Monday, November 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*किल्ले रायगड रोपवे सेवा ३ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू*

*किल्ले रायगड रोपवे सेवा ३ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू*

 

 

पुणे / महाड, दि. २ नोव्हेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावरील रोप-वे सेवा येत्या मंगळवारपासून (३ नोव्हेंबर) पुन्हा सुरू होत असल्याची माहिती कार्यकारी संचालिका वैशाली जोग यांनी आज येथे दिली. गेल्या काही दिवसांपासून देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी बंद रोप-वे बंद होता. आवश्यक दुरुस्ती व देखभालीच्या कामांसाठी ही सेवा २१ सप्टेंबरपासून तात्पुरती बंद करण्यात आली होती. रोपवे व्यवस्थापन व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही कामे नियोजित वेळेपूर्वीच पूर्ण करण्यात यश आले आहे. रायगड रोपवे ही किल्ले रायगडाला भेट देणाऱ्या शिवभक्त, ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त सुविधा आहे. रोप-वे सेवा बंद असल्यामुळे अनेक पर्यटकांची गैरसोय होत होती. आता सेवा पुन्हा सुरू होत असल्याने शिवभक्त व पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments