पुण्यात नवीन स्टोअर सुरू केले आणि नांदेडमधील स्टोअरचे नूतनीकरण करून अद्ययावत केले.
– अॅमवे इंडियाच्या प्रत्यक्ष स्टोअरच्या विस्ताराचा टप्पा म्हणून ग्लोबल प्रेसिडेंट आणि सीईओ मायकेल नेल्सन यांच्या हस्ते गुरुग्राममध्ये नवीन स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले.
– कंपनीची पुढील ३-४ वर्षांत विविध ठिकाणी आणखी अनेक स्टोअर्स सुरू करण्याची योजना.
नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर: भारतातील बाजारपेठेतील उपस्थिती आणि बहु-वार्षिक वाढीच्या धोरणाला गती देत, आरोग्य आणि कल्याणाला पाठबळ देणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅमवे इंडियाने आज देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आपल्या प्रत्यक्ष उपस्थितीचा विस्तार करण्याची घोषणा केली. या विस्ताराच्या पुढील टप्प्याचा प्रारंभ करत, अॅमवेचे प्रेसिडेंट आणि सीईओ मायकेल नेल्सन यांनी आज शहराच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान गुरुग्राममधील अॅमवेच्या नवीन स्टोअरचे उद्घाटन केले. हा विस्तार कंपनीच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा विस्तार करण्यासह विविध उपक्रमांसाठी मायकेल यांनी गेल्या वर्षी जाहीर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर आधारित आहे. याचाच एक भाग म्हणून, अॅमवे इंडियाने महाराष्ट्रातील पुणे येथे नवीन स्टोअर सुरू केले असून नांदेडमधील स्टोअरचे अद्ययावतीकरण केले आहे. यामुळे कंपनीची उत्पादने आणि ब्रँडचे अनुभव ग्राहकांच्या अधिक जवळ पोहोचतील, तसेच वितरकांना ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी आणि स्थानिक समुदाय उभारण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ उपलब्ध होईल.
याप्रसंगी मत व्यक्त करत अॅमवेचे प्रेसिडेंट आणि सीईओ मायकेल नेल्सन म्हणाले,“भारत अॅमवेच्या जागतिक वाढीच्या प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे आणि भारतातील ग्राहकांमध्ये वेगाने होत असलेला बदल या संधीला विशेषतः अधिक उत्साहवर्धक बनवतो. आजचे ग्राहक विश्वासार्ह, विज्ञान-आधारित आरोग्य आणि वेलबीइंग सोल्युशन्स, अधिक वैयक्तिकृत अनुभव आणि ब्रँड्सशी जोडले जाण्यासाठी अधिक सोयीस्कर पर्यायांचा अधिकाधिक शोध घेत आहेत. आमच्या वितरकांना ग्राहकांच्या या बदलत्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करता याव्यात यासाठी आधुनिक आणि अनुभवात्मक जागा निर्माण करणे हा आमचा दृष्टिकोन राहिला आहे. ही केंद्रे उत्पादनांची ओळख, अर्थपूर्ण संवाद आणि समुदाय यांना एकत्र आणतात, ज्यामुळे वितरकांना ग्राहकांशी अधिक दृढ संबंध प्रस्थापित करता येतात आणि अधिक मूल्य प्रदान करता येते. गुरुग्राममधील या एक्सपिरियन्स सेंटरचे उद्घाटन अॅमवेच्या भारतातील वाढीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे, तसेच यामधून बाजारपेठेबाबत कंपनीचा दीर्घकालीन विश्वास आणि वितरकांना त्यांचे व्यवसाय उभारण्यासाठी व वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॅटफॉर्म्स, साधने आणि अनुभव उपलब्ध करून देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आरोग्य आणि वेलबीइंग सोल्युशन्सची मागणी सातत्याने वाढत असताना अॅमवे उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी आणि अधिकाधिक व्यक्तींना उत्तम जीवन जगण्यास मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
अॅमवे इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर रजनीश चोप्रा म्हणाले, “प्रत्यक्ष उपस्थिती भारतातील ग्राहक आणि वितरक अनुभव अधिक समृद्ध करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग आहे. ही पारंपरिक स्टोअर्स नसून एंगेजमेंट हब्स आहेत, जी ग्राहकांना अॅमवेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा मार्ग उपलब्ध करून देतात, तर आमच्या वितरकांना त्यांच्या ग्राहकांशी जोडले जाण्यासाठी आणि समुदाय उभारण्यासाठी अधिक सक्षम प्लॅटफॉर्म प्रदान करतात. गेल्या वर्षभरात, आम्ही नवीन स्टोअर्स आणि अस्तित्वात असलेल्या स्टोअर्सचे या एंगेजमेंट हब्समध्ये रूपांतर करून विविध ठिकाणी आमची प्रत्यक्ष उपस्थिती अधिक दृढ केली आहे. तसेच पुढील काही वर्षांत देशभरात आमचा विस्तार आणखी वाढवण्याची आमची योजना आहे. हे आमच्या भारताप्रतीच्या दीर्घकालीन बांधिलकीचा आणि विकसित भारताच्या दृष्टीकोनाला आमच्या योगदानाचा महत्त्वाचा भाग आहे, ज्यातून अधिक निरोगी समुदायांना पाठबळ मिळते, आर्थिक सक्षमीकरण शक्य होते आणि जागतिक दर्जाच्या उत्पादनांपर्यंत अधिक सुलभ पोहोच उपलब्ध होते.”
देशभरातील ८५ हून अधिक स्टोअर्सच्या आपल्या सध्याच्या उपस्थितीवर आधारित अॅमवे इंडियाने अलीकडच्या महिन्यांत आपल्या रिटेल ट्रान्सफॉर्मेशन प्रवासाला अधिक गती दिली आहे. कंपनीने पुणे, कोलकाता, सिलिगुडी, इम्फाळ, भागलपूर, आनंद, अहमदाबाद, बोंगाईगाव, आग्रा आणि नांदेडसह प्रमुख बाजारपेठांमध्ये १४ हून अधिक स्टोअर्स नव्याने सुरू केली आहेत किंवा त्यांचे नूतनीकरण केले आहे, जी मेट्रो, द्वितीय व तृतीय श्रेणीच्या बाजारपेठांमधील संतुलित विस्तारावर भर देतात. भविष्याचा विचार करता, कंपनीने पुढील ३-४ वर्षांत आणखी अनेक स्टोअर्स सुरू करण्याचा किंवा त्यांचे नूतनीकरण करण्याचा स्पष्ट रोडमॅप तयार केला आहे.
अॅमवे इंडिया देशातील आपल्या कामकाजाच्या तीन दशकांकडे वाटचाल करत असताना कंपनीचे निरंतर प्रयत्न आणि उपक्रम थेट विक्री परिसंस्थेला अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेवर आधारित आहेत. कंपनी लागू कायदे आणि नियामक आवश्यकतांनुसार कार्य करते, तसेच आपल्या कामकाजात प्रशासन, अनुपालन आणि व्यावसायिक पद्धती सातत्याने मजबूत करत आहे. कंपनीची प्रत्यक्ष एंगेजमेंट सेंटर्स या कटिबद्धतेचा महत्त्वाचा भाग आहेत आणि उत्पादनांची ओळख, ग्राहक शिक्षण आणि ग्राहक व वितरकांमधील संवादासाठी पारदर्शक वातावरण उपलब्ध करून देतात. भारतातील जवळपास ३० वर्षांच्या अनुभवासह अॅमवे ग्राहकांचा वाढता विश्वास, जबाबदार उद्योजकता, नाविन्यता आणि दीर्घकालीन मूल्य निर्मितीच्या माध्यमातून पुढील ३० वर्षे आणि त्यापुढील काळाची पायाभरणी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.


