Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोदरेज वेल्थचा पुण्यात प्रवेश; महाराष्ट्रातील उपस्थिती अधिक दृढ करत राष्ट्रीय विस्ताराच्या दिशेने...

गोदरेज वेल्थचा पुण्यात प्रवेश; महाराष्ट्रातील उपस्थिती अधिक दृढ करत राष्ट्रीय विस्ताराच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल

पुण्यातील २२,५०० लक्षाधीश कुटुंबे आणि वाढती ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) परिसंस्था, शहरातील पारंपरिक तसेच नव्या पिढीतील संपत्ती निर्मात्यांचा वैविध्यपूर्ण पाया अधोरेखित करतात

पुण्यातील वाढती व्यावसायिक कुटुंबे, उद्योजक आणि जागतिक स्तरावरील अनुभव असलेल्या व्यावसायिक समुदायापर्यंत पोहोचण्यावर भर

 

 

पुणे, १३ ऑक्टोबर २०२६: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची संपत्ती व्यवस्थापन शाखा असलेल्या गोदरेज वेल्थने आज पुण्यात प्रवेश केल्याची घोषणा केली. मुंबईनंतर महाराष्ट्रातील कंपनीचे हे दुसरे कार्यालय/केंद्र ठरणार आहे. हा विस्तार कंपनीच्या राष्ट्रीय विकास धोरणाचा भाग असून, २०३१ पर्यंत व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) ₹१ लाख कोटींपर्यंत नेण्याचे आणि देशभरातील ३५ ठिकाणी उपस्थिती निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

 

 

 

पुणे ही एक वैशिष्ट्यपूर्ण आणि परिपक्व संपत्ती बाजारपेठ आहे. मार्च २०२६ पर्यंत सुमारे ₹३.१४ लाख कोटी म्युच्युअल फंड AUM निर्माण करणारे पुणे हे भारतातील चौथ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे म्युच्युअल फंड मार्केट आहे. शहरात सुमारे २२,५०० लक्षाधीश कुटुंबे असून, हे पुण्याच्या वाढत्या संपत्तीच्या पायाचे निदर्शक आहे. शहराच्या मजबूत उत्पादन, वाहन आणि अभियांत्रिकी क्षेत्रांना ५०० हून अधिक GCCs आणि वाढत्या स्टार्टअप परिसंस्थेची जोड लाभली आहे. या स्टार्टअप परिसंस्थेने २०२५ मध्ये US$४५० दशलक्षांहून अधिक निधी उभारला. ही सर्व क्षेत्रे मिळून पारंपरिक व्यावसायिक कुटुंबे, उद्योजक आणि जागतिक अनुभव असलेल्या व्यावसायिकांसह विविध घटकांमध्ये संपत्ती निर्माण करत आहेत.

 

 

 

या विस्ताराबाबत प्रतिक्रिया देताना मनीष शाह, नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, गोदरेज वेल्थ आणि एमडी व सीईओ, गोदरेज कॅपिटल, म्हणाले, “संपत्ती निर्मितीची व्याप्ती भारतभर विस्तारत असून, ती अधिक वैविध्यपूर्ण होत आहे. आता ती पारंपरिक आर्थिक केंद्रांपुरती मर्यादित न राहता उद्योजकता आणि नवोन्मेषावर आधारित बाजारपेठांमध्येही वाढत आहे. औद्योगिक वारसा, तंत्रज्ञान कंपन्या आणि वेगाने विस्तारत असलेले व्यावसायिक मनुष्यबळ यांच्या अनोख्या संगमामुळे पुणे या बदलाचे उत्तम उदाहरण ठरते. गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपसाठी संपत्ती व्यवस्थापन हा दीर्घकालीन व्यवसाय आहे. ग्रुपला १२९ वर्षांपासून आकार देणाऱ्या विश्वास, ग्राहकांचे सखोल आकलन आणि पिढ्यानपिढ्या टिकणारे व्यवसाय उभारण्याची बांधिलकी या तत्त्वांवरच हा व्यवसाय उभारला जात आहे. पुण्यातील आमचा विस्तार हा या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

 

 

 

संपत्ती व्यवस्थापनामध्ये गोदरेज वेल्थ उत्पादनांऐवजी ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवणारा दृष्टिकोन स्वीकारते. कंपनीने विकसित केलेल्या क्षमतांमध्ये, प्रत्येक ग्राहकाला अधिक सखोलपणे समजून घेणारे ‘गोदरेज सिग्नल्स’ आणि रिस्क प्रोफाइलिंगच्या माध्यमातून विविध गुंतवणूक पर्यायांचे मूल्यमापन करणारे ‘गोदरेज चॉइस’ यांचा समावेश आहे.

 

 

 

या विस्ताराबाबत कुणाल कर्नानी, सीईओ, गोदरेज वेल्थ, म्हणाले, “पुण्यात विविध प्रकारचे संपत्ती निर्माते आहेत—अनेक पिढ्यांपासून व्यवसाय करणारी कुटुंबे, उद्योजक तसेच जागतिक अनुभव असलेले वरिष्ठ व्यावसायिक. प्रत्येकाच्या संपत्तीशी संबंधित प्राधान्यक्रम, परिस्थिती आणि अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे उत्पादन-केंद्रित दृष्टिकोनाऐवजी प्रत्येक व्यक्तीला आणि तिच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या निर्णयांना अधिक सखोलपणे समजून घेणे आवश्यक ठरते. आयआयटी मुंबईतील प्राध्यापकांच्या शैक्षणिक सहकार्याचे पाठबळ लाभलेले गोदरेज सिग्नल्स आणि गोदरेज चॉइसवरील आमचे काम हा दृष्टिकोन विकसित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. पुण्यात आमचा व्यवसाय उभारताना, तंत्रज्ञान आणि क्षमतांचे पाठबळ असलेल्या अनुभवी वेल्थ मॅनेजर्सची नियुक्ती करण्यावर आमचा भर असेल, जेणेकरून ग्राहकांसोबत अर्थपूर्ण आणि दीर्घकालीन संबंध निर्माण करता येतील.”

 

 

 

सप्टेंबर २०२६ मध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये प्रवेश केल्यानंतर, भारतातील प्रमुख संपत्ती बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याच्या गोदरेज वेल्थच्या राष्ट्रीय प्रवासातील पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे पुणे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments