Monday, October 12, 2026
Google search engine
HomeUncategorized**मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ** ...

**मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ** **विशेष सघन पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर; अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार**

 

 

पुणे, दि. १२ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आली होती. सुधारित कार्यक्रमानुसार दावे व हरकती दाखल करण्याची प्रक्रिया २६ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

 

भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ ही अर्हता तारीख निश्चित करून महाराष्ट्रासह १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीचे विशेष सघन पुनरीक्षण जाहीर केले आहे. महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर दावे व हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.

 

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या विनंतीनुसार भारत निवडणूक आयोगाने दावे व हरकती दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येतील. प्राप्त दावे व हरकतींची नोटीस देणे, त्यांची तपासणी व निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

 

मतदार यादीतील नाव, तपशील किंवा अन्य नोंदींबाबत दुरुस्ती अथवा हरकत नोंदवायची असल्यास संबंधित मतदारांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन विहित प्रक्रियेनुसार कार्यवाही करावी. सुधारित कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments