Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिटी आणि क्रेडेंडो यांच्याकडून इंडिगोच्या आठ एअरबस विमानांसाठी ३२८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स...

सिटी आणि क्रेडेंडो यांच्याकडून इंडिगोच्या आठ एअरबस विमानांसाठी ३२८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स महत्त्वपूर्ण फायनान्सिंगची घोषणा

भारताला जागतिक विमान भाडेतत्त्वावरील (लीजिंग) केंद्र बनवण्याच्या भारत सरकारच्या दृष्टिकोनाला अनुसरून हा व्यवहार जगातील पहिला क्रेडेंडो-विमाकृत एव्हिएशन फायनान्सिंग आणि गिफ्ट आयएफएससीच्या माध्यमातून संरचित केलेला पहिला एक्सपोर्ट क्रेडिट एजन्सी (ईसीए)-समर्थित एअरक्राफ्ट फायनान्सिंग ठरला आहे

ऑक्टोबर १३, २०२६

राष्ट्रीय – सिटी आणि बेल्जियमची एक्सपोर्ट क्रेडिट एजन्सी क्रेडेंडो यांनी आज इंडिगोच्या आठ एअरबस विमानांसाठी (सहा A321s आणि दोन A320s) ३२८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स वित्तपुरवठ्याची (फायनान्सिंग) यशस्वी पूर्तता झाल्याची घोषणा केली. इंडिगो नेटवर्क आणि विमानांच्या ताफ्याच्या आकारमानानुसार भारतातील सर्वात मोठी, तसेच जगातील सर्वात वेगाने वाढणारी विमान कंपनी आहे. या संरचनेअंतर्गत, सिटीने एकमेव मॅन्डेटेड अरेंजर, ईसीए समन्वयक आणि एकमेव कर्जदाता म्हणून भूमिका बजावली आहे, तसेच या फायनान्सिंगला क्रेडेंडोच्या पत विम्याचे (क्रेडिट इन्शुन्स) पाठबळ मिळाले आहे.

इंडिगोची उपकंपनी इंटरग्लोब एव्हिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस आयएफएससी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून पूर्ण झालेला हा व्यवहार जागतिक पातळीवर क्रेडेंडो-विमाकृत पहिला एव्हिएशन फायनान्सिंग आणि गिफ्ट आयएफएससी लीजिंग संरचनेद्वारे झालेला पहिला ईसीए-समर्थित एअरक्राफ्ट फायनान्सिंग ठरला आहे, ज्यामुळे भारतातील एव्हिएशन फायनान्स क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा प्रस्थापित झाला आहे.

इंडिगोच्या महत्त्वाकांक्षी विमान ताफा विस्तार योजनांना गिफ्ट आयएफएससी प्लॅटफॉर्मद्वारे पाठबळ देणारे अनुकूल निधी सोल्यूशन उपलब्ध करून देण्यासाठी हे विशेष फायनान्सिंग सोल्यूशन सिटी आणि क्रेडेंडोने इंडिगो व एअरबस यांच्या जवळच्या भागीदारीतून संयुक्तपणे संकल्पित, संरचित आणि विकसित केले, ज्यामध्ये सिटीचे ईसीए संरचना आणि एव्हिएशन फायनान्स बाजारपेठेतील अग्रगण्य कौशल्य, तसेच क्रेडेंडोच्या पत विमा क्षमतांचा प्रभावी वापर करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सिटी, क्रेडेंडो आणि इंडिगोसोबत जवळून काम करत एअरबसने या महत्त्वपूर्ण फायनान्सिंगला पाठबळ देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हा व्यवहार निधीची उपलब्धता वाढवणाऱ्या आणि आपल्या विमान कंपनी ग्राहकांच्या वाढीच्या आकांक्षांना पाठबळ देणाऱ्या नाविन्यपूर्ण फायनान्सिंग सोल्यूशन्सचा विकास करण्याप्रती एअरबसची कटिबद्धता आणखी अधोरेखित करतो.

भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या विमान वाहतूक क्षेत्राच्या फायनान्सिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून त्याचे स्थान अधिक दृढ करण्यासाठी नाविन्यपूर्ण आंतरराष्ट्रीय भांडवल व निर्यात पत साहाय्याचे वाढते महत्त्‍व या महत्त्वपूर्ण व्यवहारामधून दिसून येते. इंडिगोसाठी ही सुविधा ताफा आणि नेटवर्क वाढीसाठी स्पर्धात्मक, तसेच वैविध्यपूर्ण दीर्घकालीन निधी स्रोत प्रदान करते. तसेच यामधून पहिलेच फायनान्सिंग सोल्यूशन उपलब्ध करून देण्यात आणि भारतातील विमान वाहतूक बाजारपेठेसाठी उपलब्ध निधी पर्यायांची व्याप्ती वाढवण्यात सिटी, क्रेडेंडो, इंडिगो आणि एअरबस यांच्यातील दृढ सहयोग दिसून येतो.

सिटीचे भारतातील सीईओ व बँकिंग हेड आणि सब-कॉन्टिनंट सब-क्लस्टर प्रमुख के. बालसुब्रह्मण्यन म्हणाले, “भारत सरकारने गिफ्ट सिटीच्या माध्यमातून विमान भाडेतत्त्वावर देण्याला (लीजिंग) स्पष्ट धोरणात्मक प्राधान्य दिले आहे आणि लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहनांमुळे भारताला विमान लीजिंगसाठी आकर्षक ठिकाण म्हणून प्रस्थापित करण्यास मदत झाली आहे. हा व्यवहार त्या दृष्टिकोनाचे प्रत्यक्ष कृतीतील उत्तम उदाहरण आहे. सिटीचे सीमापार विमान वाहतूक व ईसीए फायनान्सिंग कौशल्य, क्रेडेंडोचा पत विमा आणि इंडिगोचा गिफ्ट आयएफएससी प्लॅटफॉर्म यांचा मेळ घालून आम्ही अशा प्रकारचे पहिलेच सोल्यूशन दिले आहे, जे भारतातील विमान वाहतूक क्षेत्राला ईसीए-समर्थित आंतरराष्ट्रीय तरलतेच्या विपुल स्रोताशी जोडणारा महत्त्वाचा नवा मार्ग खुला करते आणि भारताच्या विमान वाहतूक वाढीच्या पुढील टप्प्याला पाठबळ देते. एकमेव मॅन्डेटेड लीड अरेंजर, ईसीए समन्वयक आणि एकमेव कर्जदाता म्हणून या ऐतिहासिक सुविधेचे नेतृत्व केल्याचा सिटीला अभिमान आहे. हा व्यवहार शक्य केल्याबद्दल आम्ही एअरबसचे त्यांची भागीदारी आणि पाठबळासाठी देखील आभार मानतो.”

एक्सपोर्ट क्रेडिट एजन्सी क्रेडेंडोचे ग्रुप डेप्युटी सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह कमिटीचे व्हाईस चेअरमन फ्रँक व्हॅनविंग म्हणाले, “हा व्यवहार क्रेडेंडोसाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि बेल्जियन विमान वाहतूक उद्योगाला पाठबळ वाढवण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या व्यापक उपक्रमातील पहिले पाऊल आहे. आमचा पहिला एअरक्राफ्ट फायनान्स व्यवहार म्हणून आंतरराष्ट्रीय संधी आणि नाविन्यपूर्ण फायनान्सिंग संरचना शोधणाऱ्या बेल्जियन विमान वाहतूक क्षेत्रातील भागधारकांसाठी दीर्घकालीन भागीदार बनण्याची आमची महत्त्वाकांक्षा हा व्यवहार दर्शवतो. याव्यतिरिक्त, हा व्यवहार विशेष जोखीम निवारण सोल्यूशन्सद्वारे बेल्जियन निर्यात पत साहाय्य विमान वाहतूक क्षेत्राला मूल्य देऊ शकते हे दाखवून देतो. आम्हाला गिफ्ट आयएफएससीच्या माध्यमातून हा महत्त्‍वपूर्ण व्यवहार पूर्ण करण्यासाठी एअरबस, सिटी आणि इंडिगोसोबत काम केल्याचा अभिमान आहे, तसेच आम्ही जगभरातील पुढील एव्हिएशन फायनान्स प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी उत्सुक आहोत.”

इंडिगोचे चीफ एअरक्राफ्ट अॅक्विझिशन अँड फायनान्सिंग ऑफिसर रियाझ पीरमोहम्मद म्हणाले, “आम्हाला या महत्त्वपूर्ण फायनान्सिंगसाठी सिटी, क्रेडेंडो आणि एअरबससोबत सहयोग करताना आनंद होत आहे, जे आमच्या वाढत्या एअरबस ताफ्यासाठी इंडिगोला तरलतेचा स्पर्धात्मक स्रोत उपलब्ध करून देते. हा व्यवहार आंतरराष्ट्रीय बँका आणि एक्सपोर्ट क्रेडिट एजन्सींना एकत्र आणण्याची व भारतातील विमान वाहतुकीसाठी नाविन्यपूर्ण फायनान्सिंग सोल्यूशन्स निर्माण करण्याची गिफ्ट आयएफएससीची क्षमता सिद्ध करतो

.”

***

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments