Tuesday, October 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवीन ओप्पो फाइंड एक्स 10 सिरीजसह प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या क्षेत्रात ओप्पो इंडियाने...

नवीन ओप्पो फाइंड एक्स 10 सिरीजसह प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या क्षेत्रात ओप्पो इंडियाने आणखी उंची गाठली

 

– हॅसलब्लॅडच्या सहकार्याने विकसित केलेल्या उद्योगातील पहिल्याच ट्रिपल 200 मेगापिक्सेल कॅमेरा सिस्टीममुळे फोटोग्राफीचा नवा अनुभव मिळणार. यासोबतच, नव्या कलरओएस 17 आणि या श्रेणीतील सर्वात मोठ्या 8000 एमएएच बॅटरीमुळे ओप्पो फाइंड एक्स 10 सिरीज ठरणार खास.

 

– भारतात पहिल्यांदाच 2 नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित मीडियाटेक डायमेन्सिटी 9600 प्रो प्रोसेसर ओप्पो फाइंड एक्स 10 प्रो मॅक्समध्ये देण्यात आला आहे. यामुळे फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या कार्यक्षमतेला नवी उंची मिळणार.

 

– डाइनऑडिओच्या सहकार्याने तयार केलेले ओप्पो एन्को एक्स4 आणि आपल्या श्रेणीत नवा अनुभव देणारा ओप्पो पॅड मिनी यांच्या सादरीकरणामुळे ओप्पोची प्रीमियम उपकरणांची मालिका आणखी मजबूत झाली आहे. या उपकरणांमुळे भारतातील ग्राहकांना फोटो काढणे, नवनवीन गोष्टी तयार करणे आणि त्या सहजपणे इतरांसोबत शेअर करणे शक्य होणार आहे.

 

– ओप्पो फाइंड एक्स 10 सिरीजची भारतातील सुरुवातीची किंमत 1,39,999 रुपये असेल.

 

 

 

पुणे 27 ऑक्टोबर 2026 : ओप्पो इंडियाने नवीन ओप्पो फाइंड एक्स 10 सिरीज सादर केली आहे. या सिरीजमध्ये ओप्पो फाइंड एक्स 10 आणि ओप्पो फाइंड एक्स 10 प्रो मॅक्स या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. ओप्पोच्या नाविन्यपूर्ण आणि प्रीमियम फाइंड एक्स सिरीजची ही दहावी पिढी आहे.प्रीमियम स्मार्टफोनचा अनुभव आणखी चांगला करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या सिरीजमध्ये प्रत्यक्ष दृश्यांप्रमाणे स्पष्ट फोटो काढण्याचे प्रगत तंत्रज्ञान, दमदार कामगिरी, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि आकर्षक डिझाइन यांचा समावेश आहे. यासोबतच, नवीन कलरओएस 17 देण्यात आले आहे, ज्यामुळे फोन वापरण्याचा अनुभव अधिक सहज आणि सुरळीत होणार आहे.ओप्पोने आपल्या प्रीमियम उपकरणांच्या मालिकेचा विस्तार करत ओप्पो एन्को एक्स४ आणि ओप्पो पॅड मिनी ही दोन नवीन उत्पादनेही सादर केली आहेत. यामुळे ग्राहकांना फोटो काढणे, नवनवीन गोष्टी तयार करणे आणि त्या इतरांसोबत शेअर करणे हे सर्व सहजपणे करता येणार आहे. या सर्व प्रीमियम उपकरणांमुळे दैनंदिन कामांचा अनुभव अधिक चांगला होणार आहे. प्रत्येक फोटो, त्यातील बदल आणि तो इतरांसोबत शेअर करताना त्या क्षणातील खरे सौंदर्य आणि भावना जपता येणार आहेत.

ओप्पो फाइंड एक्स10 सिरीजमध्ये असे कॅमेरा तंत्रज्ञान देण्यात आले आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणाऱ्या दृश्यांप्रमाणेच फोटो काढता येतात. ओप्पो फाइंड एक्स 10 मध्ये ड्युअल 200 मेगापिक्सेल कॅमेरा सिस्टीम आहे, तर ओप्पो फाइंड एक्स 10 प्रो मॅक्समध्ये क्रांतिकारी ट्रिपल 200 मेगापिक्सेल कॅमेरा सिस्टीम देण्यात आली आहे. यामुळे फोनच्या मागील बाजूला असलेल्या तिन्ही कॅमेऱ्यांमध्ये 200 मेगापिक्सेलचे रिझोल्यूशन मिळते. हॅसलब्लॅडच्या सहकार्याने विकसित केलेल्या या कॅमेरा सिस्टीमसोबत नवीन लुमो ट्रू इमेज इंजिन आणि दुसऱ्या पिढीतील ट्रू कलर कॅमेरा देण्यात आला आहे. यामुळे फोटोमधील रंग, छटा आणि बारीक तपशील नैसर्गिक दिसतात. याशिवाय, लुमो कलर पॅलेटच्या मदतीने वापरकर्त्यांना या नैसर्गिक रंगांच्या आधारावर स्वतःच्या आवडीनुसार फोटोची शैली तयार करता येते.व्हिडिओ शूटिंगसाठीही यात चित्रपटांच्या दर्जाचा अनुभव देणारी प्रगत वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये 4के सिने-ग्रेड एचडीआर व्हिडिओ, डॉल्बी व्हिजन आणि ओपन गेट कॅप्चर यांचा समावेश आहे.

नवीन कलरओएस 17 मध्ये एआय माइंड पायलटसह एजंट मोड देण्यात आला आहे. या सुविधेमुळे फोनमधील फोटो आणि फाइल्सचा वापर करून अनेक टप्प्यांमध्ये पूर्ण होणारी कामे सहज करता येतात. या सिरीजमध्ये 8000 एमएएचपर्यंतची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, ओप्पो फाइंड एक्स 10 प्रो मॅक्समध्ये 2 एनएम मीडियाटेक डायमेन्सिटी 9600 प्रो प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच, फोनला नवे बॉर्डरलेस डिझाइन देण्यात आले आहे.

ओप्पो फाइंड एक्स 10 सिरीजसोबत ओप्पो पॅड मिनी आणि ओप्पो एन्को एक्स 4 ही दोन नवीन उत्पादनेही सादर करण्यात आली आहेत. ओप्पो पॅड मिनी हा कंपनीचा पहिला 8.8 इंचाचा छोट्या आकारातील टॅबलेट आहे. सहज सोबत नेता येणाऱ्या या टॅबलेटमध्ये प्रगत स्मार्टफोनप्रमाणे दमदार कामगिरी आणि एआयच्या मदतीने कामे अधिक सोपी करणारी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ओप्पो एन्को एक्स 4 मध्ये डाइनऑडिओच्या सहकार्याने विकसित केलेली प्रीमियम ऑडिओ सिस्टीम देण्यात आली आहे. यामुळे उत्कृष्ट आवाजाचा अनुभव मिळतो. या दोन्ही उत्पादनांमुळे ओप्पोचा प्रीमियम अनुभव केवळ स्मार्टफोनपुरता मर्यादित न राहता इतर उपकरणांपर्यंतही पोहोचणार आहे. या उपकरणांमुळे दैनंदिन कामे अधिक सहजपणे करता येतील, तसेच मनोरंजन, नवनिर्मिती आणि इतर उपकरणांशी जोडून काम करण्याचा अनुभवही अधिक चांगला होईल.

या सादरीकरणाबद्दल बोलताना ओप्पो इंडियाच्या कम्युनिकेशन्स विभागाच्या प्रमुख गोल्डी पटनायक म्हणाल्या, “ओप्पो फाइंड एक्स सिरीजने गेल्या दहा पिढ्यांपासून स्मार्टफोनमधील नवनवीन तंत्रज्ञानाच्या मर्यादा विस्तारण्याचे काम केले आहे. ओप्पो फाइंड एक्स 10 सिरीजच्या माध्यमातून आम्ही कंटेंट तयार करणाऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रमुख अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. डोळ्यांनी दिसणारे दृश्य आणि फोटोमध्ये दिसणारे दृश्य यांतील फरक, प्रकाशानुसार बदलणारे फोटोचे परिणाम आणि काम सोपे करण्याऐवजी त्यात आणखी टप्पे वाढवणारे एआय तंत्रज्ञान, या समस्यांवर आम्ही उपाय शोधले आहेत. ओप्पो पॅड मिनीच्या माध्यमातून आम्ही एक नवीन प्रकारचे उपकरण सादर केले आहे. त्याचा आकार लहान असून, कंटेंट तयार करणाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ते तयार करण्यात आले आहे. ओप्पो एन्को एक्स 4 मुळे ही उपकरणांची मालिका अधिक परिपूर्ण झाली आहे. या सर्व उपकरणांच्या मदतीने वापरकर्त्यांना फोटो काढणे, कंटेंट तयार करणे आणि तो इतरांसोबत शेअर करणे या सर्व गोष्टी एकाच सहज प्रक्रियेत करता येतील.”

मोबाइल फोटोग्राफीसाठी नवा मापदंड

हॅसलब्लॅडच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या ओप्पो फाइंड एक्स 10 सिरीजमध्ये उच्च रिझोल्यूशनचे कॅमेरे आणि ओप्पोचे नवीनतम संगणकीय फोटोग्राफी तंत्रज्ञान एकत्र आणण्यात आले आहे. लुमो ट्रू इमेज इंजिन अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे की, फोटोमधील नैसर्गिक रंग, रंगांच्या विविध छटा आणि बारीक तपशील जपले जातील. त्यामुळे फोटोवर कृत्रिम प्रक्रिया केल्यासारखे न दिसता, प्रत्यक्ष दृश्य जसे आहे तसेच त्यात दिसण्यास मदत होते.

ट्रू कलर कॅमेरा आजूबाजूच्या वातावरणातील रंगांची अतिरिक्त माहिती टिपतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकाशातही फोटोमधील रंग अधिक नैसर्गिक आणि अचूक दिसतात. या कॅमेरा सिस्टीममध्ये रंगांच्या विविध छटा दाखवण्यासाठी हॅसलब्लॅडच्या तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. यामुळे फोटोतील उजळ आणि गडद भागांमधील योग्य संतुलन राखले जाते. परिणामी, व्यक्तींचे पोर्ट्रेट आणि इतर दृश्यांचे फोटो अधिक नैसर्गिक दिसतात.

ओप्पो फाइंड एक्स 10 प्रो मॅक्समध्ये 200 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 1/1.56 इंचाचा सेन्सर असून, 124 अंशांच्या कोनातून फोटो काढता येतात. या फोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा अल्ट्रा एचडीआर मुख्य कॅमेराही आहे. यामध्ये ओप्पो आणि सॅमसंगने संयुक्तपणे विकसित केलेला 1/1.28 इंचाचा आयसोसेल एचपीसी सेन्सर वापरण्यात आला आहे. एचडीआरमधील फोटोची गुणवत्ता सुधारण्यासाठी यात डीपपिक्स तंत्रज्ञान देण्यात आले आहे. 200 मेगापिक्सेलच्या टेलिफोटो कॅमेऱ्यात एफ/2.1 अपर्चर असून, तो केवळ 10 सेंटीमीटर अंतरावरील वस्तूवरही फोकस करू शकतो. त्यामुळे दूरच्या वस्तूंचे फोटो काढण्यासोबतच जवळच्या वस्तूंचे बारकावे टिपणारे फोटोही घेता येतात.

ओप्पो फाइंड एक्स 10 सिरीजमध्ये अल्ट्रा-वाइडपासून 9.9 पट झूमपर्यंतच्या उपलब्ध फोकल लेंथवर डीफॉल्ट 26 मेगापिक्सेलमध्ये फोटो काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे फोटोमधील बारकावे स्पष्ट राहतात आणि फोटोच्या फाइलचा आकारही नियंत्रणात ठेवता येतो. वापरकर्त्यांना गरजेनुसार हॅसलब्लॅड हाय-रेस मोड निवडून, या सुविधेला समर्थन देणाऱ्या कॅमेऱ्यांमधून 50 किंवा 200 मेगापिक्सेलमध्ये फोटो काढता येतात. ओप्पो हॅसलब्लॅड टेलिकन्व्हर्टर या दोन्ही मॉडेल्ससोबत वापरता येतो. याच्या मदतीने टेलिफोटो कॅमेऱ्याची ऑप्टिकल झूम क्षमता 3.28 पट वाढते. त्यामुळे अधिक दूर अंतरावरील वस्तूंचे फोटो अधिक जवळून आणि स्पष्टपणे काढता येतात.

व्हिडिओ तयार करणाऱ्यांसाठी अधिक सुविधा आणि नियंत्रण

या सिरीजमधील सर्व स्मार्टफोनमध्ये व्हिडिओ शूटिंगच्या सुविधांमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे. ओप्पो फाइंड एक्स 10 मध्ये मागील बाजूच्या सर्व कॅमेऱ्यांमधून 4 के गुणवत्तेत 60 फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने व्हिडिओ रेकॉर्ड करता येतात. याशिवाय, त्याच्या 200 मेगापिक्सेल मुख्य कॅमेऱ्यातून आणि टेलिफोटो कॅमेऱ्यातून 4 के गुणवत्तेत 120 फ्रेम्स प्रति सेकंद तसेच 8 के गुणवत्तेत 30 फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची सुविधाही आहे. ओप्पो फाइंड एक्स 10 प्रो मॅक्समधील मागील बाजूचे तिन्ही 200 मेगापिक्सेल कॅमेरे 4 के गुणवत्तेत 60 आणि 120 फ्रेम्स प्रति सेकंद तसेच 8 के गुणवत्तेत 30 फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.

ओप्पो फाइंड एक्स 10 प्रो मॅक्सच्या 200 मेगापिक्सेल मुख्य कॅमेऱ्यातील डीपपिक्स तंत्रज्ञानामुळे 17 स्टॉपपर्यंतची डायनॅमिक रेंज मिळते. यामुळे कठीण प्रकाशातही फोटोतील अतिशय उजळ आणि गडद भागांमधील अधिक तपशील जपता येतात.उदाहरणार्थ, मागून प्रकाश येत असताना व्यक्तीचे पोर्ट्रेट काढणे, रात्रीच्या वेळी शहरातील उजळलेल्या पाट्यांचे फोटो घेणे किंवा काळ्या आकाशात फुलबाजीचे दृश्य टिपणे, अशा प्रसंगी फोटोतील सर्वाधिक उजळ आणि गडद भागांमधील तपशील अधिक स्पष्टपणे टिपता येतात. त्यामुळे फोटोमधील दृश्य अधिक नैसर्गिक आणि तपशीलवार दिसते.

या सिरीजमध्ये डॉल्बी व्हिजन, एसीईएस प्रमाणित ओ-लॉग 2 आणि ओपन गेट कॅप्चर या सुविधाही देण्यात आल्या आहेत. यामुळे कंटेंट तयार करणाऱ्यांना व्हिडिओ रेकॉर्ड करताना आणि त्याचे एडिटिंग करताना अधिक स्वातंत्र्य आणि सोय मिळते.

दैनंदिन वापरासाठी विचारपूर्वक तयार केलेले आकर्षक डिझाइन

ओप्पो फाइंड एक्स 10 सिरीजमध्ये फाइंड एक्स कुटुंबाची साधी, आकर्षक आणि देखणी डिझाइनची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. यामध्ये नवीन बॉर्डरलेस डिझाइन देण्यात आले आहे. फोनच्या एकाच काचेच्या तुकड्यापासून तयार केलेली सुंदर रचना कॅमेरा मॉड्यूलपर्यंत सलगपणे जोडलेली आहे. त्यामुळे फोनचा संपूर्ण लुक अधिक एकसंध आणि आकर्षक दिसतो. तसेच, कॅमेरा बाहेर आलेला असल्यामुळे दिसणारा उंचवटाही कमी जाणवतो.

ओप्पो फाइंड एक्स 10 ग्लेशियर ब्लू, ग्लो कोरल आणि मिस्ट ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध असेल. तर ओप्पो फाइंड एक्स 10 प्रो मॅक्स टायटॅनियम ग्रे आणि लुना व्हाइट या रंगांमध्ये सादर करण्यात येईल.लुना व्हाइट रंगाच्या डिझाइनसाठी जुन्या काळातील कॅमेऱ्यांपासून प्रेरणा घेण्यात आली आहे. यामध्ये चंदेरी रंगाचे लुमो कॅमेरा आयलंड, हॅसलब्लॅडची खास मॅट ऑरेंज रंगाची रिंग आणि दोन वेगवेगळ्या रंगांच्या छटांचे आकर्षक मिश्रण देण्यात आले आहे.

दोन्ही स्मार्टफोनमध्ये स्क्रीनच्या चारही बाजूंना बारीक आणि समान आकाराच्या कडा देण्यात आल्या आहेत. प्रीमियम लुकसोबतच दैनंदिन वापरातही सोयीस्कर ठरेल, अशा पद्धतीने या फोनची रचना करण्यात आली आहे. ओप्पो फाइंड एक्स 10 मध्ये 6.59 इंचांची स्क्रीन आहे, तर ओप्पो फाइंड एक्स 10 प्रो मॅक्समध्ये 6.78 इंचांची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. दोन्ही फोनमध्ये 144 हर्ट्झपर्यंतचा अॅनडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट, 3600 निट्सपर्यंतची कमाल ब्राइटनेस आणि डॉल्बी व्हिजनची सुविधा आहे.कमी प्रकाशात स्क्रीन पाहताना डोळ्यांना त्रास होऊ नये, यासाठी तिची ब्राइटनेस 1 निटपर्यंत कमी करता येते. तसेच, 3840 हर्ट्झपर्यंतचे हाय-फ्रिक्वेन्सी पीडब्ल्यूएम डिमिंग तंत्रज्ञानही देण्यात आले आहे. त्यामुळे कमी प्रकाशात स्क्रीन वापरताना अधिक आरामदायी अनुभव मिळतो.

ओप्पो फाइंड एक्स 10 आणि ओप्पो फाइंड एक्स 10 प्रो मॅक्स हे बीटी.2020 कलर गॅमटला सपोर्ट करणाऱ्या सुरुवातीच्या स्मार्टफोनपैकी आहेत. डीसीआय-पी 3 च्या तुलनेत बीटी.2020 मध्ये सुमारे 40 टक्के अधिक रंग दाखवण्याची क्षमता आहे. या तंत्रज्ञानाचा वापर व्यावसायिक चित्रपट निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.

या सिरीजमधील स्मार्टफोन ठरावीक चाचणी परिस्थितींमध्ये आयपी 66, आयपी 68 आणि आयपी 69 दर्जाच्या पाणी व धूळ प्रतिरोधक क्षमतेसह येतात. तसेच, या फोनला एसजीएस फाइव्ह-स्टार ड्रॉप रेझिस्टन्स प्रमाणपत्रही मिळाले आहे, जे फोनच्या पडल्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करण्याच्या क्षमतेची पुष्टी करते.

व्यस्त दिवसांसाठी दमदार बॅटरी आणि उत्कृष्ट कामगिरी

दोन्ही मॉडेल्समध्ये 8000 एमएएचपर्यंतची ओप्पो सिलिकॉन-कार्बन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी दीर्घकाळ टिकणारा बॅकअप देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रीमियम स्मार्टफोनचा उत्कृष्ट अनुभव कायम ठेवून दिवसभर फोनचा वापर करता येतो. या सिरीजमध्ये 80 वॅट सुपरव्हूक वायर्ड चार्जिंग आणि 50 वॅट एअरव्हूक वायरलेस चार्जिंगची सुविधा आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार फोन चार्ज करण्याचे वेगवेगळे पर्याय मिळतात आणि दैनंदिन कामांदरम्यानही फोन लवकर चार्ज करता येतो.

ओप्पो फाइंड एक्स 10 मध्ये 3 नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित मीडियाटेक डायमेन्सिटी 9600 एम प्रोसेसर देण्यात आला आहे. तर ओप्पो फाइंड एक्स 10 प्रो मॅक्समध्ये फ्लॅगशिप श्रेणीतील 2 नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित मीडियाटेक डायमेन्सिटी 9600 प्रो प्रोसेसर आहे.दोन्ही स्मार्टफोनमध्ये उष्णता नियंत्रित ठेवण्यासाठी प्रगत व्हेपर चेंबर कूलिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. त्यामुळे फोटो काढणे, गेमिंग, एआय सुविधांचा वापर आणि एकाच वेळी अनेक कामे करताना फोनची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत होते.

कलरओएस 17 मुळे अधिक वेगवान आणि स्मार्टफोन वापरण्याचा अधिक सोपा अनुभव

ओप्पो फाइंड एक्स 10 सिरीजमध्ये प्रथमच कलरओएस 17 देण्यात आले आहे. यामध्ये नवीन इंटरफेस आणि संपूर्ण सिस्टीममध्ये वापरता येणाऱ्या एआय सुविधांचा समावेश आहे. यामुळे फोनचा दैनंदिन वापर अधिक सोपा आणि सहज होतो. यातील लिव्हिंग फ्लो डिझाइनमुळे स्क्रीनवरील दृश्ये अधिक आकर्षक दिसतात, स्क्रीनवरील बदल सहजपणे होतात आणि स्पर्श केल्यावर फोन अधिक वेगाने प्रतिसाद देतो. तसेच, ल्युमिनस रेंडरिंग इंजिन आणि लॅमिनार फ्लो इंजिन यांमुळे फोनचा प्रतिसाद अधिक वेगवान होतो आणि सिस्टीममधील उपलब्ध संसाधनांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करता येतो.

कलरओएस 17 मध्ये एआय माइंड पायलटसह एजंट मोड ही नवीन सुविधाही देण्यात आली आहे. या सुविधेच्या मदतीने फोनमध्ये साठवलेले फोटो आणि फाइल्स वापरता येतात, त्यातील माहिती शोधता येते आणि अनेक टप्प्यांमध्ये पूर्ण होणारी कामे सहज करता येतात. एआय फोटो एजंटमुळे फोटो एडिट करणे अधिक सोपे होते. यामध्ये फोटोमध्ये कोणते बदल करावेत, यासाठी सूचना दिल्या जातात. साध्या भाषेत सूचना देऊनही फोटोमध्ये बदल करता येतात. तसेच, स्टाइल मॅच या सुविधेमुळे एखाद्या संदर्भ फोटोची शैली आणि लुक वापरकर्त्याच्या स्वतःच्या फोटोला देता येतो. ओप्पोने मॅनससोबत केलेल्या सहकार्यामुळे एआय माइंड पायलटमधील एजंट मोडमध्ये मॅनसच्या एआय क्षमतांचा आणि कलरओएस 17 च्या सिस्टीममध्ये समाविष्ट असलेल्या सुविधांचा एकत्रित वापर करता येतो.

फोनमधील सॉफ्टवेअर वापरताना गोपनीयता आणि सुरक्षिततेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. एआय कॉल गार्ड या सुविधेत फोनमध्येच कार्यरत असलेल्या एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉलदरम्यान संभाव्य फसवणुकीची लक्षणे ओळखली जातात. तर, ओप्पोच्या प्रायव्हेट कम्प्युटिंग क्लाउडमध्ये क्लाउडवर आधारित एआय प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणि भविष्यातील क्वांटम संगणकांपासूनही माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी विकसित केलेल्या सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

ओप्पो पॅड मिनी : छोटा आकार, मोठ्या कल्पना आणि फ्लॅगशिप अनुभव

आपल्या एकमेकांशी जोडलेल्या उपकरणांच्या मालिकेचा विस्तार करत ओप्पोने ओप्पो पॅड मिनी सादर केला आहे. हा कंपनीचा पहिला 8.8 इंचांचा कॉम्पॅक्ट टॅबलेट आहे. लहान आकारात दमदार कामगिरी आणि एआयच्या मदतीने कामे अधिक सोपी करणाऱ्या सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा टॅबलेट सहजपणे सोबत नेता येतो. केवळ 282 ग्रॅम वजन आणि 5.46 मिमी जाडी असलेल्या या टॅबलेटमध्ये 2.5 के ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनचा 92.5 टक्के भाग डिस्प्लेने व्यापलेला आहे. तसेच, 144 हर्ट्झपर्यंतचा रिफ्रेश रेट आणि 1600 निट्सपर्यंतची कमाल ब्राइटनेस यामुळे स्क्रीनवरील चित्रे अधिक रंगीत, स्पष्ट आणि सहज दिसतात. यातील नॅनो-टेक्स्चर मॅट डिस्प्लेमुळे उन्हात किंवा बाहेरच्या तेजस्वी प्रकाशातही स्क्रीनवर प्रकाशाचे प्रतिबिंब कमी पडते. तसेच, स्क्रीनची ब्राइटनेस किमान 2 निट्सपर्यंत कमी करता येते. टीयूव्ही र्हाइनलँडचे डोळ्यांच्या आरामासाठीचे प्रमाणपत्रही या डिस्प्लेला मिळाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकाशात स्क्रीन पाहताना अधिक आरामदायी अनुभव मिळतो. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 5 प्रोसेसरमुळे या टॅबलेटवर एकाच वेळी अनेक कामे करणे, गेम खेळणे आणि कंटेंट तयार करणे सहज शक्य होते. यात 8000 एमएएचची बॅटरी आणि 67 वॅट सुपरव्हूक फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. केवळ 10 मिनिटे चार्ज केल्यानंतर या टॅबलेटवर चार तासांपर्यंत व्हिडिओ पाहता येतो. ओप्पो पॅड मिनीमध्ये आयओएस, अँड्रॉइड आणि विंडोज उपकरणांशी सहज जोडणी करण्याची सुविधाही आहे. ओ प्लस कनेक्टच्या मदतीने वेगवेगळ्या उपकरणांमध्ये फाइल्स पाठवणे, संवादाशी संबंधित माहिती शेअर करणे, स्क्रीन एकत्र वापरणे आणि अनेक उपकरणांवर समन्वयाने काम करणे सोपे होते.

ओप्पो पॅड मिनीसोबत स्मार्ट ओप्पो पेन्सिल 3 प्रो ही सादर करण्यात आली आहे. या पेन्सिलच्या मदतीने कागदावर लिहिल्याप्रमाणे नैसर्गिक पद्धतीने लिहिता आणि चित्रे काढता येतात. यात प्रतिसाद मिळण्यास होणारा विलंब अतिशय कमी असल्यामुळे लिहिताना आणि चित्रे काढताना अधिक सहज अनुभव मिळतो. एआय स्मार्ट सर्कल, स्क्रीन बंद असतानाही झटपट नोट्स लिहिण्याची सुविधा आणि साध्या रेखाटनाचे सुंदर कलाकृतीत रूपांतर करणारे डूडल टू आर्ट यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे मनात आलेल्या कल्पना लगेच नोंदवता येतात आणि सर्जनशीलतेला नवे रूप देता येते.

ओप्पो एन्को एक्स4 : डाइनऑडिओच्या सहकार्याने तयार केलेला प्रीमियम आवाजाचा अनुभव

प्रीमियम ऑडिओ उत्पादनांच्या मालिकेचा विस्तार करत ओप्पोने ओप्पो एन्को एक्स 4 सादर केले आहे. डाइनऑडिओच्या उत्कृष्ट ध्वनी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले हे इअरबड्स वापरकर्त्यांना अधिक वैयक्तिक आणि दर्जेदार संगीत ऐकण्याचा अनुभव देतात. डाइनऑडिओच्या सहकार्याने विकसित केलेल्या चौथ्या पिढीतील कोअॅक्सियल ड्युअल-ड्रायव्हर सिस्टीमचा यात समावेश आहे. यामध्ये ११ मिमीचा डायनॅमिक वूफर आणि 6 मिमीचा प्लॅनर ट्वीटर देण्यात आला आहे. स्वतंत्र ड्युअल-डीएसी रचनेच्या मदतीने हे इअरबड्स खोल आणि नियंत्रित बास, आवाजातील नैसर्गिकपणा आणि अधिक स्पष्ट ध्वनी देतात. एलएचडीसी लॉसलेस ऑडिओ ट्रान्समिशन, डाइनऑडिओच्या ध्वनी तज्ज्ञांनी तयार केलेले पाच मास्टर ट्यूनिंग पर्याय आणि सभोवतालचा अनुभव देणारे स्पेशियल ऑडिओ यांमुळे ओप्पो एन्को एक्स 4 मध्ये उच्च दर्जाच्या आवाजाचा समृद्ध अनुभव मिळतो. वापरकर्ते आपल्या आवडीनुसार आवाजाची निवडही करू शकतात. वळ आवाजाची गुणवत्ता सुधारण्यापुरतेच हे इअरबड्स मर्यादित नाहीत. यामध्ये प्रगत अॅ्डॅप्टिव्ह अॅेक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन तंत्रज्ञान देण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान आजूबाजूचे वातावरण ओळखून आवाज कमी करण्याची पातळी आपोआप बदलते. याशिवाय, अधिक आरामदायी वापरासाठी इअरटिप्सची रचना नव्याने करण्यात आली आहे. त्यामुळे कानांवर कमी दाब येतो आणि बाहेरील आवाज कमी होण्यासही मदत होते.

ओप्पो एन्को एक्स 4 मध्ये अनेक स्मार्ट सुविधा देण्यात आल्या आहेत. एआयच्या मदतीने 24 भाषांमध्ये रिअल-टाइम भाषांतर करता येते. तसेच, हातांचा वापर न करता गुगल जेमिनीचा वापर करता येतो. एआय क्लिअर कॉल या सुविधेमुळे फोनवरील संभाषण अधिक स्पष्ट होते. तर, कॉन्व्हर्सेशन अवेअरनेस हे वैशिष्ट्य वापरकर्ता बोलू लागल्याचे ओळखून संगीताचा आवाज आपोआप कमी करते. या इअरबड्समध्ये मानेच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे आणि झोपेची नोंद ठेवणे यांसारख्या आरोग्यविषयक सुविधाही आहेत. डॉल्बी तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करणाऱ्या क्लिअर ऑडिओ रेकॉर्डिंग सुविधेमुळे इअरबड्सचा वापर बाह्य मायक्रोफोन म्हणूनही करता येतो. अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज उपकरणांशी एकाच वेळी जोडणी करण्याची सुविधा, इअरबड्स सहजपणे नियंत्रित करता येतील अशी रचना आणि एकूण 53 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ यामुळे त्यांचा दैनंदिन वापर अधिक सोयीस्कर होतो. तसेच, इअरबड्सना आयपी 55 दर्जाचे धूळ आणि पाणी प्रतिरोधक संरक्षण देण्यात आले आहे.ओप्पो एन्को एक्स 4 ऑरोरा व्हायोलेट आणि ग्लेशियर व्हाइट या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. या उत्पादनामुळे आपल्या एकमेकांशी जोडलेल्या उपकरणांच्या मालिकेत स्मार्ट तंत्रज्ञान आणि प्रीमियम अनुभव देण्याच्या ओप्पोच्या उद्दिष्टाला आणखी बळ मिळाले आहे.

ओप्पो पॉवर बँक : सोबत नेणे सोपे, चार्जिंगसाठी नेहमी तयार

आपल्या उत्पादनांच्या मालिकेचा विस्तार करत ओप्पोने अंगभूत केबल असलेली ओप्पो 22.5 वॅट, 10000 एमएएच पॉवर बँकही सादर केली आहे. प्रवासात किंवा घराबाहेर असताना फोन आणि इतर उपकरणे सहज चार्ज करता यावीत, या उद्देशाने ती तयार करण्यात आली आहे. केवळ 15.9 मिमी जाडी आणि 185 ग्रॅम वजनाची ही पॉवर बँक हलकी आणि सहज सोबत नेता येण्याजोगी आहे. यात 22.5 वॅट फास्ट चार्जिंगची सुविधा असून, एकाच वेळी तीन उपकरणे चार्ज करता येतात. ही पॉवर बँक यूएल 94 व्ही-0 या अग्निरोधक मानकानुसार तयार केलेल्या साहित्यापासून बनवण्यात आली आहे. तसेच, ओप्पोने तिची पडण्याची चाचणीही घेतली आहे. त्यामुळे हलके वजन, वापरण्यास सोपी रचना आणि टिकाऊपणा यांचा मेळ साधणारी ही पॉवर बँक दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरते.

किंमत आणि उपलब्धता

ओप्पो फाइंड एक्स 10 सिरीजची भारतातील किंमत ओप्पो फाइंड एक्स 10 (12 जीबी + 256 जीबी) मॉडेलसाठी 1,39,999 रुपयांपासून सुरू होईल, तर 12 जीबी + 512 जीबी मॉडेलची किंमत 1,69,999 रुपये असेल. फ्लॅगशिप ओप्पो फाइंड एक्स 10 प्रो मॅक्स (12 जीबी + 512 जीबी) ची किंमत 1,99,999 रुपये असेल. याशिवाय, ओप्पो हॅसलब्लॅड टेलिकन्व्हर्टर किट 24,999 रुपयांमध्ये सादर करण्यात येणार आहे.

आपल्या प्रीमियम उत्पादनांच्या मालिकेचा विस्तार करत ओप्पोने ओप्पो पॅड मिनी (8 जीबी + 256 जीबी) 94,999 रुपये, ओप्पो एन्को एक्स 4, 19999 रुपये आणि 10000 एमएएच ओप्पो पॉवर बँक 2199 रुपये किमतीत सादर केली आहे.

ऑफर्स आणि फायदे

• सुलभ ईएमआयचा पर्याय: ग्राहक ओप्पो फाइंड एक्स 10 सिरीजचा स्मार्टफोन दरमहा केवळ 4667 रुपयांपासून सुरू होणाऱ्या सुलभ ईएमआयवर खरेदी करू शकतात.

• कॅशबॅक आणि एक्सचेंजचा लाभ: ग्राहकांना 38000 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि जुना फोन बदलून खरेदी करण्याचा लाभ मिळू शकतो.

• मोफत प्रीमियम गिफ्ट बॉक्स: ग्राहकांना 8998 रुपये किमतीचा प्रीमियम गिफ्ट बॉक्स मिळू शकतो. यामध्ये ओप्पो एन्को एअर 5 प्रो आणि अतिरिक्त भेट म्हणून पॉवर बँक किंवा फोन कव्हरचा समावेश असेल. हा लाभ उपलब्ध साठा आणि संबंधित विक्रीच्या अटींनुसार मिळेल.

• ओप्पो एन्को एक्स 4 खरेदीवर विशेष ऑफर: बंडल ऑफरअंतर्गत ग्राहकांना ओप्पो एन्को एक्स४ खरेदीवर 1000 रुपयांची सूट मिळू शकते. ही ऑफर 13 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरपर्यंत लागू असेल.

• शून्य डाउन पेमेंट: पात्र ग्राहकांना 30 महिन्यांपर्यंत शून्य डाउन पेमेंटचा लाभ घेता येईल.

• बँक कार्डवर कॅशबॅक: लागू अटी व शर्तींनुसार, बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास 15 टक्क्यांपर्यंत त्वरित कॅशबॅक मिळू शकतो.

• अतिरिक्त एक्सचेंज बोनस: पात्रता आणि लागू अटी व शर्तींनुसार, ग्राह

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments