Friday, October 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोकमान्य हॉस्पिटल्समध्ये ७९ वर्षीय रुग्णावर हृदयातील रक्तवाहिन्यांमधील गुंतागुंतीच्या अडथळ्यांवर यशस्वी उपचार

लोकमान्य हॉस्पिटल्समध्ये ७९ वर्षीय रुग्णावर हृदयातील रक्तवाहिन्यांमधील गुंतागुंतीच्या अडथळ्यांवर यशस्वी उपचार

 

 

ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी (ओसिटी),ऑर्बिटल अथेरेक्टॉमी आणि ड्रग-एल्यूटिंग बलूनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अतिरिक्त स्टेंट न बसवता रक्तवाहिन्यांमधील चार अडथळे काढण्यासाठी करण्यात आली कोरोनरी अँजिओप्लास्टी

 

पुणे, २३ ऑक्टोबर २०२६ : लोकमान्य हॉस्पिटल्स, पुणे येथील हृदयरोग तज्ज्ञांनी ७९ वर्षीय पुरुष रुग्णाच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमधील चार गंभीर अडथळ्यांवर ऑर्बिटल अथेरेक्टॉमी आणि ड्रग-एल्यूटिंग बलून (डीईबी ) अँजिओप्लास्टी यांच्या साहाय्याने यशस्वी उपचार केले. या उपचारादरम्यान प्रगत इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आणि कोणताही अतिरिक्त स्टेंट बसविण्यात आला नाही.

 

उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या माहितीनुसार, पुण्यात अशा प्रकारची ही पहिली तर महाराष्ट्रातील दुसरी प्रक्रिया आहे. हृदयातील रक्तवाहिन्यांच्या आजारावर, विशेषतः मोठ्या प्रमाणात कॅल्शियम साचलेल्या आणि पूर्वी स्टेंट बसविलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये पुन्हा अरुंदता निर्माण झालेल्या रुग्णांमध्ये, उपचारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ड्रग-कोटेड बलूनचा पात्र रुग्णांमध्ये वाढत वापर यातून अधोरेखित होते. काही निवडक रुग्णांमध्ये अतिरिक्त कायमस्वरूपी स्टेंट टाळता येणे हा उपचाराचा महत्त्वाचा फायदा ठरू शकतो.

 

या प्रक्रिया लोकमान्य हॉस्पिटल्स, पुणे येथील कार्डिओलॉजी विभागाच्या संचालक व प्रमुख आणि चीफ ऑपरेटिंग कार्डिओलॉजिस्ट डॉ. अन्नपूर्णा कालिया यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या.

 

चार गंभीर अडथळ्यांची आव्हानात्मक स्थिती

 

रुग्णाला पूर्वीपासून हृदयातील धमन्यांच्या (इस्केमिक हार्ट डिसीज) आजार होता. यापूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती. तसेच त्यांना उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होते. छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ईसीजी, रक्ताच्या विविध तपासण्या आणि कार्डियाक ट्रोपोनिन चाचणी करण्यात आली. तपासण्यांच्या आधारे त्यांना अन्स्टेबल अँजायना ( धमन्यांमध्ये रक्ताची गाठ ) असल्याचे निदान झाले आणि पुढील तपासणीची गरज भासली.

 

द्विमितीय इकोकार्डियोग्राफी मध्ये हृदयाच्या डाव्या बाजूची रक्त पुरवठा करण्याची क्षमता दर्शविणारा लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन सुमारे ४५ टक्के असल्याचे दिसून आले. त्यानंतर करण्यात आलेल्या कोरोनरी अँजिओग्राफीमध्ये डाव्या बाजूत धमनीमध्ये (लेफ्ट सर्कमफ्लेक्स कोरोनरी आर्टरी) ९० टक्के अडथळा असल्याचे आढळले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅल्शियम साचले होते.

 

याशिवाय,उजव्या धमनीमध्ये मध्ये पूर्वी बसविण्यात आलेल्या स्टेंटच्या आतील भागात आणखी तीन गंभीर अडथळे आढळले निर्माण झाले होते. या रक्तवाहिनीतही मोठ्या प्रमाणात कॅल्शियम जमा झाले होते.

 

चार गंभीर अडथळे, मोठ्या प्रमाणातील कॅल्शियम, पूर्वीची अँजिओप्लास्टी आणि अनेक हृदयविकाराचे जोखमीचे घटक यामुळे ही स्थिती अत्यंत आव्हानात्मक होती.

 

डॉ. अन्नपूर्णा कालिया म्हणाल्या, “रुग्णाचे वय, मोठ्या प्रमाणातील कॅल्शियम तसेच अडथळ्यांची गुंतागुंत आणि त्यांचे स्थान लक्षात घेता ही आव्हानात्मक स्थिती होती. अनेक गंभीर अडथळे असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनरी बायपास शस्त्रक्रियेचा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो. मात्र, रुग्णाला बायपास शस्त्रक्रिया करून घ्यायची इच्छा नव्हती आणि त्यांनी अँजिओप्लास्टीला प्राधान्य दिले. त्यामुळे उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करून ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी या इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंग तंत्रज्ञानाद्वारे कॅल्शियमचा प्रकार अचूकपणे समजून घेता येईल, त्यानंतर मोठ्या प्रमाणातील साचलेले कॅल्शियम काढून अडथळ्यांवर उपचार करता येतील आणि अतिरिक्त कायमस्वरूपी स्टेंट बसविणे टाळता येईल अशी उपचारपद्धती आम्ही निवडली.”

 

कॅल्शियम साठ्यावर अत्याधुनिक ऑर्बिटल अथेरेक्टॉमी

 

रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम साचल्यास अँजिओप्लास्टी करणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरते. कडक झालेल्या कॅल्शियमच्या थरामुळे फुगा फुगवल्यानंतरही रक्तवाहिनी पुरेशी विस्तारू शकत नाही. त्यामुळे स्टेंट योग्य प्रकारे पोहोचवणे आणि त्याचा पुरेसा विस्तार करणेही कठीण होऊ शकते.

 

लेफ्ट सर्कमफ्लेक्स आर्टरीच्या सुरुवातीच्या भागातील मोठ्या प्रमाणातील कॅल्शियमयुक्त अडथळ्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी प्रथम ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी (ओसिटी) या इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यानंतर ऑर्बिटल अथेरेक्टॉमी करण्यात आली. यामध्ये डायमंड-कोटेड उपकरणाचा वापर करून कडक झालेला कॅल्शियमयुक्त थर कमी केला जातो. त्यामुळे पुढील उपचारासाठी रक्तवाहिनी तयार होण्यास आणि ती योग्य प्रकारे विस्तारण्यास मदत होते.

 

कॅल्शियमचा अडथळा काढण्यासाठी रोटेशनल अथेरेक्टॉमी आणि इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी यांसारख्या इतर पद्धतींचाही पात्र रुग्णांमध्ये वापर केला जाऊ शकतो. कोणती पद्धत वापरायची हे अडथळ्याचे स्थान, कॅल्शियमचे प्रमाण आणि त्याची रचना यावर अवलंबून असते.

या रुग्णाच्या बाबतीत डाव्या बाजूच्या धमनीच्या सुरुवातीच्या भागाजवळ अडथळा निर्माण झाल्यामुळे डॉक्टरांनी ऑर्बिटल अथेरेक्टॉमीची निवड केली.

 

ड्रग-एल्यूटिंग बलून द्वारे अतिरिक्त स्टेंटशिवाय उपचार

 

कॅल्शियमचा अडथळा काढल्यानंतर डॉक्टरांनी ड्रग-एल्यूटिंग बलून (डीईबी), ज्याला ड्रग-कोटेड बलून (डिसीबी) असेही म्हटले जाते, हे तंत्र वापरले. या बलूनवर पेशींची अनावश्यक वाढ रोखणारे औषध लावलेले असते. हे औषध ड्रग-एल्यूटिंग स्टेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधासारखेच असते.

 

बलून लक्ष्यस्थानी नियंत्रित कालावधीसाठी फुगविल्यानंतर त्यावरील औषध रक्तवाहिनीच्या आतील भिंतीवर पोहोचते आणि त्यानंतर बलून काढून घेतला जातो.

 

पारंपरिक स्टेंट-आधारित अँजिओप्लास्टीच्या तुलनेत या पद्धतीमध्ये रक्तवाहिनीत अतिरिक्त कायमस्वरूपी धातूचा स्टेंट मागे राहत नाही.

 

या रुग्णामध्ये डाव्या बाजूतील अडथळ्यावर तसेच उजव्या धमनी मध्ये पूर्वी बसविलेल्या स्टेंटच्या आतील भागातील तिन्ही अडथळ्यांवर ड्रग-एल्यूटिंग बलूनचा वापर करण्यात आला.

 

उपचार पद्धती मागील कारण स्पष्ट करताना डॉ. कालिया म्हणाल्या, “डाव्या बाजूतील धमनीच्या सुरुवातीच्या भागाजवळ असलेले अडथळ्याचे स्थान हा महत्त्वाचा घटक होता. डाव्या बाजूतील भागात आणखी एक मोठा स्टेंट बसवल्यास तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि भविष्यात त्याच स्टेंटमध्ये पुन्हा अरुंदता निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. तसेच हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा राखण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या शेजारील रक्तवाहिनीवरही परिणाम होण्याची शक्यता असते. ओसिटी या इमेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने परिस्थितीचे अचूक मूल्यांकन करून, ऑर्बिटल अथेरेक्टॉमीद्वारे कॅल्शियम कमी केले आणि ड्रग-एल्यूटिंग बलूनच्या माध्यमातून औषध थेट उपचार केलेल्या रक्तवाहिनीच्या भिंतीपर्यंत पोहोचविले. त्यामुळे आणखी एक कायमस्वरूपी स्टेंट बसविण्याची गरज टाळता आली.”

 

या उपचार पद्धतीचा उद्देश रक्तप्रवाह पूर्ववत करणे आणि या जटिल शारीरिक रचनेमध्ये अतिरिक्त स्टेंट बसवल्यामुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य गुंतागुंती टाळणे हा होता.

 

पात्र रुग्णांमध्ये उपचाराचे संभाव्य फायदे

 

ड्रग-एल्यूटिंग बलून अँजिओप्लास्टी ही इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी मधील प्रस्थापित उपचारपद्धती असून, विशेषतः पूर्वी बसविलेल्या स्टेंटमध्ये पुन्हा अरुंदता निर्माण झाल्यास, तिचा वापर केला जातो. काही निवडक नवीन अडथळ्यांमध्ये, विशेषतः लहान रक्तवाहिन्या आणि काही जटिल अडथळ्यांमध्येही या पद्धतीचा वापर वाढत आहे. या क्षेत्रातील वैद्यकीय पुरावे सातत्याने विकसित होत आहेत.

 

योग्य रुग्णांची निवड करून या पद्धतीचा वापर केल्यास काही संभाव्य फायदे मिळू शकतात:

 

अतिरिक्त कायमस्वरूपी स्टेंट टाळता येणे: ज्या शारीरिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या ठिकाणी आणखी एक स्टेंट बसविणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकते, अशा परिस्थितीत हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.

 

औषध थेट रक्तवाहिनी पर्यंत पोहोचवणे: अडथळ्याच्या ठिकाणी रक्तवाहिनीच्या भिंतीवर थेट औषध पोहोचविले जाते, ज्यामुळे पुन्हा अरुंदता निर्माण होण्याचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

 

रक्तवाहिनीची नैसर्गिक रचना जपणे: अतिरिक्त धातूचा स्टेंट न बसवल्यामुळे शेजारील रक्तवाहिन्यांकडे भविष्यातील उपचारांसाठी काही निवडक रुग्णांमध्ये फायदेशीर ठरू शकते.

 

अँटीप्लेटलेट औषधोपचारात संभाव्य लवचिकता: रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी करण्यासाठी दोन औषधांचा वापर करणाऱ्या ड्युअल अँटीप्लेटलेट थेरपीची गरज आणि कालावधी ही उपचारपद्धती, रुग्णाची वैद्यकीय स्थिती आणि उपचार करणाऱ्या हृदयरोग तज्ज्ञांच्या निर्णयावर अवलंबून असते. काही निवडक ड्रग-कोटेड बलून उपचारांमध्ये याचा चा कालावधी तुलनेने कमी ठेवणे आणि त्यानंतर वैद्यकीय गरजेनुसार एकच अँटीप्लेटलेट औषध सुरू ठेवणे शक्य असू शकते.

 

डॉ. कालिया पुढे म्हणाल्या, “ड्रग-एल्यूटिंग बलून हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्टच्या उपचार पर्यायांमध्ये महत्त्वाची भर आहे. वाढते वैद्यकीय पुरावे आणि योग्य रुग्णांची काळजीपूर्वक निवड यामुळे जटिल कोरोनरी अडथळ्यांच्या उपचारांमध्ये या तंत्रज्ञानाची भूमिका भविष्यात आणखी वाढू शकते. रुग्णाची रक्तवाहिनीची रचना, वैद्यकीय स्थिती आणि दीर्घकालीन गरजा लक्षात घेऊन उपचारपद्धती निवडत प्रभावीपणे रक्तपुरवठा पूर्ववत करणे हा या उपचाराचा मुख्य उद्देश आहे.”

 

रुग्णाची प्रकृती सुधारली; ४८ तासांत डिस्चार्ज

 

सुमारे दोन तास चाललेल्या या तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती समाधानकारक राहिली. उपचारानंतर ४८ तासांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

 

प्रगत इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंग, अडथळे काढण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ड्रग-एल्यूटिंग बलून अँजिओप्लास्टी यांचा योग्य संयोजनाने वापर केल्यास, हृदयातील रक्तवाहिन्यांचा गंभीर आजार असलेल्या काही निवडक रुग्णांसाठी पर्यायी उपचारपद्धती उपलब्ध होऊ शकते हे यातून दिसून येते की,विशेषतः मोठ्या प्रमाणात कॅल्शियम साचलेल्या रक्तवाहिन्या आणि पूर्वी बसविलेल्या स्टेंटमध्ये पुन्हा अरुंदता निर्माण झालेल्या रुग्णांमध्ये हा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो.

 

प्रत्येक रुग्णासाठी उपचाराचा निर्णय स्वतंत्रपणे घेणे आवश्यक असले तरी, उच्च जोखमीच्या रुग्णांच्या उपचाराचे नियोजन करताना पारंपरिक अँजिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रियेसोबतच आधुनिक इंटरव्हेन्शनल तंत्रज्ञानाचाही विचार करणे महत्त्वाचे असल्याचे यातून अधोरेखित होते.

 

रुग्णाच्या उपचाराचा कालक्रम

 

रुग्णालयात दाखल: २४ सप्टेंबर २०२६

उपचाराची तारीख: २५ सप्टेंबर २०२६

डिस्चार्ज: २७ सप्टेंबर २०२६

 

उपचार करणाऱ्या तज्ज्ञ:

डॉ. अन्नपूर्णा कालिया, संचालक व प्रमुख, कार्डि

ओलॉजी विभाग; चीफ ऑपरेटिंग कार्डिओलॉजिस्ट, लोकमान्य हॉस्पिटल्स, पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments