Friday, October 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedविनोबा भावे मातृशक्ती*  *स्मृती संदेश यात्रा'*  *प्रेरणादायी ठरेल*  ...

विनोबा भावे मातृशक्ती*  *स्मृती संदेश यात्रा’*  *प्रेरणादायी ठरेल*  *-रमेशभैय्या*

 

 

पुणे : ‘जय जगत’ या मानवतावादी विचारातून समाजात प्रेम, बंधूता आणि सेवाभाव रुजविण्याचा संदेश देणारी विनोबा मातृशक्ती स्मृती संदेश यात्रा निश्चितच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशातील विनोबा सेवा आश्रमाचे प्रमुख रमेयभैय्या यांनी केले.

 

आचार्य विनोबा भावे यांच्या मातोश्री पूजनीय रूख्मिणीदेवी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त निघालेल्या मातृशक्ती स्मृती संदेश यात्रेचे स्वागत पुण्यात करण्यात आले. यावेळी आगाखान पॅलेस येथे उपस्थितांशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी सर्वश्री रमेशभैय्या, माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी ॲड.सतिश म्हस्के, आदींनी विचार मांडले.

 

आचार्य विनोबा भावे यांच्या मातोश्री रुख्मिणीदेवी यांनी विनोबाजींच्या व्यक्तीमत्त्वाला आकार दिला. विनोबाजींचे अलौकिक कार्य मातृसंस्कारातूनच घडले, असे रमेशभैय्या यांनी सांगितले. महात्मा गांधीजींनी विनोबाजींना ‘विनोबा’ हे नाव देताना महाराष्ट्राच्या संत परंपरेतील विठोबा, तुकोबा, ज्ञानोबा आणि विनोबा असा सुंदर संदर्भ जोडला होता, असे रमेशभैय्या यांनी सांगितले.

 

विनोबाजींच्या मातोश्रीं या त्यागमयी जीवन जगल्या. त्यांनी त्यांची तीनही मुलांवर आचार्य विनोबा भावे, बाळकृष्ण (बाळकोबा) भावे आणि शिवाजीराव भावे यांच्यावर सेवाभावी जीवन जगण्याचा संस्कार केला. मातृसंस्काराप्रमाणे हे तिघेहीजण देशासाठी आणि समाजासाठी समर्पित जीवन जगले. पूजनीय रुख्मिणीदेवी यांनी मातृसंस्काराचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला, असे विचार माजी आमदार मोहन जोशी यांनी या प्रसंगी बोलताना मांडले.

 

मातृशक्तीची थोरवी गाणाऱ्या यात्रेतून तरूणांनी बोध घ्यावा, असे आवाहन ॲड.सतिश म्हस्के यांनी केले.

 

मातृशक्ती स्मृती संदेश यात्रा कर्नाटकातील जमखंडी ते धुळे अशी काढण्यात आली आहे. यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत पुण्यात करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, गांधीवादी विचारांचे आणि विनोबाजींवर श्रद्धा असणारे अनुयायी उपस्थित होते. यामध्ये माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, सुनील मलके, चेतन अगरवाल, अनिल आहीर, कन्हैया मिनेकर, विकास सुपनवार, सुरेश राठोड, मामा खांदवे, सागर खांदवे, ताराताई शर्मा, कैलास गलांडे, डॉ.पराग सोनावणे, अमित कांबळे, बाळासाहेब पराड, विनय माळी, विनोद तोरणे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments