मुंबई, 19 ऑक्टोबर २०२६ : माधुरी दीक्षित आणि रणबीर कपूर ‘वारसा’ या विषयावर बोलत असतात, तेव्हा प्रेक्षकांना वाटते की ते त्यांच्या स्वतःच्या यशस्वी कारकीर्द आणि वारशाविषयी बोलत आहेत. पण नंतर कळते की ते भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि परंपरेचा वारसा लाभलेल्या पीएनजी ज्वेलर्स या ज्वेलरी ब्रँडबद्दल बोलत आहेत. पीएनजी ज्वेलर्सच्या ‘अनस्टॉपेबल लेगसी’ या नवीन ब्रँड मोहिमेमागची हीच कल्पना आहे. ही पीएनजी ज्वेलर्सची पहिली टीव्हीसी असून यात माधुरी दीक्षित आणि रणबीर कपूर हे पीएनजी ज्वेलर्सचे दोन ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. सणासुदीचा आणि लग्नसराईचा हंगाम सुरू होत असताना ही जाहिरात राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर आणि डिजिटल माध्यमांवर प्रदर्शित होत आहे.
ही जाहिरात एका शोच्या बॅकस्टेजवर घडते. रणबीर संवादाची सुरुवात करतो, “हमें इंट्रोडक्शन की क्या ज़रूरत, हम तो ओल्ड गोल्ड हैं” ” त्यावर माधुरी उत्तर देते, “ “लाखों दिलों में बसे रहना, कोई आसान बात है क्या?” प्रत्येक पिढीच्या मनावर राज्य गाजवणे आणि चिरंतन आकर्षण जपणारा तेजस्वीपणा याविषयी त्यांच्यात संवाद रंगतो. यातील एकाने वारसा पुढे चालवला आहे, तर दुसऱ्याने स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. शेवटी, स्टेजवर खरा उलगडा होतो की, हे सर्व ‘पीएनजी ज्वेलर्स’ बद्दल होते. जाहिरातीचा शेवट ‘अनस्टॉपेबल लेगसी’ या वाक्याने होतो.
या मोहिमेबद्दल बोलताना पीएनजी ज्वेलर्स चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की,वारसा हा पिढ्यानपिढ्या कष्ट करून कमावला जातो. पीएनजी ज्वेलर्सने १८३२ पासून स्वतःचा समृद्ध वारसा जपला आहे. अनेक दशकांपासून कुटुंबांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांसाठी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. माधुरी दीक्षित यांनी स्वतःचा एक वेगळा वारसा निर्माण केला आहे, तर रणबीर कपूर हे एक वारसा पुढे नेत आहेत. म्हणूनच, सण-उत्सव आणि लग्नसराईच्या या काळात ही कथा मांडण्यासाठी हे दोघे अगदी योग्य आहेत.
पीएनजी ज्वेलर्सचे मार्केटिंग, ई-कॉमर्स, सीआरएम आणि सीएसआर विभागाचे प्रमुख, हेमंत चव्हाण म्हणाले, “ एखाद्या प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या ब्रँडसाठी खरा धोका म्हणजे ग्राहकांकडून कौतुक मिळणे, पण (प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी) त्या ब्रँडची निवड न होणे. तरुण प्रेक्षकांना आवर्जून शेअर करावासा वाटेल आणि त्यांच्या आईलाही तितक्याच आनंदाने पाहता येईल, अशी जाहिरात फिल्म आम्हाला साकारायची होती. या फिल्मच्या शेवटच्या दृश्यात पीएनजी ज्वेलर्सचे स्थान स्वाभाविकपणे आणि प्रभावीपणे अधोरेखित व्हावे, हा आमचा उद्देश होता. ब्रँडवर कुटुंबांनी ठेवलेल्या विश्वासाचे माधुरी दीक्षित या प्रतीक आहेत, तर रणबीर कपूर नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. जाहिरातपटाच्या शेवटी होणारे ब्रँडचे अनावरण १८३२ पासून सुरू असलेला पीएनजी ज्वेलर्सचा समृद्ध वारसा आणि आजही तितक्याच जोमाने सुरू असलेली त्याची वाटचाल अधोरेखित करते, ‘अनस्टॉपेबल लेगसी’ हेच वाक्य आम्हाला ब्रँडची ओळख म्हणून पुढे न्यायचे आहे.
माधुरी दीक्षित म्हणाल्या की,अनेक वर्षांपर्यंत लोकांच्या हृदयात स्थान टिकवून ठेवणे सोपे नसते, आणि ब्रँडच्या बाबतीतही हे तितकेच खरे आहे. पीएनजी ज्वेलर्सने अनेक पिढ्यांपासून हे स्थान टिकवून ठेवले आहे आणि अनेक वर्षांपासून या ब्रँडचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. रणबीरसोबत ही जाहिरात करताना खूप मजा आली. मला आशा आहे की प्रेक्षकांना त्यातील ट्विस्ट नक्कीच आवडेल.
रणबीर कपूर म्हणाला, वारसा आपल्यासोबत जबाबदारी घेऊन येतो. तुमच्या आधीच्या पिढ्यांनी निर्माण केलेल्या गोष्टींचा आदर राखत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणेही महत्त्वाचे असते. १८३२ पासून पीएनजी ज्वेलर्सने परंपरा जपली आहे, म्हणूनच पीएनजी कुटुंबाचा भाग होणे मला योग्य वाटले. या जाहिरातीसाठी माधुरी मॅडमसोबत काम करण्याचा अनुभव खूप आनंददायी होता.
ही जाहिरात स्टार प्लस, ईटी नाऊ, आज तक आणि रिपब्लिक भारत यांसारख्या वाहिन्यांवर, तसेच यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि कनेक्टेड टीव्हीवर प्रसारित केली जाईल. तसेच पीएनजी ज्वेलर्सच्या स्टोअर्समध्ये आणि चित्रपटगृहांमध्येही दाखवली जाईल. या कॅम्पेन अंतर्गत, १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पीएनजी ज्वेलर्सच्या सर्व स्टोअर्स मध्ये सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर विशेष फेस्टिव्ह ऑफर्स उपलब्ध असतील.


