Saturday, October 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या वतीने नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

पुणे राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या वतीने नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

पिंपरी – प्रसिद्ध अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते कै.नाना पाटेकर यांचे आज दिनांक 8 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे दुःखद निधन झाले.

 

संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या नियोजीत बैठकी पूर्वी सायंकाळी 6.30 वाजता कै.नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली,यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली.

 

याप्रसंगी   संघटनेचे  नेते  यशवंतभाऊ भोसले म्हणाले की आम्हाला  आठवत असलेल्या नानाच्या चाळीस वर्षाच्या चित्रपटांमधील विविध भूमिकांच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच “नाम” फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले सामाजिक कार्याची उपस्थिताना आठवण सांगितली.

 

आम्ही पाहिलेल्या नानांच्या काही चित्रपटांपैकी 1979 साली प्रदर्शित झालेल्या सिंहासन चित्रपटांमध्ये नाना पाटेकर यांनी दिग्गज कलाकार निळूभाऊ फुले यांच्याबरोबर प्रथम भूमिका केली, त्यामध्ये त्यांनी स्मगलर ची भूमिका साकारली होती, या चित्रपटामध्ये मुख्यमंत्र्याची भूमिका कै.अरुण सरनाईक यांनी साकारली होती, कामगार नेत्याची भूमिका सतीश दुभाषी यांनी साकारली होती. हा चित्रपट आम्हाला खूप आवडला होता अनेक वेळा तो आम्ही पाहिला .

 

नाना व स्मिता पाटील यांनी एकत्र काम केलेला महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘सूत्रधार’ हा सन 1987 साली प्रदर्शित झाला परंतु तो प्रदर्शित होण्याअगोदरच 1986 साली स्मिता पाटील यांचे निधन झाले हा अतिशय दुर्दैवी योग होता.

 

“नाना पाटेकर यांचा प्रदर्शित झालेला ‘सुबेदार’ 2026 या वर्षाचा शेवटचा चित्रपट ठरला. मात्र त्यांनी पूर्ण केलेले काही चित्रपट त्यांच्या निधनानंतर डिसेंबर 2026 मध्ये प्रदर्शित होणार असे आमच्या वाचनात आले दुर्दैव हे ते चित्रपट पाहण्यास नाना नसणार .

 

“क्रांतिवीर” या चित्रपटातील “प्रताप ” म्हणजेच

” प्रताप नारायण टिळक “या व्यक्तिरेखीची क्रांतिकारक भूमिका आमच्या आयुष्यावर प्रभाव टाकून गेली. ती आम्हाला मार्गदर्शक देखील ठरली, त्या भूमिकेचा प्रभाव आमच्या व्यक्तिमत्त्वावर व जीवनावर आजही आहे व पुढे अंतापर्यंत राहील.

 

आमच्या माहितीनुसार मराठी व हिंदी मिळून 60 च्या वर चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले

 

नाना पाटेकरांची खरी जडणघडण रंगभूमीवर झाली होती.

त्यांच्या विशेष गाजलेल्या नाटका पैकी ” पुरुष” हे नाटक

या नाटकामध्ये नानांची सर्वाधिक गाजलेली रंगभूमीवरील भूमिका म्हणजे “गुलाबराव”. आमच्या आठवणीनुसार 1980 ते 2015 तीन दशकांच्यावर या नाटकाने प्रेक्षकांवर भुरळ घातली होती, या नाटकाचे 1’900 प्रयोग झाल्याचे आमच्या वाचनात आले होते.

 

“हमीदा बाईची कोठी” या नाटकात विजयाताई मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली नानांनी या नाटकात प्रभावी भूमिका केली. हे त्यांच्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या सुरुवातीच्या कामांपैकी एक मानले जाते.

 

“जात हीच विचारायची नसते” विजय तेंडुलकरांच्या नाटकात नानांनी ‘बबना’ ही भूमिका केली होती. ” कथा” ” गवराई इत्यादी नाटकात नानांची सुरुवातीच्या काळात रंगभूमीवर उल्लेखनीय कामे केली.

 

नाना पाटेकरांनी चित्रपटात येण्यापूर्वी मराठी प्रायोगिक रंगभूमीवर मोठा काळ काम केलेला होता. डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांना रंगमंचावर पाहून सिंहासनमध्ये संधी दिल्याचा उल्लेखही आहे.

“नटसम्राट” हा चित्रपट देखील आम्ही पाहिला ,आपला संपूर्ण अभिनय नानांनी त्यामध्ये ओतला होता,” नटसम्राट” हे खरे तर नाटक प्रसिद्ध अभिनेते ” दत्ता भट ” डॉ श्रीराम लागू या दोघांचेही हे नाट्य प्रयोग आम्ही लहानपनी 1980,90 च्या दशकात पाहिले होते.

श्रद्धांजली च्या भाषणात नानांच्या विषयी आम्ही खूप अंतर्मुख होऊन बोललो, चांगली माणसे सूर्य चंद्र असेपर्यंत असावीत असे वाटते !

 

! भावपूर्ण श्रद्धांजली !

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments