हाय प्रोटीन दही, मिल्क कॉफी आणि केशर इलायची फ्लेव्हरच्या रूपात, तुमच्या रोजच्या आहारात प्रोटीनचा समावेश करणे सहजशक्य
बेंगळुरू, 21 ऑक्टोबर, २०२६: भारतातील आघाडीचा प्रमाणित ऑरगॅनिक डेअरी ब्रँड ‘अक्षय कल्प ऑरगॅनिक’ने आपल्या हाय-प्रोटीन पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. यामध्ये रोजच्या जेवणातील दह्याला प्रोटीनचा नवा पर्याय देत ‘हाय प्रोटीन दही’ लाँच करण्यात आले आहे, तसेच ‘हाय प्रोटीन मिल्क – कॉफी’ आणि ‘हाय प्रोटीन मिल्क – केशर इलायची’ देखील बाजारात आणले आहे. सर्वांना माहिती असलेल्या डेअरी उत्पादनांसोबत उत्तम चव आणि सहज मिळवता येण्याजोगे पोषण यांचा मेळ हे या नवीन श्रेणीचे वैशिष्टय आहे. त्यामुळे आता ग्राहकांना त्यांच्या रोजच्या आहारात अधिक प्रोटीनचा समावेश करणे सहज सोपे होईल.
भारतामध्ये पोषणाविषयीच्या चर्चेत प्रोटीनचे प्रमाण हा आजही एक महत्त्वाचा विषय असतो. ‘इंडियन मार्केट रिसर्च ब्युरो’ (IMRB) च्या अभ्यासानुसार, जवळपास ७३% भारतीयांच्या आहारात रोजच्या आवश्यक प्रोटीनचा तुटवडा जाणवतो. यावरूनच, रोजच्या जेवणात सहज आणि सोप्या पद्धतीने प्रोटीनचा समावेश करण्याची गरज किती जास्त आहे हे अधोरेखित होते. अक्षय कल्प ऑरगॅनिकची नवीन उत्पादन श्रेणी गाईच्या ताज्या सेंद्रिय दुधापासून बनवलेल्या, सर्वांना माहिती असलेल्या डेअरी उत्पादनांद्वारे हीच गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करते.
नवीन उत्पादनांपैकी प्रमुख आहे ‘हाय प्रोटीन दही’, ज्याच्या प्रत्येक ४०० ग्रॅमच्या टबमधून २८ ग्रॅम प्रोटीन मिळते. किंमत फक्त ₹९९ असून, रोजच्या भारतीय जेवणाचा भाग असलेल्या दह्याला प्रोटीनचा एक उत्तम पर्याय म्हणून सादर करते. रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी न बदलता आहारात प्रोटीन वाढवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. हे दही तुम्ही असेच खाऊ शकता किंवा रोजच्या जेवणासोबतही याचा आस्वाद घेऊ शकता.
‘हाय प्रोटीन मिल्क – कॉफी’ आणि ‘हाय प्रोटीन मिल्क – केशर इलायची’ मुळे ही नवी श्रेणी अधिक आकर्षक बनली आहे. यातील प्रत्येक २५० मिलीच्या सर्व्हिंगमधून तब्बल २५ ग्रॅम प्रोटीन मिळते. हे पिण्यासाठी तयार दूध ‘अल्ट्राफिल्टर्ड ऑरगॅनिक मिल्क’ वापरून बनवले आहे, जे कोणत्याही कृत्रिम प्रोटीन पावडर किंवा आयसोलेट्सशिवाय नैसर्गिकरित्या दुधातील प्रोटीनचे प्रमाण वाढवते. हे दूध ग्राहकांच्या आवडीच्या आणि माहिती असलेल्या स्वादांमध्ये उपलब्ध आहे. कॉफी व्हेरियंटमध्ये तुम्हाला अस्सल कॉफीचा मन ताजेतवाने करणारा अनुभव मिळतो, तर केशर इलायचीमध्ये खऱ्याखुऱ्या केशर आणि वेलचीचा समावेश करण्यात आला आहे. ही दोन्ही उत्पादने लॅक्टोज-फ्री, लो-फॅट आणि अँटीबायोटिक-मुक्त असून, यामध्ये कोणतीही अतिरिक्त साखर किंवा स्टॅबिलायझर्स वापरलेले नाहीत. यांची किंमत ₹११० आहे.
या लाँचबद्दल बोलताना, अक्षय कल्प ऑरगॅनिकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशी कुमार म्हणाले, “प्रोटीन हा संतुलित आहाराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, पण रोजच्या धावपळीत त्याचे प्रमाण योग्य राखण्यासाठी बऱ्याचदा वेगळे प्रयत्न करावे लागतात. लोकांच्या आवडीच्या आणि नेहमीच्या डेअरी उत्पादनांच्या माध्यमातून प्रोटीन उपलब्ध करून देऊन, हेच प्रयत्न आम्हाला सोपे करायचे होते. ‘हाय प्रोटीन दही’ हा रोजच्या आहारातील एका मुख्य पदार्थाला नवा पर्याय दिला आहे, जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या नेहमीच्या जेवणात सहजपणे अधिक प्रोटीन जोडता येईल. यासोबतच, आमच्या कॉफी आणि केशर इलायची ‘हाय प्रोटीन मिल्क’च्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना त्यांच्या रोजच्या आहारात प्रोटीनचा समावेश करण्यासाठी अधिक पर्याय देत आहोत. उत्तम पोषण अधिक सुलभ, योग्य आणि आनंददायी बनवण्याच्या आमच्या प्रयत्नातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
ही नवीन उत्पादने ‘अक्षय कल्प’ ॲपवर आणि ब्रँडच्या डिलिव्हरी नेटवर्कद्वारे बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि पुणे येथे उपलब्ध आहेत.


