Monday, October 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedरब्बी हंगाम २०२६ साठी प्रमाणित बियाणे वितरणाकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन*

रब्बी हंगाम २०२६ साठी प्रमाणित बियाणे वितरणाकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन*

 

 

 

पुणे, दि. १२ (जिमाका) : केंद्र शासनाच्या आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७ अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रम पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगाम २०२६ साठी हरभरा पिकाचा समावेश करण्यात आला असून, पात्र शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे मिळविण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमांतर्गत हरभरा पिकाच्या विकासासाठी पाच वर्षांच्या आतील प्रमाणित बियाणे वितरणाकरिता पुणे जिल्ह्यास ४२१.६७ क्विंटल लक्ष्यांक देण्यात आला आहे. पाच वर्षांतील, मात्र दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीतील प्रमाणित बियाण्यांसाठी १०० क्विंटल लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे.

 

पाच वर्षांतील प्रमाणित बियाण्यांसाठी बियाण्याच्या किमतीच्या ७५ टक्के किंवा प्रतिक्विंटल ६ हजार रुपये यापैकी जे कमी असेल, त्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. तसेच पाच वर्षांपेक्षा अधिक, परंतु दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीतील प्रमाणित बियाण्यांसाठी बियाण्याच्या किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ४ हजार रुपये यापैकी जे कमी असेल, त्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे.

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत रब्बी हंगाम २०२६ साठी हरभरा व ज्वारीच्या प्रमाणित बियाणे वितरणाचे लक्ष्यांकही पुणे जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत. दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीतील प्रमाणित बियाण्यांसाठी २ हजार ६९० क्विंटल, तर दहा वर्षांवरील प्रमाणित बियाण्यांसाठी १ हजार ९०० क्विंटल लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीतील बियाण्यांसाठी प्रतिक्विंटल ३ हजार रुपये, तर दहा वर्षांवरील बियाण्यांसाठी प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपये अनुदान देय राहणार आहे.

 

या योजनेचा लाभ एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त एक हेक्टर क्षेत्रापर्यंत घेता येणार आहे. अनुदानित बियाणे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जास्तीत जास्त अर्ज करावेत,शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा महाबीजच्या वितरकांमार्फत करण्यात येणार आहे, असे कृषी विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments