• जगातील नं. १ ओट्स ब्रँड आता नाश्त्याच्या पलीकडे विस्तार करत आहे. रोझ ड्राय फ्रूट लाडू आणि रागी चॉको चिक्की बाईट्ससह उत्तम प्रतीचे ओट्स, १२% प्रथिने आणि उच्च फायबर भारतीय स्नॅकच्या परिचित प्रकारांमध्ये आणले आहेत.
• नवीन जाहिरात चव आणि पौष्टिक स्नॅकिंगची निवड यांमधील दैनंदिन द्विधा मनःस्थिती टिपते
Film link – Quaker Protein Ladooz and Chikki Bites
राष्ट्रीय २३ ऑक्टोबर २०२६: अधिक पौष्टिक पर्याय निवडताना भारताच्या स्नॅकिंगच्या पद्धतीत बदल करायची गरज नसेल तर?
पेप्सिको इंडिया आता क्वेकर® प्रोटीन लाडूज आणि क्वेकर® प्रोटीन चिक्की बाईट्ससह आपल्या ‘बेटर फॉर यू’ स्नॅकिंग पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. त्यामुळे क्वेकर® फक्त नाश्त्याचा भाग न होता रोजच्या भारतीय स्नॅकिंगचा भाग होत आहे. रोज ड्राय फ्रूट लाडू आणि रागी चॉको चिक्की बाईट्स या दोन अत्यंत लोकप्रिय प्रकारांमध्ये उत्तम दर्जाचे ओट्स, १२% प्रोटीन आणि उच्च फायबर एकत्र आणणारी ही नवीन श्रेणी ग्राहकांना फक्त १० रूपयांत त्यांच्या रोजच्या स्नॅकिंगमध्ये प्रोटीन आणि फायबरचा समावेश करणे सोपे करते. कोणतीही कृत्रिम चव आणि पाम तेलाशिवाय बनवलेली ही उत्पादने परिचित चवींसोबतच अधिक सहज उपलब्ध पौष्टिक पदार्थांचा पर्याय देतात.
हे सादरीकरण पेप्सिको इंडियाचे ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि समर्पक नावीन्यपूर्णता या गोष्टींवर असलेले लक्ष लक्ष दर्शवते. प्रथिने आणि फायबरच्या सेवनातील अडथळे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पेप्सिको इंडियाने, युरोमॉनिटर इंटरनॅशनल आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्चच्या (आयआयएमआर) सहकार्याने ‘द स्टेट ऑफ प्रोटीन अँड फायबर इन अर्बन इंडिया’ हा अभ्यास हाती घेतला. या अभ्यासात ग्राहक हे पोषक घटक कसे समजून घेतात आणि त्यांचा आपल्या दैनंदिन आहारात कसा समावेश करतात, याचा शोध घेण्यात आला.
या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पोषणाच्या गरजा आणि दैनंदिन सेवन यात एक मोठी तफावत आहे. सुमारे ७०% प्रतिसादकर्ते दररोज ४१ ग्रॅमपेक्षा कमी प्रथिने घेतात. ही पातळी शिफारस केलेल्या सेवन पातळीपेक्षा कमी आहे, तर ६१% लोक आपल्या शिफारस केलेल्या दैनंदिन फायबरपेक्षा कमी फायबरचे सेवन करतात. वाजवी दर हे एक प्रमुख आव्हान आहे, कारण ६०% लोकांनी पुरेशा प्रथिनांच्या सेवनातील अडथळा म्हणून जास्त किमतीचा उल्लेख केला आहे.
अर्थात, चांगल्या पोषणाची मागणी स्पष्ट आहे. जनरेशन झी, मिलेनियल्स आणि जनरेशन एक्स मधील ८९% प्रतिसादकर्त्यांनी प्रथिने अधिक परिचित, दैनंदिन खाद्यपदार्थांच्या स्वरूपात उपलब्ध व्हावीत अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे हे निष्कर्ष प्रथिने आणि फायबर अधिक सुलभ, परवडणारे आणि सध्याच्या खाण्याच्या सवयींशी सुसंगत बनवून पौष्टिकतेतील तफावत भरून काढण्याची एक स्पष्ट संधी अधोरेखित करतात.
इथेच क्वेकर® ला एक बदल घडवण्याची संधी दिसते. हा ब्रँड ग्राहकांना त्यांच्या स्नॅकिंगच्या सवयी बदलायला सांगण्याऐवजी प्रोटीन आणि फायबर अशा स्वरूपात आणतो जे त्यांना आधीच माहीत आहेत आणि आवडतात. ओट्सचे पौष्टिक गुणधर्म आणि सर्वांच्या आवडत्या भारतीय पदार्थांना परवडणाऱ्या किमतीत एकत्र आणून क्वेकर® प्रोटीन लाडू आणि चिक्की बाईट्स पेप्सिको इंडियाच्या पोषण सर्वांसाठी सुलभ करण्याच्या महत्त्वाकांक्षेला प्रत्यक्षात उतरवतात. त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी चांगले पर्याय दैनंदिन जीवनात स्वीकारणे अधिक सोपे होते.
या अनावरणाबाबत बोलताना पेप्सिको इंडियाच्या फूड्स विभागाच्या मुख्य मार्केटिंग अधिकारी साक्षी वर्मा मेनन म्हणाल्या, “पेप्सिको इंडियामध्ये आम्ही ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्नॅकिंगसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या फूड्स पोर्टफोलिओमध्ये बदल करत आहोत. आरोग्यासाठी उत्तम नावीन्य हा या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आमचा ग्राहकांबाबतचा अभ्यास, तसेच प्रथिने आणि फायबरच्या सेवनाच्या ट्रेंडवरील आमच्या संशोधनातून मिळालेली हमी, हे घटक अधिक सहज उपलब्ध करून देण्याची आणि दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करणे सोपे करण्याची संधी दर्शवतात. क्वेकर® प्रोटीन लाडूज आणि चिक्की बाईट्सच्या माध्यमातून आम्ही ओट्सचे पोषक फायदे आणि भारतीय स्नॅकिंगचे लोकप्रिय प्रकार एकत्र आणत आहोत. त्यामुळे स्नॅकिंगआणि पोषण अधिक समर्पक ठरत आहे. ओळखीची चव, सोय आणि परवडणारी किंमत यांना एकत्र आणून प्रथिने आणि फायबर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याची आमची महत्त्वाकांक्षा याद्वारे पूर्ण होत आहे. आम्ही आमचा पोर्टफोलिओ अधिक मजबूत करत असताना ग्राहकांच्या बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारी आणि अधिकाधिक भारतीयांना चांगले पर्याय उपलब्ध करून देणारी उत्पादने तयार करण्यावर आमचे लक्ष केंद्रित केले आहे.”
पेप्सिको इंडियाचे क्वेकर® विभागाचे मार्केटिंग संचालक श्रीराम अय्यर म्हणाले, “भारतात क्वेकर® हे नाव बऱ्याच काळापासून ओट्सच्या पोषणाशी जोडले गेले आहे आणि या नवीन उत्पादनाद्वारे ते आपली विश्वसनीय पौष्टिक ओळख स्नॅकिंग श्रेणीमध्ये आणत आहे. लाडू आणि चिक्की हे असे प्रकार आहेत जे भारतीयांना आधीपासूनच आवडतात आणि समजतात. त्यामुळे ओट्स, प्रथिने आणि फायबर यांना एका परिचित आणि आनंददायक पद्धतीने एकत्र आणण्यासाठी हे आमच्यासाठी एक नैसर्गिक माध्यम ठरते. आमची नवीन मोहीम एका दैनंदिन द्विधा मनस्थितीतून हा विचार जिवंत करते – पौष्टिकतेची निवड करताना चवीशी तडजोड का करावी? प्रोटीन लाडू आणि चिक्की बाईट्सच्या माध्यमातून, क्वेकर®द्वारे ग्राहकांच्या जीवनात एक महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी आणि भारतात या ब्रँडसाठी एक नवीन अध्याय सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
जाहिरातीबाबत
या अनावरणासाठी क्वेकर® ने एक नवीन मजेशीर जाहिरात आणली आहे. ती चव विरुद्ध पोषण या द्विधा स्थितीला एक आधुनिक वळण देते. कॉलेज कॅम्पसमध्ये चित्रित झालेल्या या व्हिडिओची सुरुवात दोन मित्र वर्गांच्या मधल्या वेळेत ब्रेक घेताना होते. एक मुलगी तिच्या फोनवर उत्सुकतेने डावीकडे स्वाइप करत असते. सुरुवातीला डेटिंगसाठी नाकारलेल्या मॅचेसची एक रांग असल्यासारखे वाटते पण लवकरच हे पूर्णपणे वेगळेच काहीतरी असल्याचे उघड होते – ती स्नॅकचे पर्याय स्क्रोल करत असते आणि असे पर्याय नाकारत असते, ज्यात तिला चव आणि पोषण यांपैकी एकाची निवड करावी लागते. तिचा मित्र एक सोपा उपाय घेऊन पुढे येतो. तो आपल्या बॅगमधून क्वेकर® प्रोटीन लाडू आणि चिक्की बाईट्स बाहेर काढतो आणि तिला असा पर्याय देतो, ज्यात दोन्ही गोष्टी एकत्र येतात. डावीकडे स्वाइप करण्याच्या सवयीला विनोदी वळण देत हा व्हिडिओ एक साधा विचार मांडतो: भूक लागते, तेव्हा ग्राहकांना चव आणि पोषण यांपैकी एकाची निवड करावी लागू नये.
अभ्यासाबद्दल: ‘द स्टेट ऑफ प्रोटीन अँड फायबर इन अर्बन इंडिया’ हा अभ्यास भारतातील प्रमुख शहरांमधील प्रतिसादकर्त्यांमध्ये प्रथिने आणि फायबरबद्दलची जागरूकता, समज आणि वापराचे परीक्षण करतो. दिल्ली, मुंबई, बंगळूर, कोलकाता आणि कोची येथील १,२५० ग्राहकांचे सर्वेक्षण केले असता असे दिसून आले आहे की, ग्राहक पोषणाबद्दल अधिकाधिक जागरूक होत असले तरी, हेतू आणि प्रत्यक्ष सेवन यात तफावत कायम आहे. तसेच ओळखीचे पदार्थ, परवडणारी किंमत व सोय हे घटक रोजच्या खाद्यपदार्थांच्या निवडीवर प्रभाव टाकत आहेत.
क्वेकर® प्रोटीन लाडूज रोझ ड्राय फ्रूट फ्लेवरमध्ये, तर क्वेकर® प्रोटीन चिक्की बाईट्स रागी चॉको फ्लेवरमध्ये उपलब्ध आहेत. ही उत्पादने संपूर्ण भारतात जनरल ट्रेडद्वारे प्रति पॅक १० रुपये दराने उपलब्ध होतील.
क्वेकरबद्दल: क्वेकर ओट्स २००६ मध्ये भारतात आले. क्वेकर हा ब्रँड १४५ वर्षांहून अधिक जुना असून ओटमील क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रणी आहे. क्वेकर ओट्स हे १००% संपूर्ण धान्य आणि प्रथिने व डायटरी फायबरचा नैसर्गिक स्रोत आहे. यात बीटा ग्लुकन नावाचे एक उत्तम विद्राव्य फायबर आहे. ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे (कोलेस्ट्रॉल हा हृदयविकारांसाठी एक धोकादायक घटक आहे). भारतात क्वेकर ओट्स हे क्वेकर प्लेन ओट्स आणि क्वेकर ओट्स मल्टीग्रेन यांसारख्या प्रकारांमध्येही उपलब्ध आहे.


