Monday, October 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedविविध क्षेत्रातील संस्थांना ‘ऑपव्याप’च्या माध्यमातून रिअल-टाइम ऑपरेशनल आणि आर्थिक माहिती उपलब्ध होणार...

विविध क्षेत्रातील संस्थांना ‘ऑपव्याप’च्या माध्यमातून रिअल-टाइम ऑपरेशनल आणि आर्थिक माहिती उपलब्ध होणार प्रायमाव्हर्सतर्फे क्लाऊडवर आधारित वर्क इंटेलिजन्स आणि टास्क मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म ऑपव्याप विकासीत

एआयवर आधारित प्लॅटफॉर्मद्वारे प्रकल्प, उत्पादकता, संसाधनांचा वापर, कार्यक्षमता आणि आर्थिक कामगिरीचे २४x७ निरीक्षण शक्य

 

पुणे, १२ ऑक्टोबर: आर्किटेक्चरल, इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन क्षेत्राला जागतिक स्तरावर अभियांत्रिकी सेवा देणाऱ्या पुण्यातील प्रायमाव्हर्स या संस्थेने ऑपव्याप हे क्लाऊडवर आधारित वर्क इंटेलिजन्स आणि टास्क मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म लाँच केले आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध संस्थांना जसे खासगी, सरकारी, निम सरकारी व सेवाभावी संस्थांना त्यांच्या कार्यपद्धती आणि आर्थिक स्थितीचे रिअल-टाइम चित्र एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती प्रायमाव्हर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रायमाव्हर्सच्या सह संस्थापिका ज्योती देसाई देखील उपस्थित होत्या.

 

उत्तर अमेरिका, ब्रिटन, मॉरिशस आणि ऑस्ट्रेलियातील कंपन्यांसोबत काम करताना प्रायमाव्हर्सने ऑपव्याप विकसित केले आहे. प्रगती करणाऱ्या, सातत्याने वाढ होणाऱ्या संस्थांसमोरील एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे त्यांनी हाती घेतलेल्या प्रकल्पाबद्दल उपलब्ध मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांची कामगिरी आणि आर्थिक बाबींचे एकत्रित व अद्ययावत चित्र उपलब्ध नसणे. ही गरज लक्षात घेऊन ऑपव्यापमध्ये ऑपरेशनल ट्रॅकिंग, आर्थिक डॅशबोर्ड, सहकार्याची साधने आणि एआयवर आधारित विश्लेषणात्मक माहिती एकाच प्रणालीमध्ये एकत्रित करण्यात आली आहेत.

 

ऑपव्यापच्या माध्यमातून संस्थांना त्यांच्या प्रकल्प, विभाग, टीम आणि वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे २४ तास निरीक्षण करता येणार आहे. प्रकल्प डॅशबोर्डवर प्रकल्पाची सद्यस्थिती आणि महत्त्वाचे आकडेवारीविषयक तपशील रिअल-टाइममध्ये दिसतात. तसेच कामासाठी खर्च झालेला वेळ, संसाधनांचा वापर, कार्यक्षमता आणि कामगिरी यांचेही ट्रॅकिंग करता येते.

 

या प्लॅटफॉर्ममध्ये आर्थिक स्थितीचा डॅशबोर्डही उपलब्ध असून, एकूण महसूल, एकूण खर्च, नफा तसेच प्रत्येक कर्मचाऱ्यामागील महसूल आणि नफा यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचे विश्लेषण करता येते. संस्थांना त्यांच्या गरजेनुसार डॅशबोर्डमध्ये बदल करता येतात. तसेच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध डेटाच्या आधारे एआयच्या मदतीने सूचना आणि मार्गदर्शनही मिळते.

 

“आजच्या काळात व्यवसाय मोठ्या प्रमाणावर ऑपरेशनल डेटा निर्माण करतात; मात्र हा डेटा योग्य वेळी निर्णय घेण्यासाठी वापरणे हे खरे आव्हान आहे. ऑपव्यापच्या माध्यमातून ऑपरेशनल आणि आर्थिक माहिती एका पारदर्शक प्लॅटफॉर्मवर एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्मचाऱ्यांना स्वतःची कामगिरी समजून घेण्यास, व्यवस्थापनाला संसाधनांचा अधिक प्रभावी वापर करण्यास आणि ग्राहकांना प्रकल्पाच्या प्रगतीची रिअल-टाइम माहिती मिळवून देण्यास ऑपव्याप मदत करेल. भविष्यातील वर्क मॅनेजमेंट केवळ कामांची नोंद ठेवण्यापुरते मर्यादित राहणार नाही, तर त्यातून कृतीयोग्य माहिती निर्माण होणे आवश्यक आहे. ऑपव्यापची उभारणी याच दृष्टिकोनातून करण्यात आली आहे,” असे प्रायमाव्हर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश देसाई यांनी सांगितले.

 

ऑपव्यापचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची सुलभता. प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी कमीत कमी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांना कुठूनही ३० सेकंदांपेक्षा कमी वेळेत टाइमशीट भरता येते. कर्मचारी स्वतःची कामगिरी आणि उत्पादकता रिअल-टाइममध्ये तपासू शकतात, तर संस्थांना त्यांच्या एकूण कामगिरीचे पारदर्शक चित्र मिळते.

 

ग्राहकांनाही वारंवार ई-मेलद्वारे माहिती मागवण्याची गरज राहणार नसून, ते त्यांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती थेट पाहू शकतात. ऑपव्यापचे मोबाइल अॅप्लिकेशन दूरस्थपणे किंवा प्रवासात काम करणाऱ्या वापरकर्त्यांसाठीही माहिती आणि सुविधा उपलब्ध करून देते.

 

कामांचे आणि कामगिरीचे व्यवस्थापन करण्याबरोबरच ऑपव्यापमध्ये संस्थेसाठी स्वतंत्र नॉलेज सेंटर, चॅट सुविधा आणि दैनंदिन व्यावसायिक कामकाजासाठी आवश्यक असलेली विविध सहकार्याची साधने उपलब्ध आहेत.

 

एआयच्या मदतीने वर्क इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म विकसित करून कामाच्या संसाधनांचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करण्याची वाढती गरज पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रायमाव्हर्सने ठेवले आहे. पारदर्शकता, संसाधनांचा योग्य वापर, निर्णयक्षमता आणि प्रकल्पाची दृश्यमानता वाढवून कर्मचारी, नियोक्ते आणि ग्राहक या सर्व प्रमुख घटकांसाठी मूल्य निर्माण करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरणार आहे.

 

ऑपव्याप हे क्लाऊडच्या माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध असून, वैयक्तिक वापरकर्ते तसेच संस्था या दोघांनाही त्याचा वापर करता येतो. वैयक्तिक वापरकर्त्यांसाठीही हे प्लॅटफॉर्म उपलब्ध असले, तरी टीमच्या पातळीवर त्याची अंमलबजावणी केल्यास संस्थेची कामगिरी ट्रॅक आणि व्यवस्थापित करण्यासाठी त्याचा अधिक व्यापक उपयोग होतो.

 

ऑपव्यापची किंमत वापरकर्त्यांची संख्या, संस्थेचा आकार तसेच निवडण्यात आलेली मॉड्यूल्स आणि सुविधांनुसार निश्चित केली जाते.

 

अधिक माहितीसाठी www.OpVyap.

com येथे भेट देता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments