Wednesday, October 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी वाहतुकीत बदल*

*स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी वाहतुकीत बदल*

 

 

पुणे, दि.२१: स्वारगेट ते कात्रज दरम्यान भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून मार्केट यार्ड परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये तात्पुरते स्वरूपात बदल करण्यात आले आहेत.

 

अपर बिबवेवाडी कडून चंद्रलोक चौक मार्गे पुष्पमंगल चौकात येणाऱ्या वाहनांना स्वारगेट, मार्केटयार्ड, उत्सव हॉटेलकडे उजवीकडे वळण्यास बंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांनी डावीकडे वळून तनिष्क शोरूम समोरून अरणेश्वर बस स्टॉप येथून यू टर्न घेऊन स्वारगेट कडे जावे.

 

स्वारगेट कडून पुणे सातारा रोडने तसेच मार्केट यार्ड कडून सातारा, कात्रज, बिबेवाडी कडे जाणारी वाहतूक ही वेलनेस मेडिकल स्टोअर तसेच भापकर पेट्रोल पंपाच्या बाजूने पुष्पमंगल चौकातून कात्रज अपर बिबवेवाडी मार्गे वळविण्यात आली आहे. पुष्पमंगल चौकाकडून मार्केटयार्ड, उत्सव हॉटेल चौक येथून उजवीकडे वळण्यास बंदी करण्यात आली आहे.

 

मार्केटयार्ड, उत्सव हॉटेल चौक येथून स्वारगेट कडे जाणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळण्यास बंदी करण्यात येत आहे. मार्केट यार्ड कडून येणाऱ्या वाहनांनी वखार महामंडळ चौक येथून इच्छित स्थळी जावे. अथवा पुष्पमंगल चौक तनिष्क शोरूम, अरणेश्वर बस स्टॉप येथून यू टर्न घेऊन किंवा वखार महामंडळ चौकातून इच्छित स्थळी जावे,अशी माहिती वाहतूक शाखेने कळविली आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments