Friday, October 23, 2026
Google search engine
HomeUncategorized*क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्याचे...

*क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. २३ : ११ एप्रिल २०२६ पासून ११ एप्रिल २०२७ या कालावधीत राज्यात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील विविध कार्यालये तसेच महिला विकास व बाल विकास निवासी संस्थांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.

 

राज्य शासनाच्या निर्देशानुसार महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आणि विचारांवर आधारित प्रशिक्षण, कार्यशाळा, शिबिरे, तसेच विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये चित्रफिती दाखविणे, नाटिका, पथनाट्य, निबंध स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आदी उपक्रमांचा समावेश आहे.

 

महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा आणि विचारांचा प्रसार व्हावा, तसेच त्यांच्या योगदानाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमात सर्व कार्यालयांनी सक्रिय सहभाग घ्यावा, व त्याबाबतचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, पुणे यांना सादर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments