वर्ल्ड इन्व्हेस्टर वीक २०२६ दरम्यान सुरू झालेली आयडियाथॉन २.० आर्थिक जागरूकता आणि सायबर सुरक्षेवर भर देण्यासाठी सीडीएसएलच्या रीइमॅजिन प्लॅटफॉर्मचा विस्तार करते, एकूण बक्षीस रक्कम ११.५ लाख रुपये
मुंबई, ऑक्टोबर ७, २०२६: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (“सीडीएसएल”) या आशियातील पहिली सूचीबद्ध डिपॉझिटरी आणि १९ कोटींहून अधिक डीमॅट खात्यांची विश्वासू संरक्षक कंपनीने आज रीइमॅजिन आयडियाथॉन २.० लाँच केले. अधिकाधिक वैविध्यपूर्ण आणि डिजिटल होत चाललेल्या गुंतवणूकदार वर्गासाठी आर्थिक जागरूकता आणि सायबर सुरक्षा अधिक मजबूत करू शकतील असे नाविन्यपूर्ण सोल्युशन्स विकसित करण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे.
भारतात ‘समज से इन्व्हेस्टिंग सिम्पल’ (Samajh Se Investing Simple’) संकल्पनेअंतर्गत साजऱ्या होत असलेल्या वर्ल्ड इन्व्हेस्टर वीक २०२६ दरम्यान सुरू झालेली ही आयडियाथॉन सेबीच्या ‘प्रोजेक्ट जागरूक’च्या गुंतवणूकदार जागरूकता आणि शिक्षण उद्दिष्टांना पूरक ठरते. सेबीचा हा प्रकल्प आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी, माहितीवर आधारित गुंतवणूक पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक फसवणुकीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी सेबी आणि सीडीएसएलसह सिक्युरिटीज मार्केट पार्टनर्सना एकत्र आणतो. ‘समज से इन्व्हेस्टिंग सिम्पल’च्या केंद्रस्थानी संकल्पना आहे की, सुशिक्षित गुंतवणूकदार हा सक्षम गुंतवणूकदार असतो आणि माहिती गुंतवणूकदारांना समजू शकेल आणि त्यांच्याशी सुसंगत ठरेल अशा पद्धतीने, भाषेत आणि स्वरूपात दिली जाईल तेव्हाच गुंतवणूकदार जागरूकता सर्वात प्रभावी ठरते. रीइमॅजिन आयडियाथॉन २.० संकल्पना प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी विद्यार्थी, अननुभवी गुंतवणूकदार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक जागरूकता व सायबर-सुरक्षा शिक्षण अधिक सुलभ, समर्पक आणि आकर्षक बनवण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करते.
सेबीच्या इन्व्हेस्टर सर्व्हे २०२५ नुसार, भारतातील अंदाजे ३३.७२ कोटी कुटुंबांपैकी जवळपास ३.२१ कोटी कुटुंबं, म्हणजेच ९.५ टक्के कुटुंबं सिक्युरिटीज मार्केट उत्पादनांमध्ये गुंतवणूक करतात, तर ६३ टक्के कुटुंबांना अशा किमान एका उत्पादनाची माहिती आहे. जागरूकता आणि प्रत्यक्ष सहभाग यांतील ही तफावत जागरूकतेचे रूपांतर अर्थपूर्ण समज आणि सजग सहभागामध्ये करण्याची गरज दर्शवते. भारताचा डीमॅट खात्यांचा पाया २३ कोटींच्या पुढे गेल्याने सिक्युरिटीज मार्केटमधील सहभागाची व्याप्ती लक्षणीयरित्या वाढली आहे. तसेच, सरकारी आकडेवारीनुसार २०२५ मध्ये सायबर फसवणुकीमुळे २२,४९५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे, यातील ७६ टक्के आर्थिक नुकसान बनावट गुंतवणूक आणि ट्रेडिंग घोटाळ्यांमुळे झाले आहे. हे सर्व कल एकत्र पाहता, आर्थिक समज आणि डिजिटल सुरक्षितता या दोन्हींची वाढती गरज अधोरेखित होते.
सीडीएसएलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. नेहल वोरा म्हणाले, “भारताने सिक्युरिटीज मार्केटचा विस्तार करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. आता पुढचे पाऊल म्हणजे माहितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि अधिक आत्मविश्वासाने सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदारांना सक्षम करून त्यांची समज अधिक सखोल करणे हे आहे. सेबीचा ‘प्रोजेक्ट जागरूक’ आणि ‘समज से इन्व्हेस्टिंग सिम्पल’ मोहिमेचा गुंतवणूकदार शिक्षण सोपे, सुलभ आणि समर्पक बनवण्यावर असलेला भर हे या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. सीडीएसएलमध्ये आम्ही गुंतवणूकदार शिक्षण अधिक सर्वसमावेशक आणि सुलभ बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग शोधत आहोत, ज्यामध्ये तरुण पिढीपर्यंत गुंतवणूकदार जागरूकता पोहोचवण्यासाठी अमर चित्र कथासोबत केलेल्या आमच्या सहयोगाचा देखील समावेश आहे. आत्मनिर्भर गुंतवणूकदार माहितीचे मूल्यांकन आणि पडताळणी करण्यास, जोखीम व लाभांचे विश्लेषण करण्यास आणि आत्मविश्वासाने विचारपूर्वक निर्णय घेण्यास सक्षम असला पाहिजे. रीइमॅजिन आयडियाथॉन २.० मुळे विद्यार्थी आणि भविष्यातील बाजारपेठेतील सहभागींना या प्रवासाचा भाग होण्याची आणि अधिक जागरूक, जबाबदार व सर्वसमावेशक गुंतवणूकदार परिसंस्था निर्माण करता येईल याबद्दल त्यांचे दृष्टिकोन मांडण्याची संधी मिळते.”
रीइमॅजिन आयडियाथॉन सेबीच्या मेंटॉरिंग ऑफ युनिव्हर्सिटी/कॉलेज स्टुडंट्स बाय ट्रेनर्स (एमयूएसटी) उपक्रमालाही पूरक ठरते, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता आणि सिक्युरिटीज मार्केटविषयी जागरूकता वाढवणे हा आहे. एमयूएसटीचे प्रशिक्षित भागीदार प्रशिक्षकांच्या माध्यमातून युनिव्हसर्सिटी आणि महाविद्यालयीन कॅम्पसेसमध्ये पद्धतशीर आर्थिक शिक्षण पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित आहे. तसेच, रीइमॅजिन आयडियाथॉन २.० विद्यार्थ्यांना गुंतवणूकदार शिक्षण त्यांच्या पिढीसाठी अधिक सर्वसमावेशक, सुलभ आणि समर्पक बनवण्यासाठी स्वतःहून नवनवीन संकल्पना व सोल्युशन्स सादर करण्यास प्रोत्साहित करते.
सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रस्तावित सोल्युशन्ससाठी सर्वात योग्य वाटणारे स्वरूप, तंत्रज्ञान, डिलिव्हरी मॉडेल किंवा दृष्टिकोन निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने डिजिटल प्लॅटफॉर्म्स, मोबाइल अॅप्लिकेशन्स, वेबसाइट्स, चॅटबॉट्स, गेम्स, सिम्युलेशन्स, लर्निंग मॉड्यूल्स, जनजागृती मोहिमा, कम्युनिटी मॉडेल्स किंवा एआय-सक्षम असिस्टंट्सचा समावेश आहे. सादर केलेल्या सोल्युशन्सचे मूल्यांकन बहुविद्याशाखीय ज्युरीकडून केले जाईल. यात नाविन्यता, वापरकर्त्याचा अनुभव, प्रभाव आणि उपयुक्तता, व्यवहार्यता, स्केलेबिलिटी, सुलभता, डेटा संरक्षण आणि सादरीकरणाची स्पष्टता या निकषांचा समावेश असेल. या ज्युरीचे अध्यक्षपद श्री. एस. रामदोराई भूषवतील, ज्यांची प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कारकीर्द उद्योग, सार्वजनिक धोरण आणि संस्था-उभारणीच्या नेतृत्वापर्यंत विस्तारलेली आहे. यात टीसीएसचे सीईओ व एमडी, बीएसईचे चेअरपर्सन, कौशल्य विकासावर पंतप्रधानांचे सल्लागार, आणि सध्या कर्मयोगी भारतचे अध्यक्ष म्हणून भूषवलेल्या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे.
नोंदणी ७ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली आहे, अव्वल पाच टीम्ससाठी एकूण ११.५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
रीइमॅजिन आयडियाथॉन २.० सीडीएसएलच्या पहिल्या रीइमॅजिन आयडियाथॉनच्या यशावर आधारित आहे, ज्यामध्ये २१ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील जवळपास १०० संस्थांमधून १,००० हून अधिक नोंदणी प्राप्त झाल्या होत्या आणि तिसऱ्या सीडीएसएल अॅन्युअल रीइमॅजिन सिम्पोजियममध्ये पाच टीम्सना त्यांच्या उत्कृष्ट संकल्पनांसाठी गौरविण्यात आले होते.
नोंदणी, समस्या विधाने, मूल्यमापन निकष आणि वेळापत्रक यांविषयी अधिक तपशील सीडीएसएल रीइमॅजिन आयडियाथॉनची वेबसाइट https://ideathon.cdslindia.com/ वर उप
लब्ध आहेत.


