Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorized*दिवाळीत खासगी बसकडून निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून...

*दिवाळीत खासगी बसकडून निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष तपासणी मोहीम*

 

 

पुणे, दि. ३० : दिवाळीच्या कालावधीत खासगी प्रवासी बसमालकांनी शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारू नये. निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी करणाऱ्या बसमालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा, १९८८ व संबंधित नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला आहे.

 

दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने काही खासगी बसमालकांकडून मनमानी पद्धतीने अधिक भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी येतात. या पार्श्वभूमीवर शासनाच्या २७ एप्रिल २०१८ रोजीच्या निर्णयानुसार खासगी बसमालकांना निर्धारित केलेल्या भाड्याच्या मर्यादेतच प्रवासी भाडे आकारणे बंधनकारक आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मोहीम राबवून कडक कारवाई करण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी तिकीट दराच्या दीडपटीपेक्षा जादा भाडेदर आकारण्यात येऊ नये. वाहन सुस्थितीत असल्याची तसेच वाहनाची सर्व कागदपत्रे विधीग्राह्य असल्याची खात्री करावी.

 

प्रवाशांनी अधिक भाडे आकारणी किंवा इतर नियमभंग आढळल्यास व्हॉट्सॲप क्रमांक ८२७५३३०२०९ यावर संबंधित तक्रार नोंदवावी. आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक आणि तिकिटाचा छायाचित्रासह वरील व्हॉट्सॲप क्रमांकावर अथवा rto.12-mh@gov.in या ईमेल वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments