यांना ५०० रुपये किमतीचे ‘माय बेबी अँड मी’ हे ई-बुक मोफत देण्यात आले. बाळांसोबतच्या खास आठवणी साजऱ्या करण्याच्या संकल्पनेवर आधारित या डिजिटल उपक्रमामुळे अनेक पालक आणि कुटुंबे एकत्र जोडले गेले. या स्पर्धेतील विजेत्यांमध्ये ४ सुवर्ण पारितोषिक विजेते आणि ८ रौप्य पारितोषिक विजेते यांचा समावेश होता. हे विजेते उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील विविध भागांमधून निवडले गेले. या घोषणेमध्ये विशेष उल्लेख करण्यात आलेल्या ५ विजेत्यांमध्ये विनोथिनी लिओ, सुश्री संगीता बेउरा, जयंती देवी, डेव्हिड राज देवरकोंडा आणि सरफराज अहमद यांचा समावेश आहे.


