Friday, October 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्पोर्ट्सस्किलतर्फे पुण्यात पहिल्या फिजिकल हाय-परफॉर्मन्स सेंटरचा शुभारंभ

स्पोर्ट्सस्किलतर्फे पुण्यात पहिल्या फिजिकल हाय-परफॉर्मन्स सेंटरचा शुभारंभ

 

 

सातवेळा वर्ल्ड मास्टर्स चॅम्पियन ठरलेल्या जिऑफ डॅव्हनपोर्ट आणि सहावेळा नॅशनल स्कॉश चॅम्पियन ठरलेल्या रिषाद पांडोले यांच्या हस्ते उद्घाटन

 

पुणे, १६ ऑक्टोबर : चान्स-२-स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पाठीशी असलेल्या ‘स्पोर्ट्सस्किल’ या स्पोर्ट्स-टेक आणि ॲथलीट डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्मने आज आपले तंत्रज्ञान स्क्रीनवरून थेट कोर्टवर आणले. कंपनीने पुण्यात थुबे पार्क येथील इन्फिनिटी बिझनेस पार्कच्या १६ व्या मजल्यावर ‘स्पोर्ट्सस्किल एक्स’ हे आपले पहिले भौतिक हाय-परफॉर्मन्स सेंटर सुरू केले. इमारतीच्या १६ व्या मजल्यावर वसलेले आणि शहराच्या नयनरम्य दृश्याची अनुभूती देणारे ‘स्पोर्ट्सस्किल एक्स’ हे भारत आणि आशियातील सर्वांत उंचावर असलेल्या स्कॉश सुविधांपैकी एक आहे.

 

या सेंटरचे उद्घाटन ऑस्ट्रेलियाचे सात वेळा वर्ल्ड मास्टर्स स्कॉश चॅम्पियन आणि वर्ल्ड मास्टर्सच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेल्या जिऑफ डॅव्हनपोर्ट यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला सहा वेळा राष्ट्रीय स्कॉश चॅम्पियन आणि नामांकित व्यावसायिक रिषाद पांडोले हेदेखील उपस्थित होते. त्यांच्यासोबत सह-संस्थापक अभिनव सिन्हा आणि चेतन देसाई यांच्यासह अन्य ॲथलीट्स, प्रशिक्षक, पालक आणि पुण्यातील क्रीडा व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

स्पोर्ट्स-टेक प्लॅटफॉर्म स्वतःचे कोर्ट का उभारतोय?

भारतातील बहुतांश स्पोर्ट्स-टेक प्लॅटफॉर्म्स केवळ फोनपुरतेच मर्यादित राहतात. म्हणजे ट्रॅकिंग, रँकिंग किंवा बुकिंग करणारे ॲप्स. परंतु, स्पोर्ट्सस्किलने अधिक समावेशक मार्ग निवडला आहे. गेल्या काही वर्षांत यांच्या ॲपने १० ते १२ शहरांमधील खेळाडूंचे ट्रेनिंग, मॅच फुटेज आणि प्रगतीची नोंद ठेवली आहे. स्पोर्ट्सस्किल एक्स मुळे या डेटाला एक प्रत्यक्ष भौतिक केंद्र मिळाले आहे, जिथे प्रशिक्षक, फिजियो आणि स्वत: खेळाडू दररोज त्यावर काम करू शकतील.

 

ॲप खेळाडूला काय सुधारायचे आहे हे सांगू शकते; पण हाय-परफॉर्मन्स सेंटर ही ती जागा आहे जिथे ते प्रत्यक्ष सुधारणा घडवून आणतात. दोन्ही एकाच ब्रँडखाली आल्यामुळे, स्पोर्ट्सस्किलने मूल्यांकन आणि प्रशिक्षण यातील अंतर भरून काढले आहे. अशा प्रकारे ॲपवरील पहिल्या मूल्यांकनापासून ते कोर्टवरील उच्च दर्जाच्या प्रशिक्षणापर्यंत स्वतःचे ‘फिजीटल’ मॉडेल चालवणारा हा भारतातील मोजक्या स्पोर्ट्स-टेक प्लॅटफॉर्म्सपैकी एक ठरला आहे.

 

याची वेळही अत्यंत महत्त्वाची आहे. ‘लॉस एंजेलीस २०२८’ च्या ऑलिम्पिकमध्ये स्कॉश या खेळाचा पदार्पण म्हणून समावेश होत असल्याने, भारतीय खेळाडूंना केवळ परदेशातच नाही तर मायदेशातही जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची गरज आहे. स्पोर्ट्सस्किल एक्सची उभारणी याच उद्देशाने करण्यात आली आहे, जी त्यांच्या “अबोव्ह द सिटी, बियाँड द गेम” (शहर ओळखणाऱ्या उंचीवर, खेळाच्याही पलीकडे) या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवते.

 

जिथे गुणवत्तेचा आणि तंत्रज्ञानाचा संगम होतो

स्पोर्ट्सस्किल एक्स ची रचना केवळ भाड्याने मिळणारे कोर्ट म्हणून नाही, तर एक परिपूर्ण परफॉर्मन्स इकोसिस्टम म्हणून करण्यात आली आहे. हे केंद्र तंत्रज्ञान, मार्गदर्शन, कामगिरी आणि संधी या चार स्तंभांवर आधारित आहे. येथील नवीन जागतिक दर्जाच्या स्कॉश कोर्ट्स आणि इतर क्रीडा सुविधांव्यतिरिक्त, या केंद्रात स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग झोन, व्हिडिओ अँड डेटा ॲनालिसिस सुट आणि एक समर्पित रिकव्हरी एरिया देखील आहे.

 

स्पोर्ट्सस्किल एक्स मधील प्रत्येक कोर्ट सेशनची माहिती स्पोर्ट्सस्किल ॲपमध्ये अपडेट केली जाईल, ज्याचा वापर सध्या ३०० हून अधिक सक्रिय वापरकर्ते प्रशिक्षण नोंदवण्यासाठी, मॅच फुटेज अपलोड करण्यासाठी आणि वैयक्तिक फीडबॅक मिळवण्यासाठी करत आहेत. या केंद्रात कॅप्चर केलेला व्हिडिओ आणि परफॉर्मन्स डेटा प्रत्येक खेळाडूची योजना आखण्यास मदत करेल, ज्यामुळे खेळाडूची प्रगती ही केवळ अंदाजावर न राहता मोजता येण्याजोगी असेल.

 

येथील कोचिंग ‘रोलिंग निक्स चॅम्पियन्स गुरुकुल’ द्वारे चालवले जाते, ज्याचे नेतृत्व माजी आशियाई ज्युनिअर व वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिप खेळाडू आणि कोच श्रेणीतील दोन वेळा राष्ट्रीय विजेते ठरलेले अभिनव सिन्हा करत आहेत. खेळाडूंना तंत्र, फिटनेस, न्यूट्रिशन आणि मेंटल कंडिशनिंगचे प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामध्ये ‘फिट२स्पोर्ट’ परफॉर्मन्स पार्टनर म्हणून सोबत आहे.

 

थुबे पार्कमध्ये एका प्रवासाची पूर्णता

या पत्त्यामागे एक कहाणी आहे. थुबे पार्क हीच ती जागा आहे जिथे सिन्हा यांच्या पूर्वीच्या ‘रोलिंग निक्स स्पोर्ट्स फाऊंडेशन’ या उपक्रमाने त्यांचे मित्र आणि स्कॉशप्रेमी योगेश थुबे यांच्यासोबत पुण्यातील पहिले मोफत स्कॉश कोर्ट सुरू केले होते. यामुळे शहरातील अनेक मुलांनी पहिल्यांदाच रॅकेट हातात घेतली.

 

स्पोर्ट्सस्किल आणि चान्स२स्पोर्ट्स सिस्टीममधील ॲथलीट्सनी अनेक राष्ट्रीय विजेतेपदे पटकावली आहेत. १५ वर्षांखालील मुलींच्या आणि १७ वर्षांखालील गटाच्या नॅशनल रँक १ आणि १९ वर्षांखालील गटात रँक २ मिळवला आहे, तसेच आशियाई ज्युनिअर आणि वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पुण्यातील अनिका दुबे हिने वयाच्या १० व्या वर्षी या प्रोग्राममध्ये प्रवेश केला होता, तिने नुकतेच आशियाई ज्युनिअर स्कॉश चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.

 

मोठ्या उद्दिष्टांसाठी निर्मित, गुणवत्तेसाठी खुले

स्पोर्ट्सस्किल एक्स हे चान्स-२-स्पोर्ट्स फाउंडेशनच्या ‘नेक्स्टगेन सुपर ३०’ या मोहिमेसाठी हाय-परफॉर्मन्स बेस म्हणूनही काम करेल. हा ५ वर्षांचा आणि २५ कोटी रुपयांचा उपक्रम असून, याद्वारे विविध पार्श्वभूमीतील सुमारे ३,००० मुलांचे मूल्यमापन केले जाईल आणि त्यातील ३०० मुलांना देण्याघेण्याच्या क्षमतेचा विचार न करता मोफत उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल. भारताचा पहिला ‘वर्ल्ड ज्युनिअर स्कॉश गोल्ड मेडलिस्ट’ तयार करणे एवढेच नाही, तर भविष्यातील चॅम्पियन्सची मालिका निर्माण करणे हे या फाऊंडेशनचे ध्येय आहे.

 

अभिनव सिन्हा, सह-संस्थापक (स्पोर्ट्सस्किल आणि चान्स२स्पोर्ट्स) म्हणाले, मी एकाही स्कॉश अकादमी नसलेल्या शहरात लहानाचा मोठा झालो. त्यानंतर मी जे काही उभे केले ते एकाच ध्येयाने, की पुढच्या कोणत्याही गुणवंत मुलाला अशा अडचणींचा सामना करावा लागू नये. स्पोर्ट्सस्किल X ही अशी सुविधा आहे जी मला वयाच्या १२ व्या वर्षी मिळावी अशी माझी इच्छा होती. आता पुणे, कळंब किंवा आसाममधील एखादे मूल जगातल्या कोणत्याही सर्वोत्तम सुविधेशी बरोबरी करू शकेल अशा ठिकाणी डेटा आणि कोचिंगच्या पूर्ण पाठिंब्यासह प्रशिक्षण घेऊ शकते.”

 

चेतन देसाई, सह-संस्थापक (स्पोर्ट्सस्किल आणि चान्स२स्पोर्ट्स) म्हणाले, आम्ही तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म म्हणून सुरुवात केली, कारण आमचा विश्वास होता की डेटा अधिक वेगाने गुणवत्ता शोधू आणि वाढवू शकतो. परंतु केवळ डेटा चॅम्पियन बनवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला कोर्ट, कोच आणि रिकव्हरी रूमचीही गरज असते. स्पोर्ट्सस्किल एक्स ही अशी जागा आहे जिथे आमचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष जगाशी जोडले जाते. या कोर्टवर कोण खेळणार हे पैसा नाही तर गुणवत्ता ठरवेल, आणि ते किती लांबचा टप्पा गाठतील हे तंत्रज्ञान ठरवेल.

 

जिऑफ डॅव्हनपोर्ट, सातवेळा वर्ल्ड मास्टर्स स्कॉश चॅम्पियन म्हणाले, मी अनेक दशकांत अनेक देशांमध्ये स्कॉश खेळलो आहे, पण असा अप्रतिम नजराणा असणारे कोर्ट मी क्वचितच पाहिले आहे. पण मला त्याहून अधिक प्रभावित करणारी गोष्ट म्हणजे इथे होणारे काम. येथील कोचिंग, स्पोर्ट्स सायन्स आणि डेटाचे संयोजन जागतिक दर्जाचे आहे. स्कॉश आता ऑलिम्पिककडे वाटचाल करत असल्याने, भारताकडे एक मोठी ताकद बनण्याची क्षमता आहे आणि स्पोर्ट्सस्किल एक्स सारखी केंद्रे त्या गुणवत्तेला तिथपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments