Sunday, October 11, 2026
Google search engine
HomeUncategorized*घटस्थापनेला श्री महालक्ष्मी देवीला २ किलो सोन्याचा रत्नजडित मुकुट* श्री महालक्ष्मी...

*घटस्थापनेला श्री महालक्ष्मी देवीला २ किलो सोन्याचा रत्नजडित मुकुट* श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाचा सुवर्णमयी प्रारंभ 

 

 

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त देवीसाठी अत्यंत आकर्षक आणि कलात्मक असा भव्य सुवर्ण मुकुट साकारण्यात आला. सुमारे २ किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला रत्नजडित मुकुट घटस्थापनेला देवीला परिधान करण्यात आला. संपूर्ण नवरात्रोत्सवात हा मुकुट पाहण्याची संधी देवी भक्तांना मिळणार आहे.

 

मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, मुकुटामध्ये श्री लक्ष्मी-विष्णू गरुडावर विराजमान असलेले मनोहारी रूप साकारण्यात आले आहे. यासोबतच अष्टलक्ष्मींच्या विविध स्वरूपांचे अत्यंत बारकाईने आणि कलात्मक पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे. याची निर्मिती राठोड ज्वेलर्सचे संजय राठोड यांनी केली आहे. मुकुटाचे विशेष आकर्षण म्हणजे त्यामध्ये वापरण्यात आलेली विविध प्रकारची मौल्यवान रत्ने. प्रत्येक देवस्वरूपाच्या भावमुद्रा, चेहऱ्यावरील भाव आणि सूक्ष्म तपशील स्वतंत्रपणे अधोरेखित करण्यात आले असून, त्यामुळे संपूर्ण कलाकृती अधिक जिवंत आणि देखणी भासते.

 

उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, मुकुटावर करण्यात आलेले अतिशय सुबक आणि नाजूक नक्षीकाम हे विशेष लक्षवेधी आहे. पारंपरिक धार्मिक संकल्पना, उत्कृष्ट सुवर्णकारिता आणि कलात्मक सौंदर्य यांचा सुंदर संगम या मुकुटामध्ये पाहायला मिळतो. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी हा सुवर्ण मुकुट विशेष आकर्षण ठरत असून, श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला आणखी एक दिव्य आणि वैभवशाली स्वरूप प्राप्त झाले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments