देशभरातून प्राप्त झालेल्या ९८० अर्जांमधून १६ नवउद्योजक संस्थांची निवड; भविष्यातील वाहन आणि वाहतूक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सहकार्याच्या संधी
गुरुग्राम, ३० ऑक्टोबर २०२६ : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने भारतातील उदयोन्मुख नवोन्मेषकांना प्रोत्साहन देऊन वाहन उद्योगाचे भविष्य घडविण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या पहिल्या ‘ह्युंदाई इनोव्हेशन चॅलेंज २०२६’चा यशस्वी समारोप केला. ह्युंदाई मोटर समूहाच्या जागतिक मुक्त नवोन्मेष मंच झिरो १ एनई च्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमासाठी देशभरातून प्राप्त झालेल्या ९८० अर्जांमधून १६ आशादायी स्टार्टअप्स ची निवड करण्यात आली आहे. भारतातील वाहन आणि वाहतूक तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या ह्युंदाईच्या प्रयत्नांमधील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
निवड झालेल्या नवउद्योजक संस्थांनी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित ‘ग्रँड पिच डे’मध्ये ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड आणि ह्युंदाई मोटर इंडिया इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वरिष्ठ नेतृत्वासमोर आपल्या तंत्रज्ञानाधारित संकल्पना आणि उपाययोजनांचे सादरीकरण केले. यापूर्वी निवड प्रक्रियेच्या विविध टप्प्यांमध्ये त्यांचे मूल्यांकन, मार्गदर्शन आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून परीक्षण करण्यात आले.
निवड झालेल्या १६ स्टार्टअप्स मध्ये पल्स एनर्जी, नोव्हस हाय-टेक, क्राफ्टिफएआय, अँपिअर अवर, एनमोव्हिल, गो-कॉमेट, हॉलॉग टेक्नॉलॉजीज, स्यूक, अनबॉक्स रोबोटिक्स, मोटिव्ह एआय, एएमआय टेक्नॉलॉजीज, दशम लॅब्स, ऑल्टमॅट, सिमलिऑनिक्स, रॅव्हिटी, एम्पफ्लाय सर्व्हिसेस यांचा समावेश आहे .


