Thursday, October 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाझाने बंगालच्या पूजो उत्सवात आमोंत्रोनच्या उत्साहाची भर केली

माझाने बंगालच्या पूजो उत्सवात आमोंत्रोनच्या उत्साहाची भर केली

 

 

 

कोलकाता, १५ ऑक्टोबर २०२६: या पूजोमध्ये, माझा® या भारतातील लोकप्रिय मँगो ड्रिंकने ‘माझा आमोंत्रोन’च्या माध्यमातून बंगालची आमोंत्रोन म्हणजेच निमंत्रणाची परंपरा प्रकाशझोतात आणली आहे. शुभ प्रसंगी बंगाली घरांच्या प्रवेशद्वारांवर लावल्या जाणाऱ्या आंब्याच्या पानांच्या पारंपरिक तोरणापासून प्रेरणा घेत हा उपक्रम पूजो उत्सवाच्या केंद्रस्थानी आकर्षक फेस्टिव्ह इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून घरी परतण्याचा आणि आदरातिथ्याचा आनंद साजरा करत आहे.

 

बंगाली घरांमध्ये आंब्याच्या पानांपासून तयार केलेले तोरण म्हणजेच ‘आम्र पल्लव’ हे शुभ सुरुवातीचे आणि घरी येणाऱ्यांचे मनापासून स्वागत करण्याचे प्रतीक मानले जाते. घरोघरी आढळणाऱ्या या परिचयाच्या विधीपासून प्रेरणा घेत माझा या पारंपरिक तोरणाची उत्सवी प्रवेशद्वाराच्या रूपात पुनर्निर्मिती करत आहे, ज्यामुळे ब्रँडची आंब्याशी असलेली ओळख बंगालच्या संस्कृतीमध्ये खोलवर रुजलेल्या परंपरेशी जोडली जात आहे.

 

‘माझा आमोंत्रोन’चा भाग म्हणून, भाविक आणि अभ्यागत १४ ते २० ऑक्टोबर २०२६ दरम्यान दम दम तरुण दल येथे या इन्स्टॉलेशनचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतात. हा उपक्रम आंब्याच्या पानांच्या पारंपरिक तोरणाला सार्वजनिक उत्सवाच्या स्वरूपात समोर आणतो, ज्यामुळे अभ्यागतांना नव्या वातावरणात परिचयाच्या बंगाली परंपरेशी जोडले जाण्याची संधी मिळते.

 

हा उपक्रम उत्सवी सजावटीबाबत पर्यावरणपूरक दृष्टिकोनही समोर आणतो, यामध्ये माझाने आपल्या तोरणांसाठी कंपोस्टेबल घटकांचा वापर केला आहे. यामुळे या फेस्टिव्ह इन्स्टॉलेशनला उत्सवाच्या पलीकडे जाऊन शाश्वततेचा विचार करत बंगालच्या परंपरांचा गौरव करणे शक्य होईल.

 

कोका-कोला इंडिया आणि साउथवेस्ट एशियाच्या न्यूट्रिशन विभागाच्या मार्केटिंगच्या सीनियर डायरेक्टर सुनैनिका सिंग म्हणाल्या, “पूजो घरी परतण्याचा, एकत्र येण्याचा आणि बंगाल ज्या आपुलकीने प्रत्येकाचे स्वागत करतो त्या उबदार भावनेचा उत्सव आहे. आंब्याच्या पानांचे तोरण याच भावनेची एक सुंदर अभिव्यक्ती आहे, जे शुभ सुरुवातीचे प्रतीक आणि येणाऱ्या प्रत्येकाला दिलेले निमंत्रण दर्शवते. माझा आमोंत्रोनच्या माध्यमातून ही परिचयाची परंपरा पूजोच्या मोठ्या पटावर मांडण्याचा आमचा प्रयत्न होता. उत्सवानंतर इन्स्टॉलेशनच्या आयुष्याचा विचार करून शाश्वत घटकांमधील नाविन्यता उत्सवाच्या अनुभवाचा भाग बनू शकते, याचाही आम्ही शोध घेतला आहे.”

 

स्वागताची ही भावना केवळ इन्स्टॉलेशनपुरती मर्यादित न ठेवता माझा आघाडीच्या प्रादेशिक वर्तमानपत्रात पूर्ण पानाचे निमंत्रण प्रसिद्ध करून पश्चिम बंगालमधील वाचकांना पूजो उत्सवाचा भाग होण्यासाठी आमंत्रि

त करणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments