Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedसेवा संकल्प अभियानांतर्गत योग व ध्यान सत्र तसेच मानसिक आरोग्य जनजागृती*

सेवा संकल्प अभियानांतर्गत योग व ध्यान सत्र तसेच मानसिक आरोग्य जनजागृती*

 

 

पुणे, दि.१३: योग व प्राणायामाबद्दल जागरूकता निर्माण करणे, शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणे, तणावमुक्त जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सेवा दवाखाना, कुरकुंभ येथे योग व ध्यान सत्र तसेच मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योग करा, मन शांत ठेवा आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहा, असा संदेश यावेळी देण्यात आला.

 

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांनी योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासाचे फायदे, प्राणायाम, शारीरिक आरोग्याचे संवर्धन तसेच निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले. योगाभ्यासामुळे शरीराची लवचिकता वाढण्यास, तणाव कमी करण्यास आणि सर्वांगीण आरोग्य सुधारण्यास मदत होते.

 

मानसिक आरोग्याचे महत्त्व, तणाव व्यवस्थापन, चिंता कमी करण्यासाठी योग व प्राणायामाची भूमिका, मनःशांती, सकारात्मक विचारसरणी आणि भावनिक संतुलन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मानसिक आरोग्याची काळजी घेणे, पुरेशी झोप घेणे आणि दैनंदिन जीवनात योग व ध्यानाचा समावेश करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments