बेंगळुरू, 28 ऑक्टोबर 2026: टीव्हीएस विनू चा (TVS VENU) भाग असलेली आणि भारतातील आघाडीच्या एनबीएफसी (NBFC) पैकी एक असलेल्या टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडने (TVS Credit Services Limited) 30 सप्टेंबर 2026 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही कालावधीसाठीचे आर्थिक निकाल आज जाहीर केले.
आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीत (Q2 FY27), कंपनीने आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीच्या (Q2 FY26) तुलनेत कर्ज वितरणात 31% वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीत 2,029 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न टीव्हीएस क्रेडिटने मिळवले आहे, मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ 14% आहे. तसेच, याच तिमाहीत कंपनीचा करपश्चात नफा (Profit after Tax) 243 कोटी रुपये इतका झाला असून, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत तो 19% अधिक आहे.
आर्थिक वर्ष 2027च्या दुसऱ्या तिमाहीतील (Q2 FY27) ठळक बाबी:
• 30 सप्टेंबर 2026 रोजी व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) 33,818 कोटी रुपये इतकी होती, जी 30 सप्टेंबर 2025 च्या तुलनेत 22% वाढ दर्शवते.
• आर्थिक वर्ष 2027च्या दुसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्न 2,029 कोटी रुपये होते, जे आर्थिक वर्ष 2026च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 14% वाढ दर्शवते.
• आर्थिक वर्ष 2027च्या दुसऱ्या तिमाहीत करपश्चात नफा (Profit After Tax) 243 कोटी रुपये होता, जो आर्थिक वर्ष 2026च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 19% वाढ दर्शवते.
आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या सहामाहीतील (H1 FY27) ठळक बाबी:
• 30 सप्टेंबर 2026 रोजी व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) 33,818 कोटी रुपये होती, जी 30 सप्टेंबर 2025 च्या तुलनेत 22% वाढ दर्शवते.
• आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या सहामाहीत एकूण उत्पन्न 3,948 कोटी रुपये होते, जे आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत 14% वाढ दर्शवते.
• आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या सहामाहीत करपश्चात नफा (Profit After Tax) 452 कोटी रुपये होता, जो आर्थिक वर्ष 2026च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत 17% वाढ दर्शवते.
आर्थिक वर्ष 2027च्या दुसऱ्या तिमाहीत (Q2 FY27), टीव्हीएस क्रेडिटने (TVS Credit) आपल्या कर्ज वितरणात वाढ नोंदवली आहे. मुख्य किरकोळ वित्तपुरवठा (retail financing) क्षेत्रांमध्ये सातत्याने दिसून आलेल्या मागणीमुळे ही वाढ शक्य झाली. दुचाकी विभागात निमशहरी आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये चांगली मागणी दिसून आली, तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकारही वाढत असल्याचे दिसून आले. टिकाऊ वस्तू (consumer durables) आणि तीनचाकी वाहनांच्या श्रेणींनाही जोरदार मागणी होती; ज्याला वित्तपुरवठ्याची वाढती व्याप्ती आणि सण-उत्सवांच्या काळात झालेली खरेदी यांचा आधार मिळाला.
या तिमाहीत, टीव्हीएस क्रेडिटने एआय (AI), डेटा आणि ॲनालिटिक्स, तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील आपल्या क्षमता अधिक बळकट केल्या, ज्यामुळे जोखीम मूल्यांकन, ग्राहक अनुभव आणि कार्यात्मक कार्यक्षमता सुधारण्यास मदत झाली. कंपनीने निमशहरी आणि ग्रामीण भारतात आपला विस्तार सुरू ठेवत, आपल्या नेटवर्कचा विस्तार देशभरातील 65,100 हून अधिक टचपॉइंट्सपर्यंत केला आहे.


