Sunday, November 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिरो मोटोकॉर्पने ‘हिरो संग त्योहार है हर कहीं' मोहिमेसह सणाच्या उत्साहामध्ये अधिक...

हिरो मोटोकॉर्पने ‘हिरो संग त्योहार है हर कहीं’ मोहिमेसह सणाच्या उत्साहामध्ये अधिक आनंदाची भर केली चार दिवसीय विशेष ‘हिरोत्सव’ सेलिब्रेशनचे अनावरण

 

 

१२ नवीन आणि अद्ययावत मॉडेल्सना ग्राहकांचा मिळालेला विक्रमी प्रतिसाद डीलरशिप्समध्ये सणासुदीच्या उत्साहाला गती देत आहे.

सोन्याची नाणी आणि हिरो दुचाकी जिंकण्याच्या संधीसह आकर्षक बक्षिसे.

१ ते ४ नोव्हेंबरदरम्यान मर्यादित कालावधीसाठी विशेष लाभ: १०० टक्‍क्‍यांपर्यंत फायनान्स, स्कूटर्सवर ० टक्‍के व्याज, २,२२२ रुपयांपासून सुरू होणारे ईएमआय, १०,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक, ६,००० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट लाभ आणि बरेच काही.

नवी दिल्ली, ऑक्टोबर ३१, २०२६: सणाचा उत्साह अधिक वाढवत हिरो मोटोकॉर्प या जगातील सर्वात मोठ्या मोटरसायकल आणि स्कूटर उत्पादक कंपनीने ‘हिरोत्सव’ची घोषणा केली आहे. हा चार दिवसीय विशेष उत्सव संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी सणासुदीच्या ऑफर्स आणि आकर्षक बक्षिसे घेऊन आला आहे. १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चालणारा हा उपक्रम कंपनीच्या देशव्यापी सणासुदीच्या ‘हिरो संग त्योहार है हर कहीं’ मोहिमेवर आधारित आहे आणि आपला सण संस्मरणीय बनवू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी अधिक आनंद घेऊन आला आहे.

 

हिरो मोटोकॉर्पच्या मोटरसायकल आणि स्कूटर पोर्टफोलिओमधील १२ नव्याने सादर केलेल्या आणि अद्ययावत मॉडेल्सना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर हा उत्सव सुरू होत आहे. ग्राहकांची वाढती मागणी आणि डीलरशिप्समधील विक्रमी गर्दीमुळे सणासुदीचा उत्साह अधिक वाढला आहे. हिरोत्सवच्या माध्यमातून नवीन सुरुवातीचा हा काळ अधिक आनंददायी बनवणे आणि ग्राहकांना त्यांची आवडती हिरो दुचाकी घरी नेण्याचे आणखी एक कारण देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

 

चार दिवसीय हिरोत्सव सेलिब्रेशनमध्ये पुढील आकर्षक ऑफर्सचा समावेश आहे:

 

दररोज बक्षिसे: इतर खात्रीशीर बक्षिसांसोबत हिरो दुचाकी आणि सोन्याची नाणी जिंकण्याची संधी.

विशेष रिटेल फायनान्स ऑफर्स: ग्राहकांना त्यांची आवडती दुचाकी घरी नेणे अधिक सोपे व्हावे यासाठी १०० टक्‍क्‍यांपर्यंत फायनान्स, २,२२२ रुपयांपासून सुरू होणारे ईएमआय आणि नो-कॉस्ट ईएमआय.

क्रेडिट कार्ड कॅशबॅक: निवडक क्रेडिट कार्ड्सवर १०,००० रुपयांपर्यंत त्वरित कॅशबॅक.

कॉर्पोरेट लाभ: निवडक मॉडेल्सवर ६,००० रुपयांपर्यंत बचत.

या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत हिरो मोटोकॉर्पच्या इंडिया बिझनेस युनिटचे चीफ बिझनेस ऑफिसर आशुतोष वर्मा म्हणाले, “आम्ही या सणासुदीच्या काळात आमच्या ग्राहकांनी हिरो मोटोकॉर्पवर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाने आणि उत्साहाने भारावून गेलो आहोत. आमच्या १२ नवीन आणि अद्ययावत मॉडेल्सना मिळालेला प्रतिसाद उत्तम राहिला असून आमच्या पोर्टफोलिओची ताकद आणि देशभरातील ग्राहकांशी असलेले आमचे दृढ नाते दर्शवतो. हिरो दुचाकी घरी आणू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स आणि आकर्षक लाभांच्या माध्यमातून हा सणाचा उत्साह अधिक आनंददायी बनवण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे हिरोत्सव आहे. सणाचे उत्साही वातावरण आणि आमच्या डीलरशिप्समधील वाढती मागणी पाहता आम्ही ग्राहकांना या चार दिवसीय विशेष उत्सवाचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन करतो.”

 

ग्राहक आपल्या जवळच्या अधिकृत हिरो मोटोकॉर्प डीलरशिपला भेट देऊन किंवा कंपनीच्या डिजिटल रिटेल प्लॅटफॉर्मवरून बुकिंग करून हिरोत्सवच्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. हे विशेष लाभ १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर २०२६ या मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments