Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedविनोबा भावे मातृशक्ती स्मृती संदेश यात्रा*  *दि.२१ रोजी पुण्यात*  ...

विनोबा भावे मातृशक्ती स्मृती संदेश यात्रा*  *दि.२१ रोजी पुण्यात*  *-माजी आमदार मोहन जोशी* 

 

 

 

पुणे – महात्मा गांधीचे प्रथम सत्याग्रही आचार्य विनोबा भावे यांच्या मातोश्री पूजनीय रूख्मिणीदेवी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित मातृशक्ती स्मृती संदेश यात्रा दि.२१ रोजी पुण्यात येत असून एस.एम.जोशी हॉल येथे सायंकाळी साडेचार वाजता माननीयांच्या उपस्थितीत यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येईल, अशी माहिती, यात्रेचे निमंत्रक माजी आमदार मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

पूजनीय रूख्मिणीदेवी यांच्या त्यागमय जीवनाला अभिवादन करण्यासाठी कर्नाटकातील जमखंडी ते धुळे असे यात्रेचे आयोजन केले आहे. उत्तरप्रदेशातील विनोबा भावे आश्रमाचे प्रमुख रमेशभैय्या यात्रेचे नेतृत्व करीत आहेत. ही यात्रा २१ऑक्टोबर रोजी पुण्यात येईल तेव्हा एस.एम.जोशी सोशालिस्ट फौंडेशन, नवी पेठ येथे स्वागत समारंभ आयोजित केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे राजन अन्वर, सुभाष लोमटे, अँड.संतोष म्हस्के, सुभाष पाटील, डॉ.दिलीप गरूड, प्रथमेश आबनावे उपस्थित रहातील. या प्रसंगी गांधीवादी विचारांचे अनुयायी, सर्वोदयी कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती मोहन जोशी यांनी पत्रकात दिली आहे.

 

*स्मृती यात्रेचे पुण्यातील कार्यक्रम*

उरळी कांचन येथून दि. २१ रोजी सकाळी साडेसात वाजता यात्रेचे प्रस्थान होईल. सकाळी ९.३० वाजता आगाखान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांच्या समाधीसमोर प्रार्थना होईल,

 

आगाखान पॅलेस येथून प्रार्थना झाल्यानंतर एस.एम.जोशी फाउंडेशन येथे ११ वाजता यात्रा पोहोचेल. त्यानंतर रावसाहेब पटवर्धन शाळा राष्ट्रसेवा दल येथे विद्यार्थ्यांशी संवाद, विमलबाई लुंकड विद्यालय, गुलटेकडी, डायस प्लॉट येथे विद्यार्थ्यांशी संवाद. भवानी पेठ येथील आचार्य विनोबा भावे शाळेमध्ये आणि विद्यार्थ्यांची संवाद. सायंकाळी ४.३० वाजता एस.एम.जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे स्वागत समारंभ होईल, अशी माहिती मोहन जोशी यांनी पत्रकात दिली आहे.

 

पुण्यातील या यात्रेच्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, महाराष्ट्र हरिजन सेवक संघ, एस.एम.जोशी सोशालिस्ट फौंडेशन, साने गुरुजी संस्कार साधना, पुणे जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवा दल, नोईंग गाधीजन इत्यादी संघटना सहभागी आहेत.

 

*गांधी-विनोबा विचारांना नवी ऊर्जा देणारी यात्रा**

 

मातृशक्ती स्मृती संदेश यात्रेचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत होत आहे. केवळ स्मरण आणि अभिवादनापुरती मर्यादित न राहता, मातृशक्तीचे योगदान, गांधी-विनोबा यांचे जीवनमूल्य, अहिंसक संघर्ष, सत्याग्रह, सामाजिक समता आणि परिवर्तनशील विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या यात्रेचा महत्त्वाचा उद्देश आहे.

 

आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत अहिंसक, सत्याग्रही आणि विधायक परिवर्तनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा यात्रांमधून नवी प्रेरणा व ऊर्जा मिळत आहे. विद्यार्थिनी आणि युवकांशी होणारा संवाद हा या विचारांचा वारसा पुढील पिढीकडे सुपूर्द करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 

या यात्रेच्या माध्यमातून रुक्मिणी मातेच्या स्मृतींना अभिवादन करतानाच गांधीवादी आणि सर्वोदय विचारांच्या प्रसारासाठी समाजातील विविध घटकांनी एकत्र यावे, असे आवाहन निमंत्रक मोहन जोशी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments