Sunday, November 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedरुग्णालयांच्या कामकाजामध्ये व्यवस्थापनही भूमिका महत्त्वपूर्ण- विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले मत 

रुग्णालयांच्या कामकाजामध्ये व्यवस्थापनही भूमिका महत्त्वपूर्ण- विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले मत 

 

 

शेठ ताराचंद रामनाथ आयुर्वेदिक रुग्णालयात प्रदीर्घ काळ सेवा बजावलेल्या उपअधिक्षक डॉ. सौ. कल्याणी भट यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न

 

पुणे १ नोव्हेंबर २०२६: बदलत्या आरोग्यसेवा क्षेत्रात रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या वाढत्या अपेक्षा, आरोग्यसेवांबाबत अधिकाधिक कडक होत असलेले नियम व अनुपालनाची आवश्यकता, तसेच रुग्णालयांच्या दैनंदिन कामकाजातील वाढती गुंतागुंत यामुळे हॉस्पिटल व्यवस्थापन विभागाची भूमिका दिवसेंदिवस अधिक महत्त्वपूर्ण होत आहे असे मत विविध मान्यवरांनी येथे व्यक्त केले . पुण्यातील शेठ ताराचंद रामनाथ आयुर्वेदिक रुग्णालयात प्रदीर्घ काळ निष्ठेने व प्रामाणिकपणे सेवा बजावलेल्या उपअधिक्षक डॉ. सौ. कल्याणी भट यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या सभागृहात अत्यंत भावुक वातावरणात पार पडला. या विशेष कार्यक्रमांमध्ये रुग्णालयाचे व्यवस्थापकीय विश्वस्त गोपाळ राठी , रुग्णालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हुपरीकर, अधिक्षक डॉ. संगिता साळवी, डॉ. अभय इनामदार, डॉ. गिरीश टिल्लू , डॉ. मिहिर हजरनवीस , डॉ. भागवत , चंद्रशेखर भट आदी मान्यवर तसेच डॉक्टर व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .

 

रुग्णांना दर्जेदार, सुरक्षित आणि सुरळीत आरोग्यसेवा मिळवून देण्यापासून ते रुग्णालयातील विविध विभागांमध्ये समन्वय राखणे, प्रशासकीय प्रक्रिया सक्षम करणे आणि नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करणे, अशा अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या रुग्णालय व्यवस्थापनाला पार पाडाव्या लागतात. या पार्श्वभूमीवर, गेली अनेक वर्षे रुग्णालय व्यवस्थापनाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि सेवानिवृत्त होत असलेल्या डॉ. कल्याणी भट यांची भूमिका निश्चितच अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अमूल्य ठरली आहे असे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले . त्यांनी नेहमीच वैद्यकीय व्यवस्थापनाला प्राधान्य देऊन सहकाऱ्यांना व कनिष्ठ कर्मचाऱ्यांना उत्तम मार्गदर्शन केले, असे गौरवोद्गार उपस्थितांनी काढले.

 

आपल्या मनोगतात डॉ. कल्याणी भट यांनी भावना व्यक्त करताना रुग्णालयासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कोरोना काळात आव्हानात्मक प्रसंगात रुग्णालयाची धुरा सांभाळणारे आलेल्या अनुभवांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. त्यांनी या प्रवासात साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आणि व्यवस्थापनाचे मनापासून आभार मानले.

 

डॉ. मिहिर हजरनवीस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments